भातावरील निळ्या भुंगेऱ्याचे नियंत्रण

भातावरील निळ्या भुंगेऱ्याचे नियंत्रण
भातावरील निळ्या भुंगेऱ्याचे नियंत्रण

भुंगेरे गर्द निळ्या रंगाचे तर अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते. प्रौढ भुंगा निमुळता, नळीसारखा लांबट व गर्द निळा असतो. शरीरावर हिरव्या रंगाची चमकणारी छटा असते. १) मादी भुंगेरे पानाच्या मागील बाजूस अंडी घालते. अंड्यामधून ६ ते ७ दिवसांत छोट्या मातकट पांढरट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. २) अळ्या पानामधील हरितद्रव्य खरवडून उपजीविका करतात. त्याच ठिकाणी १२ ते १५ दिवसांत कोषावस्थेत जातात. कोष किंचित पांढरट तांबूस असतात. त्यामधून जवळपास एका आठवड्याने भुंगे बाहेर पडतात. ३) अळी आणि प्रौढावस्था या दोन्ही हानिकारक आहेत. प्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात. अळ्या पान स्वतःभोवती गुंडाळून खरवडून आतील हरित भाग खातात. त्यामुळे पानावरती समांतर पांढऱ्या रेषा उमटतात. अनेक रेषा एकमेकात मिसळून त्या ठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. कालांतराने असे चट्टे तपकिरी होतात, पाने करपल्यासारखी दिसतात. ४) किडीचा प्रादुर्भाव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसवण्यापूर्वी होत असतो. किडीचा प्रादुर्भाव पाणथळ जमिनीमध्ये आणि नत्र खताच्या मात्रा अधिक दिल्याने वाढतो. आर्थिक नुकसान पातळी ः पुनर्लागवडीच्या वेळी ः १ भुंगेरा किंवा १ प्रादुर्भित पान प्रतिचूड फुटव्याच्या अवस्थेमध्ये ः १ भुंगेरा किंवा १ ते २ प्रादुर्भित पाने प्रतिचूड एकात्मिक व्यवस्थापन ः १) खाचरामधील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सखल भागांतील शेतकऱ्यांनी प्रादुर्भावाची पाहणी करून उपाययोजना कराव्यात. २) खाचरात पाणी जास्त काळ न साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी. ३) कीड भात खाचरातील बांधावरील गवतावर उपजीविका करते. त्यामुळे लावणीनंतर बांध तणविरहित ठेवावेत. ४) खाचराच्या आजूबाजूस निळ्या भुंगेऱ्यासाठी उपयुक्त खाद्य वनस्पती ( उदा. कसई, धुर, चिमणचारा, रानटी नाचणी) नष्ट कराव्यात. जेणेकरून किडीच्या प्रौढ भुंग्यांना खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा पुढील प्रादुर्भाव रोखता येतो. रासायनिक नियंत्रण ः प्रतिलिटर पाणी १) क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि. लि किंवा २) ट्रायझोफॉस (४० टक्के प्रवाही) १.२५ मि. लि किंवा ३) लॅमडा सायहेलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि. लि. टीप ः १) कीटकनाशकाच्या द्रावणात स्टिकरचा वापर करावा. जेणेकरून फवारणी झाल्यानंतर कीटकनाशक पावसाने धुऊन जाणार नाही. २) किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास १० ते १२ दिवसानंतर कीटकनाशकाची दुसरी फवारणी करावी. प्रथम फवारणीस वापरलेले कीटकनाशक दुसऱ्या फवारणीस वापरू नये. संपर्क ः डॉ. बी. डी. शिंदे, ८००७८२३०६० डॉ. आनंद नरंगलकर, ९४०५३६०५१९ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com