द्राक्ष सल्ला

grapes advice
grapes advice

सध्याच्या स्थितीमध्ये अनेक द्राक्ष विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येते. काही ठिकाणी पाऊस पडल्याची स्थिती आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानही कमी झालेले दिसून येते. अशा वातावरणामध्ये आर्द्रता, तापमान आणि ढगाळ स्थिती अशा तिन्ही बाबी अनुकूल असल्यामुळे मणी सेंटिंगनंतरच्या अवस्थतमध्ये भुरी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. मणी सेंटिंग ते मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेतील बागांमध्ये या रोगांची समस्या जास्त प्रमाणात आहे.  बागेमध्ये दाट कॅनोपी असलेल्या वेलीवर बाहेरून रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे जाणवत नाही. काही परिस्थिती पूर्ण कॅनोपी रोगमुक्त असली तरी कॅनोपीच्या आतील भागातील द्राक्षघडांच्या काही मण्यांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बाहेरून केलेली फवारणी कॅनोपीच्या आतपर्यंत पोचत नसल्याने रोगाचे नियंत्रण मिळत नसल्याची स्थिती असावी. अशा भागातील द्राक्षघड लवकर खराब होत असल्याचे दिसून येईल. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेलीवरील कॅनोपी मोकळी असणे गरजेचे आहे. असे केल्यास एकतर भुरी रोगाच्या प्रादुर्भावास जबाबदार वातावरण तयार होणार नाही. फवारणी केल्यानंतर व्यवस्थितरीत्या कव्हरेज मिळेल.

  • अशा दाट कॅनोपीवर नियमित सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. या फवारणीनंतर अॅम्पीलोमायसीस क्विसक्वालिस ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे जैविक घटकांची फवारणी ५ ते ७ दिवसांच्या अंतराने करत राहावे. 
  • जर बागेमध्ये फळछाटणीनंतर ६० दिवसांपूर्वीची स्थिती असेल, तर ट्रायअझोल वर्गातील हेक्झाकोनॅझोल (५ एससी) एक मिली प्रतिलिटर पाणी किंवा डायफेनकोनॅझोल ०.७ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी घेता येईल. 
  •  काही भागामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. अशा भागातील बागेमध्ये सल्फर २ ग्रॅम अधिक कायटोसॅन २ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी घेता येईल. कायटोसॅनच्या फवारणीमुळे मणी क्रॅकिंग वर नियंत्रण ठेवता येईल. 
  • ६० ते ९० दिवसांच्या कालावधीतील बागेमध्य सल्फर २ ग्रॅम अधिक कॅल्शिअम क्लोराईड १ ते २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करता येईल. कॅल्शिअम क्लोराईडच्या फवारणीमुळेसुद्धा मणी क्रॅकिंग काही प्रमाणात थांबवता येईल. ज्या बागेत मण्यात पाणी उतरल्यानंतरची अवस्था आहे, अशा बागेत सल्फर २ ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट १ ते २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करता येईल. 
  •     वरील दोन्ही परिस्थितीमध्ये कायटोसॅन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
  •  ः डॉ. सुजय साहा, ०२०-२६९५६०३२ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com