agriculture stories in marathi agrowon Effects of greenhouse gases on global warming | Page 2 ||| Agrowon

जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा परिणाम

डॉ. के. के. डाखोरे, वाय. ई. कदम
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी पृथ्वीवर यापूर्वीही अनेक वेळा नैसर्गिक कारणांमुळे तापमानवाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळीही पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित कारणांमुळे होत आहे.

सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी पृथ्वीवर यापूर्वीही अनेक वेळा नैसर्गिक कारणांमुळे तापमानवाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळीही पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित कारणांमुळे होत आहे.

पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड व अन्य काही वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. या वायूंमुळे हरितगृह परिणाम (ग्रीनहाउस इफेक्ट) होऊन पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता असते.
हवामानबदलाचा अभ्यास करणाऱ्या आयपीसीसी संस्थेने अहवाल २०१७ मध्ये जागतिक तापमान आता सर्वोच्च म्हणजे १.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचत आहे. परिणामी, आत्ताच नैसर्गिक आपत्तींना सुरुवात झाली आहे. यापुढे तापमान वाढत गेल्यास जगाला आणि विशेषत: भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यात उष्ण लहरींच्या मोठ्या संकटाचा इशारा देण्यात आला आहे.

उद्योगातून निघणारे हरितगृह वायू (ग्रीन हाउस गॅसेस) कमी करण्यासाठी डिसेंबर १९९७ मध्ये अनेक देशांनी एकत्र येऊन क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्याचे ठरविले. मात्र, तो खऱ्या अर्थाने अस्तित्वात आला फेब्रुवारी २००५ मध्ये. त्यात २०२० पर्यंत कर्ब वायूसहीत अन्य हरित वायू उत्सर्जनावर संपूर्ण नियंत्रण आणावयाचे ठरले. मात्र, ऊर्जेची गरज वाढत असल्याने अनेक देशांना या उद्देशामध्ये अपयश येत आहे. २०१५ मध्ये पॅरिस करारावर १९७ देशांनी सह्या केल्या असून, या शतकात सरासरी तापमान २ अंश सेल्सिअसच्या आत ठेवण्याचा निर्धार केला आहे. शक्यतो तापमान १.५ अंशापर्यंतच मर्यादित ठेवण्यासाठी कर्ब वायूचे प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी करावे लागेल. त्यासाठी २०३० पर्यंतची मर्यादा ठरविण्यात आली आहे. कोळसा आधारित सर्व वीजप्रकल्प २०५० पर्यंत पूर्ण बंद करून कर्ब वायू उत्सर्जन कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीत वाढ होणार असल्याचा इशारा आयपीसीसीने नव्या अहवालात दिला आहे.
गेल्या शतकात १ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले तापमान या शतकातही वाढत असून, ते १.५ अंशावर पोचण्याची शक्यता आहे. पुढील १२ वर्षांत १.५ अंश हीच मर्यादित सीमा असल्याचे आयपीसीसीने म्हटले आहे. पर्यावरणीय विनाश टाळण्यासाठी २०३० ही सीमा ठरवली असून, संपूर्ण जगाकडे केवळ १० वर्षे उरली आहेत. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात उष्ण लहरींचे प्रमाण वाढण्याचा धोका अहवालात नोंदविला आहे. (प्रा. सुरेश चोपणे २०१८).

हरितगृह परिणामासाठी कारणीभूत वायू

वायू : तापमानवाढ (अंश)
पाण्याची वाफ : २०.६
कार्बन डायऑक्साइड :  ७.२
ओझोन :२.४
डाय नायट्रोजन ऑक्साइड : १.४
मिथेन : ०.८
इतर वायू  : ०.६
सर्व एकत्रित हरितवायू मिळून  : ३३

परिणाम
सरासरी तापमानवाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली, तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहे. पूर्वीच्या तापमानवाढीतही पृथ्वीवर अशाच प्रकारचे महाकाय बदल घडले होते. सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल.

तापमान आणि पावसामध्ये जास्तीत जास्त बदल झाल्यास पिकांच्या उत्पादनातील (टक्के) अंदाजानुसार बदल ः

अ. क्र. पीक वर्षे
    २०३५ २०६५ २१००
अ. पावसाळी हंगाम पिके
१. भात -७.१ -११.५ -१५.४
२. मका -१.२ -३.७ -४.२
३. ज्वारी -३.३ -५.३ -७.१
४. तूर -१०.१ -१७.७ -२३.३
५. भुईमूग -५.६ -८.६ -११.८
ब. हिवाळी हंगाम पिके
६. गहू -८.३ -१५.४ -२२.०
७. हरभरा -१०.० -१८.६ -२६.२
संदर्भ : तापमान आणि पावसाचे जास्तीत जास्त बदल १.३ अंश सेल्सिअस आणि ७ टक्के २०३५ मध्ये, २.५ अंश सेल्सिअस आणि २६ टक्के २०६५ मध्ये आणि ३.५ अंश सेल्सिअस आणि २७ टक्के २१०० मध्ये (ब्रिटन इटा. ल., २०१४).

 


इतर ताज्या घडामोडी
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा ...मुंबई: दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा...
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...