agriculture stories in marathi agrowon Dr. Sabale weather updates | Agrowon

उन्हाळी हंगामास सुरुवात

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्रात आठवड्याच्या सुरुवातीस उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर पूर्व मराठवाडा प्रदेशावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहिल्यामुळे सध्याचे थंडीचे प्रमाण कायम राहील. मंगळवार (ता. १८) पासून हवेच्या दाबात बदल होऊन ते १०१२ हेप्टापास्कल इतके राहील. कमाल व किमान तापमानात वाढ होऊन थंडीचे प्रमाण कमी होईल. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश से., तर कमाल २९ अंश से. इतके राहून थंडीचे प्रमाण चांगले राहील. मात्र उर्वरित महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमानात ३७ ते ३८ अंश से.पर्यंत वाढ होईल.

महाराष्ट्रात आठवड्याच्या सुरुवातीस उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर पूर्व मराठवाडा प्रदेशावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहिल्यामुळे सध्याचे थंडीचे प्रमाण कायम राहील. मंगळवार (ता. १८) पासून हवेच्या दाबात बदल होऊन ते १०१२ हेप्टापास्कल इतके राहील. कमाल व किमान तापमानात वाढ होऊन थंडीचे प्रमाण कमी होईल. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश से., तर कमाल २९ अंश से. इतके राहून थंडीचे प्रमाण चांगले राहील. मात्र उर्वरित महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमानात ३७ ते ३८ अंश से.पर्यंत वाढ होईल. त्यामुळे सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता अत्यंत कमी राहील. तापमानात वाढीसोबत सापेक्ष आर्द्रतेत घट होते. बाष्पीभवनाचा वेग वाढतो. दुपारी उष्ण हवामान, तर पहाटे व सकाळी थंडी अशी स्थिती सुरू होईल. उन्हाळी हंगाम सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागतात. या काळात पिकांची, जनावरांची, मानवाची पाण्याची गरज वाढते. या वर्षी उन्हाळी हंगाम लवकर सुरू होत असून, ऋतू बदलाचे संकेत देत आहेत.

उत्तर भारत ः
राजस्थानवर १०१८ हेप्टापास्कल तसेच पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश भागांवरही तितकाच हवेचा दाब राहील. यामुळे थंडीचे प्रमाण याही आठवड्यात अधिक राहील. काश्‍मीर भागात बर्फवृष्टी सुरू राहील. गुजरातच्या भागावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्याने थंडीचे प्रमाण अधिक राहील. मात्र बुधवारी (ता. १९) वरील सर्व भागांवरील हवेचा दाब १०१२ हेप्टापास्कल इतके कमी होईल. परिणामी, थंडीही कमी होईल.

कोकण ः
कोकणातील कमाल तापमानात वाढ होऊन दुपारी उष्ण हवामान राहील. या आठवड्यात सकाळी थंड हवामान राहील. कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यांत ४३ ते ४८ टक्के, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५६ ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यांत २३ ते २५ टक्के, तर रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यांत २६ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. पावसाची शक्यता नाही.

उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नंदूरबार जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर नाशिक जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वत्र १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

मराठवाडा ः
कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. तसेच उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस, तर जालना व हिंगोली जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात ६६ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत त्यापेक्षा थोडी कमी राहील. त्यामुळे सकाळी हवामान कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात २८ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत १७ ते १८ टक्के राहील. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ११ ते १२ किलोमीटर राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ताशी वेग ६ ते १० किलोमीटर राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून पाण्याची गरज वाढेल. हिंगोली व जालना जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ती आग्नेयेकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

पश्‍चिम विदर्भ ः
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. पश्‍चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३० टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर व दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

मध्य विदर्भ ः
मध्य विदर्भात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, आणि वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वर्धा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील. तसेच यवतमाळ व नागपूर ती ३१ ते ३२ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः
कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तसेच भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४१ टक्के, तर गोदिंया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत ३३ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १७ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः
कमाल तापमान सातारा व सोलापूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यांत ते ३७ अंश, तर कोल्हापूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व नगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, सातारा व सोलापूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३३ ते ३७ टक्के, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ४० ते ४२ टक्के आणि कोल्हापूर जिल्ह्यात ५१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला ः
१) कमाल व किमान तापमानात होणारी वाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. पिकांची पाण्याची गरज वाढेल. ठिबकचा पाणी देण्याचा कालावधी वाढवावा. तसेच पाटाने पाणी देत असल्यास दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी करावे.
२) वेलवर्गीय भाजीपाला, टरबूज व खरबूज तसेच काकडी व इतर भाजीपाला पिकांच्या लागवडी कराव्यात.
३) जनावरांना उन्हाळी हंगामात हिरवा चारा उपलब्ध करावा.

- डॉ. रामचंद्र साबळे
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र)


इतर कृषी सल्ला
पीकनिहाय आवश्यक अनुकूल तापमानमहाराष्ट्र राज्य हवामानाच्या समतिशोष्ण या...
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाचे छाटणी...शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असून, शेवगा...
पीक वाढीच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये...माती आणि विविध खतांतून अन्नद्रव्यांचा योग्य...
द्राक्ष सल्ला : सद्यःस्थितीत...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये...
..असे करा गारपीटग्रस्त केळीबागेचे...मागील आठवड्यात विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागांत...
सिंचनापूर्वी तपासा पाणीसिंचनासाठी जास्त प्रमाणात क्षारयुक्त पाणी...
मोसंबीतील फुल-फळगळ आणि उपाययोजनामोसंबीला भरपूर फुले लागतात, फळधारणाही भरपूर होते...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेत...सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वाढीतील...
व्यवस्थापन केळी बागेचे..केळीची वाळलेली पाने (रोगविरहित), उसाचे पाचट,...
कृषी सल्ला (कोकण विभाग)आंबा फळधारणा  फळधारणा झालेल्या आंबा...
कीटकांमधील बदलाचाही अभ्यास आवश्यकहवामानातील विविध घटकांमध्ये होणाऱ्या बदलांचे...
जागतिक हवामान कसे घडते?जागतिक हवामान ही सतत बदलणारी गोष्ट असून, त्यावर...
विदर्भातील हवामानानुसार पिकांचे नियोजनविदर्भाचे कार्यक्षेत्र १९ अंश ०५ अंश ते २१ अंश ४७...
हरभरा पिकावरील तांबेरा रोगाचे असे करा...यंदा मराठवाड्यात उशिरापर्यंत थांबलेल्या पावसामुळे...
कुकुटपालन प्रकल्पाची तांत्रिक...सदाशिवने अंड्यासाठी कुक्कुटपालन हा व्यवसाय...
उन्हाळी मिरची लागवडहिरव्‍या मिरचीला बाजारामध्ये वर्षभर मागणी असते....
असा करा भुईमूग पिकामध्ये जिप्समचा वापरभुईमूग या प्रमुख तेलबिया पिकाच्या उत्पादनवाढीसाठी...
बियाण्यांची साठवणूक क्षमता...बियाण्यांची साठवणूक करताना बियाण्यांतील ओलाव्याचे...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पिकांचे...तीस वर्षांच्या हवामान घटकाच्या अभ्यासावरून...
नत्रयुक्त खतांचा वापर व्हावा अधिक...पर्यावरण आणि हरितगृह वायू म्हटले की आपल्याला...