आरोग्यदायी हळद

स्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या आरोग्यासाठी देखील हळद उत्तम कार्य करते.
 आरोग्यदायी हळद
आरोग्यदायी हळद

स्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या आरोग्यासाठी देखील हळद उत्तम कार्य करते. हे घरातील वृद्ध मंडळींना नक्कीच माहिती असते. अशी ही सर्वगुणसंपन्न हळद औषध म्हणून उत्तम काम करते. नवीन पिढीला याचे महत्त्व माहिती असणे आवश्‍यक आहे.

  • कोणत्याही जखमेवर किंवा लहानसहान कापले, खरचटले तर त्याठिकाणी हळद लावली जाते. मुका मार लागून सूज आल्यास हळकुंड चंदन, तुरटी यांचा लेप लावावा. त्यामुळे सूज उतरण्यास मदत होते.
  • हळद ही चेहऱ्याचा वर्ण सुधारते. शिवाय जंतुनाशक म्हणूनही काम करते. चेहऱ्याला डाळीचे किंवा मसुरीचे पीठ, हळद आणि सायीसह दूध यांचे मिश्रण करून लेप लावावा. लेप वाळल्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. त्यामुळे वर्ण आणि त्वचेचा पोत सुधारतो.
  • औषध म्हणून हळदीचा उपयोग करताना चांगल्या प्रतीची ओली हळद वाळवून उपयोग करावा किंवा हळकुंडे दळून आणावीत.
  • मधुमेहात नेहमीच्या औषधांच्या जोडीला आवळा आणि हळदीचे चूर्ण समभाग एकत्र करून अर्धा चमचा पावडर रोज सेवन करावे.
  • वातावरणातील बदलामुळे खोकला, सर्दी, आवाज बसणे, घसादुखी या तक्रारी उद्‌भवतात. यासाठी रोज गरम दुधात हळद घालून उकळून दुधाचे सेवन करावे.
  • पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत अनेकांना अंगावर खाज येऊन पित्ताच्या गाठी उठतात. अशावेळी हरिद्राखंड हे औषध योग्य मात्रेत दिल्यास उपयोग होतो. हरिद्रा म्हणजे हळद. त्याची मात्रा तज्ज्ञांना विचारून ठरवावी.
  • हळद रक्तदोष नाहीसा करते. त्यामुळे त्वचाविकारातील औषधांत हळदीचा समावेश करतात.
  • कफाचे विकार, जंतुसंसर्ग, घसा खवखवणे, सर्दी यांसारख्या तक्रारींमध्ये हळद आणि दूध दीर्घकाळापर्यंत घ्यावे.
  • पथ्य ः

  • कफाचा त्रास असेल तर दही, ताक, थंड पदार्थ यांचे सेवन बंद करावे.
  • मधुमेह असेल तर गोड खाणे बंद करून व्यायाम, फिरायला जाणे गरजेचे आहे.
  • त्वचाविकार, त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी तेलकट, तिखट, चमचमीत पदार्थ, चायनीज, लोणचे खाणे बंद करावे. नियमितपणे औषधे घ्यावीत.
  • काळजी ः

  • ताप, खोकला, सतत सर्दीचा त्रास होत असल्यास योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
  • त्वचाविकार, अति प्रमाणात खाज, जखम, पूयस्राव असल्यास तज्ज्ञांना प्रत्यक्ष दाखवून औषधोपचार सुरू करावेत.
  • संपर्क ः डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com