अमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती, नियंत्रणासाठी शास्त्रज्ञ कार्यरत

अमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती, नियंत्रणासाठी शास्त्रज्ञ कार्यरत
अमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती, नियंत्रणासाठी शास्त्रज्ञ कार्यरत

मक्यावरील लष्करी अळी (शा. नाव - स्पोडोप्टेरा फ्रुगीपेर्डा) ही भारतामध्ये नवीन असून, त्याच्या शिफारशी उपलब्ध नाही. या अळीच्या नियंत्रणासंदर्भात विद्यापीठ स्तरावर प्रायोगिक चाचण्या सुरू आहेत. त्याचे निष्कर्ष हंगामाअंती उपलब्ध होतील. सोबत जैविक कीटकनाशकांची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे संयुक्त विद्यमाने कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प कार्यान्वित आहे. कृषी विभागाकडील कीड व रोगांसंबंधी प्राप्त आकडेवारीच्या आधारे सदर प्रकल्पाच्या माध्यमातून या विद्यापीठाचे कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरिता मका, कापूस, सोयाबीन, तूर, भात, ऊस, ज्वारी व हरभरा या पिकांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणासंबंधी उपाय योजना सुचविल्या जातात. कीटकशास्त्र विभागाद्वारे क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी माहे सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत १५ सल्ले देण्यात आले आहेत. विद्यापीठाद्वारे मक्यावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. लष्करी अळीचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांच्या चाचण्या विद्यापीठातील निरनिराळ्या संशोधन केंद्राचे प्रक्षेत्रावर कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या चाचण्याचे निष्कर्ष पुढील हंगामात उपलब्ध होतील. या निष्कर्षाच्या आधारावर मक्यावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन रासायनिक कीडनाशकांशिवाय करणे शक्य होईल. - डॉ. सी. एस. पाटील ( विभाग प्रमुख, कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

चालू खरीप हंगामात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. सदर अळीच्या नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठाचे व सर्व कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यनुभअंतर्गत (RAWE) विद्यार्थी आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सयुक्त विद्यमानाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. त्यासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यांतील १०९ तालुक्यांसाठी प्रत्येकी दोन शास्त्रज्ञ याप्रमाणे एकूण २२० शास्त्रज्ञांची नेमणूक कृषी विभागाच्या मदतीसाठी करण्यात आलेली आहे. विद्यापीठामार्फत कृषी अधिकारी व शास्त्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १७४ शेतकरी मेळावे व प्रशिक्षणे घेण्यात आले आहे. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच, अखिल भारतीय मका संशोधन प्रकल्पाद्वारे मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या व्यवस्थापनासंदर्भात कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता कार्यशाळा घेण्यात आल्या. तसेच, शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन सर्वेक्षण व व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले जात आहे. शास्त्रज्ञाकडून लष्करी अळीच्या व्यवस्थापनावर आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. - डॉ. शरद गडाख (संचालक विस्तार शिक्षण व संचालक संशोधन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com