agriculture stories in marathi agrowon fertilizer management of sugarcane | Agrowon

उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रा

डॉ. प्रीती देशमुख, ज्योती खराडे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

रासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा खतपेरणी अवजाराच्या साह्याने मातीत मिसळून द्यावीत. लागवडीच्या वेळी शिफारशीत मात्रेपैकी १० टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद व ५० टक्के पालाश द्यावे. जमिनीमध्ये वापसा असताना खते द्यावीत.

रासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा खतपेरणी अवजाराच्या साह्याने मातीत मिसळून द्यावीत. लागवडीच्या वेळी शिफारशीत मात्रेपैकी १० टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद व ५० टक्के पालाश द्यावे. जमिनीमध्ये वापसा असताना खते द्यावीत.

माती परीक्षण केल्यानंतर जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती समजते. त्यानुसार रासायनिक खतांची मात्रा ठरवावी. ऊसपिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ, या प्रमुख वाढीच्या अवस्था आहेत. वाढीच्या अवस्थेनुसार गरजेनुसार चारवेळा खते विभागून देणे आवश्‍यक आहे.
१) उसाला उगवण ते फुटवे येईपर्यंत नत्राची गरज कमी असते; तर उगवण, मुळांची वाढ व फुटव्यासाठी स्फुरद व पालाशची गरज जास्त असते.
२) लागवडीच्या वेळी शिफारशीत मात्रेपैकी १० टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद व ५० टक्के पालाश द्यावे.
३) फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी नत्राची जास्त गरज असते. म्हणून, ६ ते ८ आठवड्यांनी ४० टक्के आणि १२ ते १४ आठवड्यांनी १० टक्के नत्र द्यावे.
४) मोठ्या बांधणीच्या वेळी ४० टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद व ५० टक्के पालाशची मात्रा द्यावी. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नसते.
५) विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचनातून केल्यास खतांची उपयुक्तता वाढते. खतांची ४० टक्के बचत होते. मुळांच्या सान्निध्यात खते दिल्यामुळे उत्पादनात वाढ होते.

खते देण्याच्या पद्धती ः

 • - खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा खत पेरणी अवजाराच्या साह्याने मातीत मिसळून द्यावीत.
 • - हलक्‍या जमिनीत युरियाचा वापर जास्तीत जास्त वेळा विभागून करावा.
 • - जमिनीमध्ये वापसा असताना खते द्यावीत. जमीन कोरडी असल्यास किंवा पाणी दिल्यानंतर लगेच खते देऊ नयेत.
 • - हिरवळीचे पीक घेऊन ऊस लागवड करायची असल्यास स्फुरद खताच्या पहिल्या हप्त्यापैकी ५० टक्के हिरवळीच्या पिकाला आणि राहिलेला ५० टक्के ऊस लागवडीच्या वेळी सरीमध्ये द्यावा.
 • - हेक्‍टरी ६० किलो गंधकाचा वापर केल्यामुळे स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
 • - चुनखडीयुक्त जमिनीत डीएपी आणि म्युरेट ऑफ पोटॅशसारख्या खतांचा वापर फायदेशीर ठरतो. या जमिनीत लोह आणि जस्ताच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात आणि केवडा रोगासारखी लक्षणे दिसतात. त्यासाठी लागवडीच्या वेळी फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट किंवा व्हीएसआय-मायक्रोसोल या घनरूप विद्राव्य खतांचा वापर करावा.
 • - पालाशयुक्त खते पाण्याच्या निचऱ्यावाटे वाहून जाण्याचा धोका कमी असतो. ही खते नत्रयुक्त खतांसोबत सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत.
 • - पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा एकरी ५० किलो वाढवून द्यावी किंवा २.५ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश द्रावणाची पिकावर फवारणी करावी.
 • - रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावीत.
 • - ऊस लागवडीअगोदर हेक्‍टरी २.५ लिटर ॲसिटो‍बॅक्‍टर डायझोट्रॉफिकस या जिवाणू खताची २५० लिटर पाण्यात मिसळून बेणे प्रक्रिया करावी किंवा लागवडीनंतर ६० दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी करावी.
 • - स्फुरदयुक्त खते शेण खतात मिसळून मुळांच्या सान्निध्यात येतील अशा रीतीने द्यावीत. जमिनीत स्फुरदाची अविद्राव्य संयुगे तयार होतात आणि स्फुरद पिकास उपलब्ध होत नाही. सेंद्रिय खतातील सेंद्रिय आम्लामुळे स्फुरदाची अविद्राव्य संयुगे विरघळतात. स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत एकरी १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून वापसा स्थितीत जमिनीत आळवणी केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.

संपर्क ः ०२०-२६९०२२७८
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.) पुणे


इतर नगदी पिके
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
ऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...
दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...
खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
ऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...
दर्जेदार कृषी उत्पादनासाठी...आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो...
उसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रणजुलै २००२ मध्ये सांगली जिल्ह्यात उसावर सर्वप्रथम...