agriculture stories in marathi agrowon wild vegetables are useful in daily dish | Agrowon

रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

गुणेश चाचेरे, रुपेशकुमार चौधरी
शनिवार, 27 जून 2020

जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून, भारतीय आदिवासी १५३० पेक्षा अधिक वनस्पतींचा वापर दैनंदिन खाण्यामध्ये करतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुका मेव्यांच्या प्रजाती आहेत.

शेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. त्या प्रामुख्याने जंगलात (रानात), शेताच्या बांधावर, माळरानावर आढळतात. यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने ग्रामीण भागत आवर्जून खाल्ल्या जातात. विशेषतः जंगलानजीकच्या आदिवासी लोकांच्या आहारात पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर असतो. ऋतूनुसार वेगवेगळ्या भाज्या सहज उपलब्ध होतात.

  • भारतातील जंगली आणि पहाडी भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात कोरकू, गोंड, भिल्ल, महादेव कोळी, वारली अशा ४७ जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून, भारतीय आदिवासी १५३० पेक्षा अधिक वनस्पतींचा वापर दैनंदिन खाण्यामध्ये करतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुका मेव्यांच्या प्रजाती आहेत.
  • कोळी, गोंड, गोवारी, ढिवर या चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य आदिवासी जमाती सुमारे २५ रानभाज्यांचा उपयोग करतात. त्यांना ऋतूमानानुसार उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची व त्यांच्या औषधी गुणधर्माची माहिती असते. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. या वनस्पतींपासून भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी असे विविध पदार्थ बनवितात.
  • सुमारे १४ वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला इ.साठी औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त मानल्या जातात.
  • शहरी तोंडवळा असलेल्या भागामध्ये केवळ फ्लॉवर, कोबी, बटाटा, दुधी भोपळा, टोमॅटो अशा ठरावीक भाज्यांचा आहारात समावेश होतो. खेड्यापाड्यांतील लोकही रानभाज्यांचा वापर कमी करू लागले असून, पुढील पिढी त्यांची ओळखही विसरत आहे.
  • आपल्या शेतात, बांधावर, ओसाड जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत. त्यातील काही तण म्हणून परिचयात असल्या तरी रानभाज्या म्हणून त्यांची ओळख करून घेणे गरजेचे आहे. किमान प्राथमिक स्वरूपाची माहिती आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रानभाज्या :
कुडा :
कुडा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पांढरा कुडा किंवा 'इंद्रजव' किंवा 'कुटज' (इंग्रजी नाव : Holarrhena pubescens) या नावानेही तिला ओळखले जाते. मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य या विकारांतील आयुर्वेदिक औषधांमध्ये कुडाचा वापर होतो. १० ते १५ फूट उंच वाढणाऱ्या या झुडपास प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजीसुद्धा करतात. या झाडाला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो. कुटजारिष्ट हे प्रसिद्ध औषध कुडाच्या सालींपासून बनते.

कपाळफोडी :
कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलावरोध यामुळे अंग जखडल्यासारखे वाटणे अशा विकारात कपाळफोडीच्या भाजीने चांगला गुण येतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल, अंगावरून कमी प्रमाणात जात असेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो. आधुनिक शास्त्रानुसार कपाळफोडीच्या पानात प्रतिजैविक व प्रतिपरजिवी तत्त्वे असल्याने जुनाट खोकला व छाती भरणे या विकारातही कपाळफोडीची भाजी उपयुक्त आहे.

भुईआवळी :
याची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात. या वनस्पतीत फायलेनथीन नावाचे द्रव्य आहे. भुईआवळीची भाजी आंबट असून, आधुनिक शास्त्रानुसार या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. यकृतातील पाचक स्रावांमध्ये बिघाड झाल्यास हेपॅटायटिस-ब, काविळीमध्ये या भाजीचा चांगला उपयोग होतो. भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते. दाह कमी होतो. रक्तदाबवृद्धी, चक्कर येणे या आजारात ही भाजी खाल्ल्याने सुधारणा आढळून येते.

आंबट चुका :
भाजी तयार करण्यासाठी चुक्याची पाने, कोवळ्या फांद्या व खोड वापरतात. ही भाजी आंबट - गोड व पचनास हलकी असून पचनक्रियाही सुरळीत करते. ही भाजी थंड असल्याने हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह इ. उष्णतेच्या विकारात उपयोगी ठरते. आमांश (अमॉबियॉसिस) विकारात अन्न न पचताच पातळ मलाबरोबर बाहेर पडते. शरीराचे पोषण नीट होत नाही, अशा वेळी चुक्याची भाजी खाल्ल्याने अन्नपचन नीट होते. मल बांधून होतो. चांगला गुण पडतो.

टाकळा :
ही वनस्पती पावसाळ्यात उगवते. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात. टाकळा ही वनस्पती उग्र वास किंवा दुर्गंधी असली तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. औषधात पंचांग वापरतात. टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्ल्याने कमी होते. त्याचबरोबर इसब, अॅलर्जी, सोरायसिस, खरूज यासारख्या त्वचाविकारावरही उपयुक्त आहे. लहान मुलाच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर असून मलसारक आहे.

आंबुशी :
रस्त्याच्या कडेला आंबुशी ही वनस्पती उगवलेली आढळते. हे प्रामुख्याने ओलसर जागी व कुंड्यातून वाढणारे तण आहे. हे तण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. ही वनस्पती जमिनीवर पसरत
वाढते. आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून, चांगली भूकवर्धक आहे. ही रोचक, दीपन अंगरसाने धमण्यांचे आकुंचन होऊन रक्तस्राव बंद होतो. कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे.

मायाळू :
मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात. गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची असून, पालकाप्रमाणे पचनास हलकी आहे. रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देतात. तसेच अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस अंगाला चोळल्यास पित्त कमी होते.

करटुली :
करटुलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात. करटुलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक थोडे विरेचक आहे. ही भाजी पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याचबरोबर लघवीतील शर्कराही नियंत्रित होते. ज्यांच्या मूळव्याधीतून वरचेवर रक्तस्राव होतो; वेदना, ठणका असतो अशांसाठी ही भाजी अत्यंत हितकारक आहे .

हादगा :
ही भाजी 'अ' जीवनसत्त्वयुक्त असून, हादग्याची फुले चवीला थोडी कडवट, तुरट आणि गुणाने थंड असतात. त्यामुळे वातदोष कमी होण्याकरिता तसेच कफ व पित्त दोषही साम्यावस्थेत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो. थंडी वाजून येणाऱ्या तापावर, सर्दीचा त्रास, भूक लागत नसल्यास, पोट साफ होत नसल्यासही हादग्याच्या फुलांची भाजी उपयुक्त आहे.

ई-मेल ः guneshchachere21@gmail.com
(केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी, जि. गडचिरोली)
 


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...