Agriculture stories in Marathi, agrowon special story of Bahrat Aher (Tongaon,Dist.Aurangabad) regarding capsicum cultivation in polyhouse. | Agrowon

पॉलिहाउसमधून घेतो दर्जेदार ढोबळी मिरची

संतोष मुंढे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

तेरा एकर शेती असलेले भरत अाहेर २०१२ पासून संरक्षित शेतीकडे वळले. पहिल्यांदा त्यांनी वीस गुंठे शेडनेट उभारून ढोबळी मिरचीची लागवड केली. त्यानंतर २०१३ मध्ये एक एकर, २०१४ मध्ये पुन्हा एक एकरात शेडनेट उभारले. यामध्ये त्यांनी ढोबळी मिरची आणि काकडी लागवडीचे नियोजन केले.  २०१५ मध्ये अाहेर यांनी  तीस गुठ्यांवर पॉलिहाउस उभारले. सध्या शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची आणि पॉलिहाउसमध्ये ढोबळी मिरची लागवडीचे नियोजन ठेवले आहे.

तेरा एकर शेती असलेले भरत अाहेर २०१२ पासून संरक्षित शेतीकडे वळले. पहिल्यांदा त्यांनी वीस गुंठे शेडनेट उभारून ढोबळी मिरचीची लागवड केली. त्यानंतर २०१३ मध्ये एक एकर, २०१४ मध्ये पुन्हा एक एकरात शेडनेट उभारले. यामध्ये त्यांनी ढोबळी मिरची आणि काकडी लागवडीचे नियोजन केले.  २०१५ मध्ये अाहेर यांनी  तीस गुठ्यांवर पॉलिहाउस उभारले. सध्या शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची आणि पॉलिहाउसमध्ये ढोबळी मिरची लागवडीचे नियोजन ठेवले आहे.

      शाश्वत पाणी नियोजनासाठी आहेर यांनी ३४ मीटर बाय ३४ मीटर बाय ३ मीटर आणि २० मीटर बाय १३ मीटर बाय ३ मीटर या आकाराची दोन शेततळी घेतली. या शेततळ्यात विहिरीतील पाणी भरून ठेवले जाते. पॉलिहाउसच्या छतावर पावसाळ्यात साचणारे पाणीदेखील त्यांनी शेततळ्यात सोडले आहे. आहेर यांनी बॅंकेचे कर्ज घेऊन तीस गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउसची उभारणी केली होती. शासनाचे पन्नास टक्‍के अनुदान मिळाले तरी त्यांनी त्यांच्याकडे कर्जरूपात असलेल्या जवळपास अकरा लाख रुपये कर्जाची दोन वर्षांत परतफेड केली आहे.

पीक नियोजन 

 • स्वतः रोपनिर्मितीवर भर.
 • गादीवाफ्यात शेणखत, निमपेंड, रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर.
 •  पीक वाढीच्या टप्प्यात ठिबक सिंचनाने खतांचे व्यवस्थापन.
 • एकात्मिक कीड, रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब.
 • शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड जून महिन्यात तर काकडी लागवड एप्रिल महिन्यात.
 • पॉलिहाउसमध्ये ढोबळी मिरची लागवड फेब्रुवारी महिन्यात.
 •  ढोबळी मिरचीचे लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी उत्पादन सुरू, जवळपास दहा महिने मिळते उत्पादन.
 • आठ ते दहा दिवसाला ढोबळी मिरचीचा तोडा, प्रतितोडा सरासरी १ ते २ टन उत्पादन. 
 •  एक एकर शेडनेटमधून ४५ टन काकडीचे, तर ढोबळी मिरचीचे ४० टन उत्पादन.
 • ३० गुंठे पॉलिहाउसमधून ३० टन ढोबळी मिरचीचे उत्पादन.
 •  ढोबळी मिरचीला मे, जून, जुलैमध्ये प्रति किलो ३० ते ४० रुपये दर, इतर वेळी सरासरी २० ते ३० रुपयांपर्यंत चढ उतार.
 • काकडीची व्यापाऱ्यांकडून १५ रुपये प्रति किलो दराने थेट खरेदी, सध्या ८ ते ९ रुपये प्रति किलो दर. 
 •  मुंबई, औरंगाबादच्या व्यापाऱ्यांकडून थेट खरेदी, काहीवेळा औरंगाबाद मार्केटमध्ये विक्रीचे नियोजन.

संपर्क ः भरत आहेर : ९५५२७३२७००
 


इतर पॉलिहाऊस पिके
हरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...
शेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...
निर्यातक्षम गुलाब उत्पादनाचाच ध्यास...पॉलिहाउसमधील गुलाब उत्पादन शेतकरी ः ज्ञानेश्वर...
पॉलिहाउसमधून घेतो दर्जेदार ढोबळी मिरचीतेरा एकर शेती असलेले भरत अाहेर २०१२ पासून...
क्षारपड जमिनीत पॉलिहाऊसमध्ये...सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा)...
हरितगृहामधील ढोबळी मिरचीवर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन...
जिद्द, चिकाटीतून जीवनात फुलविले रंगजिद्द, चिकाटी व वेगळी वाट शोधण्याची वृत्ती असेल...