धुरळणी यंत्र फायदेशीर

धुरळणी यंत्र फायदेशीर
धुरळणी यंत्र फायदेशीर

धुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक कीडनाशके पिकांवर धुराळले जातात. धुरळणी करताना या यंत्राचा वापर योग्य काळजीपूर्वक करावा. हाताने चालविण्याची धुरळणी यंत्रे ः रूट डस्टर:

  • परस बागेसाठी उपयुक्त.
  • मुख्य भाग लांब काटकोनीय ५० सें. मी. व्यासाचा असतो.
  • यामध्ये साधारण अर्धा किलो कीडनाशक पावडर भरता येते.
  • बिलो डस्टर ः

  • यंत्राच्या खालच्या भागात असलेल्या कातड्याच्या दोन भागांत लहान पेटी बसविलेली असते.
  • त्यामध्ये कीडनाशक पावडर भरली जाते.
  • धुरळणी यंत्राद्वारे एक दिवसात अर्धा हेक्टर क्षेत्रात धुरळणी करता येते.
  • रोटरी डस्टर:

  • यंत्रामध्ये चेस्ट टाईप आणि शोल्डर टाईप असे दोन प्रकार आहेत.
  • खांद्यावर लटकविण्याचे रोटरी डस्टर हे चेस्ट टाईप धुरळणी यंत्रापेक्षा जास्त लोकप्रिय आहे.
  • कारण, ते वाहून न्यायला व हाताळायला सोपे आहे.
  • यंत्र खांद्याला लटकविण्यासाठी पट्टे असतात.
  • यंत्राचा वापर करताना पट्टे शरीराला बांधतात.
  • ओळींमध्ये पेरणी केलेल्या पिकात सहज आणि सारखी धुरळणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त.
  • यंत्रामधील निमुळत्या भांड्याची क्षमता ४ ते ५ किलो असते.
  • एका दिवसात अर्धा ते एक हेक्टर क्षेत्रातील पिकांवर धुरळणी होते.
  • यांत्रिक धुरळणी यंत्र:

  • यामध्ये स्वतंत्र इंजिन बसविलेले असते.
  • धुरळणीसाठी यंत्राला इंजिन शक्ती प्रदान करते.
  • धुरळणी यंत्र ट्रॉलीवर बसविलेले असते.
  • यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात फळझाडांच्या पिकावर धुरळणी करण्यासाठी होतो.
  • यंत्राच्या वापरासाठी २ किंवा ४ अश्वशक्तीच्या इंजिनाची आवश्यकता असते.
  • एका दिवसात ६ ते ८ हेक्टर क्षेत्रामध्ये धुरळणी करता येते.
  • संपर्क ः वैभव सूर्यवंशी,९७३०६९६५५४ ०२५७-२०२०५१० (विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com