जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा परिणाम

जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा परिणाम
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा परिणाम

सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी पृथ्वीवर यापूर्वीही अनेक वेळा नैसर्गिक कारणांमुळे तापमानवाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळीही पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित कारणांमुळे होत आहे. पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड व अन्य काही वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. या वायूंमुळे हरितगृह परिणाम (ग्रीनहाउस इफेक्ट) होऊन पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता असते. हवामानबदलाचा अभ्यास करणाऱ्या आयपीसीसी संस्थेने अहवाल २०१७ मध्ये जागतिक तापमान आता सर्वोच्च म्हणजे १.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचत आहे. परिणामी, आत्ताच नैसर्गिक आपत्तींना सुरुवात झाली आहे. यापुढे तापमान वाढत गेल्यास जगाला आणि विशेषत: भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यात उष्ण लहरींच्या मोठ्या संकटाचा इशारा देण्यात आला आहे. उद्योगातून निघणारे हरितगृह वायू (ग्रीन हाउस गॅसेस) कमी करण्यासाठी डिसेंबर १९९७ मध्ये अनेक देशांनी एकत्र येऊन क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्याचे ठरविले. मात्र, तो खऱ्या अर्थाने अस्तित्वात आला फेब्रुवारी २००५ मध्ये. त्यात २०२० पर्यंत कर्ब वायूसहीत अन्य हरित वायू उत्सर्जनावर संपूर्ण नियंत्रण आणावयाचे ठरले. मात्र, ऊर्जेची गरज वाढत असल्याने अनेक देशांना या उद्देशामध्ये अपयश येत आहे. २०१५ मध्ये पॅरिस करारावर १९७ देशांनी सह्या केल्या असून, या शतकात सरासरी तापमान २ अंश सेल्सिअसच्या आत ठेवण्याचा निर्धार केला आहे. शक्यतो तापमान १.५ अंशापर्यंतच मर्यादित ठेवण्यासाठी कर्ब वायूचे प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी करावे लागेल. त्यासाठी २०३० पर्यंतची मर्यादा ठरविण्यात आली आहे. कोळसा आधारित सर्व वीजप्रकल्प २०५० पर्यंत पूर्ण बंद करून कर्ब वायू उत्सर्जन कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीत वाढ होणार असल्याचा इशारा आयपीसीसीने नव्या अहवालात दिला आहे. गेल्या शतकात १ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले तापमान या शतकातही वाढत असून, ते १.५ अंशावर पोचण्याची शक्यता आहे. पुढील १२ वर्षांत १.५ अंश हीच मर्यादित सीमा असल्याचे आयपीसीसीने म्हटले आहे. पर्यावरणीय विनाश टाळण्यासाठी २०३० ही सीमा ठरवली असून, संपूर्ण जगाकडे केवळ १० वर्षे उरली आहेत. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात उष्ण लहरींचे प्रमाण वाढण्याचा धोका अहवालात नोंदविला आहे. (प्रा. सुरेश चोपणे २०१८). हरितगृह परिणामासाठी कारणीभूत वायू वायू : तापमानवाढ (अंश) पाण्याची वाफ : २०.६ कार्बन डायऑक्साइड :  ७.२ ओझोन :२.४ डाय नायट्रोजन ऑक्साइड : १.४ मिथेन : ०.८ इतर वायू  : ०.६ सर्व एकत्रित हरितवायू मिळून  : ३३ परिणाम सरासरी तापमानवाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली, तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहे. पूर्वीच्या तापमानवाढीतही पृथ्वीवर अशाच प्रकारचे महाकाय बदल घडले होते. सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल. तापमान आणि पावसामध्ये जास्तीत जास्त बदल झाल्यास पिकांच्या उत्पादनातील (टक्के) अंदाजानुसार बदल ः

अ. क्र. पीक वर्षे
    २०३५ २०६५ २१००
अ. पावसाळी हंगाम पिके
१. भात -७.१ -११.५ -१५.४
२. मका -१.२ -३.७ -४.२
३. ज्वारी -३.३ -५.३ -७.१
४. तूर -१०.१ -१७.७ -२३.३
५. भुईमूग -५.६ -८.६ -११.८
ब. हिवाळी हंगाम पिके
६. गहू -८.३ -१५.४ -२२.०
७. हरभरा -१०.० -१८.६ -२६.२
संदर्भ : तापमान आणि पावसाचे जास्तीत जास्त बदल १.३ अंश सेल्सिअस आणि ७ टक्के २०३५ मध्ये, २.५ अंश सेल्सिअस आणि २६ टक्के २०६५ मध्ये आणि ३.५ अंश सेल्सिअस आणि २७ टक्के २१०० मध्ये (ब्रिटन इटा. ल., २०१४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com