सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान

सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान

महाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तरी सोमवार (ता. २४) पासून हवेच्या दाबात बदल होईल. कोकण किनारपट्टीवर १०१० हेप्टापास्कल तर उर्वरित महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहिल्याने मध्य महाराष्ट्रासह, कोकणात तापमानात वाढ होईल. मंगळवार (ता. २५) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही कमाल तापमानात वाढ झाल्याने दुपारी हवामान उष्ण राहील. हीच हवामान स्थिती पुढे आठवडाभर राहील. महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे या जिल्ह्यात पहाटे व सकाळी थंडी राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या भागांत दुपारी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर पुणे व नगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. दुपारी उष्ण हवामान राहील. वाऱ्याच्या दिशेत वारंवार बदल होतील. उन्हाळी हंगाम सुरू झाल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. उत्तर भारत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश या भागांत ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. गुजरात, पंजाब, हरयाणा, पूर्व मध्य प्रदेश भागांत थंड हवामान राहील. बंगालच्या उपसागरातून बाष्प मोठ्या प्रमाणावर पूर्व उत्तर भारताच्या भागावरही जमा होतील. पूर्व भारतात रविवार ते मंगळवार (ता. २३ ते २५) काळात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. हळूवारपणे तापमान वाढेल. दक्षिण भारत केरळ व तामिळनाडू भागात पावसाची शक्‍यता आहे. दक्षिण भारतातील किमान व कमाल तापमानात वाढ होऊन थंडी कमी होईल. दुपारी उष्ण हवामान राहील. महाराष्ट्रातील स्थिती १. कोकण - कमाल तापमान रत्नागिरी जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल. रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस पर्यंत राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी जिल्ह्यात ६२ टक्के, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ती ५० ते ५७ टक्के, तर रत्नागिरी जिल्ह्यात ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष ठाणे जिल्ह्यात १८ टक्के व उर्वरित जिल्ह्यात २२ ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. कोकणात पावसाची शक्‍यता नाही. २. उत्तर महाराष्ट्र - कमाल तापमान नंदुरबार जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १५ अंश तर उर्वरित जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ७२ टक्के, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ६४ टक्के, तर नाशिक जिल्ह्यात ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ३४ टक्के राहील, तर उर्वरित जिल्ह्यात ती २० ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. ३. मराठवाडा - कमाल तापमान जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, नांदेड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १७ अंश, तर उस्मानाबाद, लातूर, व बीड जिल्ह्यांत ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यात ७० ते ७३ टक्के, तर उर्वरित लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ६२ ते ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत ४० ते ४२ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात ३३ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. ४. पश्‍चिम विदर्भ - कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ४२ टक्के राहील, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ५० ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता अमरावती जिल्ह्यात ४० टक्के राहील तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत २० ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व वायव्येकडून राहील. ५. मध्य विदर्भ - मध्य विदर्भात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ६८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ किलोमीटर व वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. ६. पूर्व विदर्भ - कमाल तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ६० टक्के , तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ४० ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून व वायव्य, ईशान्येकडून राहील. ७. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र - कमाल तापमान पुणे व नगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, पुणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर उर्वरित कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते ४१ टक्के राहील. दिशा आग्नेयेकडून, पूर्वेकडून व नैऋत्येकडून राहील. कृषीसल्ला १. सुरू असणाऱ्या उन्हाळी हंगामातील मुख्य पिकात उन्हाळी भुईमूग, मेथी, कोथिंबीर, चुका, चाकवत, पालक, कोबी, झेंडू, फ्लॉवर, कांदा या सारखी आंतरपिके वरंब्यावर घेऊन अधिक उत्पन्न मिळवता येईल. २. आंबेबहार धरलेल्या फळ पिकांना गरजेनुसार पाणीपुरवठा करावा. ३. कलिंगड, टरबूज या पिकांचे वाढीच्या अवस्थेनुसार ठिबकद्वारे पाणी पुरवठ्याचा कालावधी वाढवावी. ४. उन्हाळी हंगामात पाणी बचत करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com