agriculture stories in marathi agrowon processed food products from Dragan Fruit | Agrowon

ड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थ

सचिन शेळके, शिवम साळुंके
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

ड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जाते. अलीकडे भारतामध्येही या पिकाची लागवड सुरू झाली आहे. ही निवडुंग वर्गीय वेल वनस्पती आहे. वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा व वरून गुलाबी व आतून गर गुलाबी अशा तीन प्रकारांत हे फळ येते. या फळाला आशियाई देशात पिताहाया किंवा पिताया म्हणतात.

ड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जाते. अलीकडे भारतामध्येही या पिकाची लागवड सुरू झाली आहे. ही निवडुंग वर्गीय वेल वनस्पती आहे. वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा व वरून गुलाबी व आतून गर गुलाबी अशा तीन प्रकारांत हे फळ येते. या फळाला आशियाई देशात पिताहाया किंवा पिताया म्हणतात.
वेल छत्रीसारखी दिसते. साधारणतः या वेलीची आयुष्य मर्यादा १७ ते २० वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्यांचा वापर होतो. कोणत्याही जमिनीत हे पीक येत असले तरी पोषक जमीन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्याच्यापासून चांगले उत्पादन मिळते. या वेलाची फुले रात्री उमलतात. त्यांचे पराग सिंचन निशाचर पतंग व वटवाघळांमार्फत केले जाते. वेलाच्या पानाला फळ लागते. कळी लागल्यापासून सुमारे एक महिन्यांत हे फळ पक्व होते. या फळाच्या सालीवरच पाकळ्या असतात. साल व पाकळ्या गुलाबी रंगाच्या असतात. अंडाकृती फळाच्या गराचा रंग वेगवेगळा असला तरी त्यात बारीक मोहरीच्या आकाराच्या काळ्या बिया असतात. या फळाची चव ही गोड व आंबूस असते. पिकण्याच्या अवस्थेत फळाची साल गुलाबी, चकाकणारी, घट्ट असावी लागते. साल मऊसर असलेली फळे त्वरित खाण्यासारखी असतात. मात्र, ती लवकर खराब होऊ शकतात. फळाला सालीचे पापुद्रे तपकिरी व ढिले असल्यास फळ अधिक पिकल्याचे समजावे.

अन्नघटकांचे प्रमाण (प्रति १०० ग्रॅमनुसार )ः
प्रथिने ०.१९४, कॅल्शिअम ७.५५ मिलिग्रॅम, फॉस्फरस ३३.१५ मिलिग्रॅम, लोह ०.६ मिलिग्रॅम, जीवनसत्वे बी १ - ०.१६१५ मिलिग्रॅम, बी२- ०.०४४ मिलिग्रॅम, बी३- ०.३६३५ मिलिग्रॅम, ‘क’ ८.५ मिलिग्रॅम, स्निग्ध पदार्थ ०.४१ ग्रॅम, ऊर्जा २३६ किलो कॅलरी, कर्बोदके २० ग्रॅम, फॉलिक अॅसिड १८.३ मिलिग्रॅम.

ड्रॅगन फळाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

जॅम

१. पिकलेली ड्रॅगन फ्रूट फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. व्यवस्थित कापून, त्यातील गर काढून घ्यावा.
२. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून घ्यावी. त्यात प्रतिकिलो जॅमसाठी १ ते २ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. मिश्रण एकजीव करावे.
३. हे मिश्रण पातेल्यात घेऊन मंद आचेवर सतत ढवळत शिजवावे. या मिश्रणाचा ब्रिक्स ६८.५ अंश इतका आल्यानंतर उष्णता देणे बंद करावे.
४. तयार झालेला जॅम हा निर्जंतूक काचेच्या भरणीत भरावा. बाटल्याची साठवणूक थंड व कोरड्या जागी करावी.

गर (रस)

१. पिकलेले ड्रॅगन फ्रूट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. फळावरील साल काढून आतील गर वेगळा करावा.
२. गरामधील बिया वेगळ्या करून घ्याव्यात. यंत्राच्या साह्याने गर व्यवस्थित मिसळून घ्यावा. तयार झालेला १० मिली गरामध्ये १०० मिली दूध व १० ग्रॅम साखर मिसळून त्याचा रस बनवू शकतो. हा गर (रस) हा वजा १८ अंश सेल्सिअसला गोठवून ठेवल्यास ६ ते ८ महिने पर्यंत वापरता येतो.

टॉफी

१. टॉफी तयार करण्यासाठी ड्रॅगन फ्रूटचा गर १ किलो, द्रवरूप ग्लुकोज ७० ग्रॅम, साखर ६५० ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ते ३ ग्रॅम, दूध पावडर ७० ते ८० ग्रॅम, वनस्पती तूप १०० ते १२० ग्रॅम इ. साहित्य आवश्यक आहे.
२. ड्रॅगन फ्रूटचा गर कढईत टाकून त्यात वितळलेले वनस्पती तूप टाकून मिसळून घ्यावे. चांगले शिजवून घ्यावे.
३. हे मिश्रण मंद आचेवर शिजवत असताना त्यात दूध पावडर, साखर व सायट्रिक आम्ल टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
४. तयार मिश्रण एका तूप लावलेल्या थाळीमध्ये पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे ०.५ ते १ सेमी जाडीचे काप (तुकडे) करून घ्यावेत. तयार झालेली टॉफी ही बटर पेपर किंवा रॅपरमध्ये पॅक करावी. टॉफीची साठवणूक थंड व कोरड्या ठिकाणी करावी.

बियांची पावडर

१. ड्रॅगन फ्रूटचा गर काढतेवेळी त्याच्या बिया वेगळ्या करून घ्याव्यात . त्या
बिया स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात.
२. बिया उन्हामध्ये ५० ते ६० अंश सेल्सिअस तापमानास १५ ते २० तास वाळवाव्यात.
३. वाळलेल्या बिया पॅल्व्हरायझरमध्ये दळून त्याची पावडर तयार करून घ्यावी.
४. ही पावडर विविध बेकरी उत्पादनामध्ये, चॉकलेट व आइस्क्रीममध्ये मूल्यवर्धनासाठी वापरू शकतो. यातील औषधी गुणधर्मामुळे विविध औषधांमध्येही वापर केला जातो.

जेली

१. जेली बनविण्यासाठी ड्रॅगन फ्रूट गराच्या वजनाएवढी साखर मिसळून त्यात प्रतिकिलो ५ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावी.
२. या मिश्रणाला मंद आचेवर तापवावे. तापवत असताना त्यात ४ ग्रॅम पेक्टीन टाकावे. पेक्टीन हे जेलीला घट्टपणा येण्यासाठी वापरले जाते. त्या मिश्रणाला उष्णता देणे सुरू ठेवावे.
३. मिश्रण तापवत असताना त्यामध्ये २ ग्रॅम केएमएस मिसळावे. ब्रिक्स तपासून पाहावा. ६७.५
ब्रिक्सचे प्रमाण झाल्यावर जेली तयार झाल्याचे समजून उष्णता देणे बंद करावे.
४. तयार झालेली जेली निर्जंतुक बाटल्यात भरून त्याला झाकण लावून हवाबंद करावी. या बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी साठवाव्यात. व्यवस्थित साठवणुकीमध्ये जेली २ ते ३ महिने टिकते.

खाण्यास तयार मिश्रण (रेडी टू इट ) -

१. साधारण १०० ग्रॅम वजनाची साखर ७५० मि.ली. पाण्यामध्ये विरघळवून त्यात ४ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. या मिश्रणामध्ये १०० मि.ली. ड्रॅगन फळाचा गर मिसळून घ्यावा. १०अंश ब्रिक्स येईपर्यंत मिश्रण ढवळत मंद आचेवर उष्णता द्यावी. त्यानंतर तयार झालेले मिश्रण गरम असतानाच निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यामध्ये भरावे. नंतर थंड करावे.

स्क्वॅश 

१. ड्रॅगन फळाचा २५०मि.ली. गर घ्यावा.
२. पाणी ३२० मिली घेऊन त्यात ४२० ग्रॅम साखर मिसळावी. हा पाक मंद आचेवर गरम करावा.
३. त्यात ६ ग्रॅम सायट्रिक अॅसिड मिसळावे. उष्णता देत असताना ही त्यामध्ये २५० मिली गर मिसळावा.
४. मिश्रणाला ४३ अंश ब्रिक्स येईपर्यंत मंद आचेवर ढवळावे. त्यानंतर स्क्वॅश हा गरम असतानाच निर्जंतूक केलेल्या बाटलीत भरावा. बाटली थंड करावी. बाटलीमध्ये स्क्वॅश भरल्यानंतर पुन्हा निर्जंतुकीकरण करावे.

सचिन अर्जुन शेळके, ८८८८९९२५२२
(अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर)
शिवम गोविंदराव साळुंके, ७७०९०८५१५१
(अन्नप्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, सैम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश.)


फोटो गॅलरी

इतर कृषी प्रक्रिया
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...
पनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...
आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...
डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...
कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...
पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रणकेळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...