गाईंचा आपल्या कळपाशी सुरू असतो संवाद

गाईंचा आपल्या कळपाशी सुरू असतो संवाद
गाईंचा आपल्या कळपाशी सुरू असतो संवाद

गाई स्वतःच्या कळपाशी एक समन्वय आणि संवाद कायम सुरू ठेवत असल्याचे ऑस्ट्रेलियातील संशोधकांना आढळले आहे. त्याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावरही होत असतो. यामुळे शेतकऱ्यांनी गायींच्या कळपांतील एकूण स्थिती सुधारण्यावर भर दिला पाहिजे. हे संशोधन ‘सायंटीफिक रिपोर्टस’मध्ये प्रकाशित करण्यात आले. सिडनी विद्यापीठातील अॅलेक्झांड्रा ग्रीन यांनी गाईंच्या विविध भावनिक स्थितीतील संवादाच्या प्रक्रियेचा अभ्यास केला आहे. त्यांच्या पीएचडीच्या प्रकल्पासाठी त्यांनी पाच महिन्यासाठी १८ होलेस्टिन फ्रिजियन गाईंच्या कळपाच्या सातत्याने नोंदी घेतल्या. त्यावरून गायींच्या वैयक्तिक आवाजावरून ती सकारात्मक स्थितीमध्ये आहे, की नकारात्मक याचा अंदाज मिळू शकतो. या आवाजाद्वारे ती कळपाशी संवाद साधत असते. गाईच्या आवाजाचे सुमारे ३३३ नमुने तपासण्यात आले. फ्रान्स आणि इटली येथील सहकाऱ्यांच्या साह्याने त्यातील ध्वनीचे विश्लेषण केले. याविषयी माहिती देताना ग्रीन म्हणाल्या, की सर्वसामान्यपणे पशुपालनामध्ये एखाद्या कळपाच्या आवाजाकडे आपण फारसे लक्ष देत नाही. त्यातही एखाद्याच गायींकडे तर आपले लक्षच नसते. मात्र, कळपातील अन्य गायींसोबत तिला खाद्य पुरवठा केला गेला. त्याचा आवाजामध्ये सकारात्मक परिणाम दिसून आला. तर तिला दृश्य स्वरुपामध्ये भेदभाव करत खाद्य नाकारले गेले. या क्रियेचा तिच्यावर नकारात्मक परिणाम झाला. अशा आवाजाद्वारे गायींचे एकूण आरोग्य, त्यांची भावनिक स्थिती यांचा अंदाज येऊ शकतो. या भावनिक स्थितीचा परिणाम त्यांच्या वाढीवर, दुधाच्या उत्पादनावर नक्कीच होऊ शकतो. या आधी झालेल्या अभ्यासामध्ये गाय आणि तिचे पिल्लू यातील संवादाचा अभ्यास करण्यात आला होता. असाच संवाद कळपातील अन्य गायींसोबत होत असल्याचे ग्रीन यांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. गाय ही एक समाजप्रिय प्राणी आहे. केवळ पिल्लासोबत संवादामध्येच नव्हे, कळपामध्ये वावरतानाही त्यांच्यामध्ये एक संवाद असतो. हा संवाद नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी सेंट इटियन्ने, फ्रान्स येथे भेट देत प्रा. डेव्हिड रेबी आणि डॉ. लिव्हियो फॅवारो यांच्याकडून गायींच्या आवाजाचे विश्लेषण करून त्यावर गायींच्या व कळपाच्या स्थितीचा अंदाज मिळवण्याचा प्रयत्न केला.

गाईच्या आवाजाच्या वेगवेगळ्या गुणधर्मांविषयी अद्याप अधिक माहिती मिळवावी लागणार आहे. मात्र, पशुपालक शेतकऱ्यांसाठी गायींचे बोलणे आपल्या भाषेमध्ये ऐकण्यासारखे हे सोपे तंत्र आहे. त्यावरून कळपातील एकूण स्थितीचा अंदाज उपलब्ध होऊ शकतो. - कॅमेरून क्लार्क, सहयोगी प्रोफेसर, सिडनी विद्यापीठ.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com