agriculture stories in marathi Animal Feed- A Potential Rural Enterprise, animal feed making machines | Agrowon

पशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे 
डॉ. आर. टी. पाटील 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या काही गरजा असतात. त्यासाठी प्राण्यांना योग्य पोषकतेचे खाद्य देणे गरजेचे असते. जनावरांची योग्य वाढ, प्रजोत्पादन होण्यासोबतच त्यांपासून योग्य प्रमाणात दूध, मांस किंवा अंडी यांचे उत्पादन मिळण्यासाठी पोषक घटकांनी परिपूर्ण असे खाद्य दिले पाहिजे. व्यावसायिक पशुपालनामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. 

माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या काही गरजा असतात. त्यासाठी प्राण्यांना योग्य पोषकतेचे खाद्य देणे गरजेचे असते. जनावरांची योग्य वाढ, प्रजोत्पादन होण्यासोबतच त्यांपासून योग्य प्रमाणात दूध, मांस किंवा अंडी यांचे उत्पादन मिळण्यासाठी पोषक घटकांनी परिपूर्ण असे खाद्य दिले पाहिजे. व्यावसायिक पशुपालनामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो. 

ग्रामीण पातळीवर दुधाळ जनावरांना प्राधान्याने पशुखाद्य दिले जाते. उर्वरित अन्य जनावरांना केवळ ज्वारी, बाजरीचा कडबा, भात किंवा गव्हाचा पेंढा, बांधावरील तणे अशा शेतीतून उपलब्ध होणाऱ्या चाऱ्यावर ठेवले जाते. काही वेळा ही चारा कुट्टी यंत्राच्या साह्याने बारीक करून दिली जाते. जनावरांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योग्य पशुखाद्याची निर्मिती आणि वापर महत्त्वाचा ठरतो. पशुखाद्याच्या निर्मितीचा छोटा व्यवसाय ग्रामीण पातळीवर उभारणे शक्य आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रांची माहिती घेऊ. 
मका, सोयाबीन किंवा अन्य वाळलेले अन्नधान्ये बारीक करून त्यांचा वापर पशुखाद्यासाठी केला जातो. ही अन्नधान्ये दळण्यासाठी काही यंत्रे उपलब्ध आहेत. 
त्यात हॅमर मिलचा वापर केला जातो. पण हॅमर मिलसाठी उच्च ऊर्जेची आवश्यकता असून, त्यापासून होणारे ध्वनिप्रदूषण आणि उडणारी धूळ त्रासदायक ठरू शकते. 

 • अनेक ठिकाणी उच्च घनतेचे ग्रायंडर त्यासाठी वापरले जातात. वेगवेगळ्या चाळण्यांसोबत हे ग्रायंडर अधिक कार्यक्षम ठरतात. मात्र, ग्रायंडरमध्ये काही अन्नधान्ये व पेंडी बारीक करण्यामध्ये अडचणी येतात. उदा. ब्रान्स, सरकी पेंड. त्यामुळे ग्रायंडरमध्ये टाकण्याआधी योग्य प्रमाणात ती मिसळून किंवा ब्लेंड करून घेणे आवश्यक ठरते. 
 • पदार्थ बारीक करण्याच्या प्रक्रियेमध्ये उष्णता तयार होते. जर दळलेले किंवा बारीक केलेले खाद्य हे साठवणगृह किंवा पिशव्यांमध्ये साठवणार असल्यास ते थंड करून घेणे गरजेचे ठरते. त्यासाठी ग्रायंडरच्या कक्षामध्ये व न्युमटिक कन्व्हेअरच्या दरम्यान सातत्याने खेळती हवा ठेवली जाते. अनेक लहान ग्रायंडरमध्ये त्याच्या शाफ्टवर सक्शन पंखा बसवलेला असतो. 
 • काही ग्रायंडरद्वारे तयार झालेले पशुखाद्य सरळ कन्व्हेअरवर पडते. या ग्रायंडरमध्ये पदार्थ बारीक करण्याच्या प्रक्रियेमध्ये उष्ण हवा काढून घेतली जाते. 
 • ग्रायंडरचे आरेखन हे आडव्या किंवा उभ्या प्रकारचे असू शकते. सामान्यतः दळलेले किंवा बारीक झालेले खाद्य पुढे जाताना सायक्लोनद्वारे तयार हवेच्या झोताद्वारे वेगळे केले जातात. 
 • पोल्ट्री खाद्य हे गायी किंवा वराहांच्या खाद्यापेक्षा अधिक बारीक दळावे लागते. बारीक दळलेल्या पिठापासून योग्य आकाराच्या गोळ्या किंवा पॅलेट बनवल्या जातात. त्यामुळे समप्रमाणात खाद्य देणे शक्य होते. 
 • हॅमर मिलमध्ये बारीक करावयाच्या पदार्थांतील आर्द्रतेचे प्रमाण हे १३ ते १४ टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये. 

तयार मिश्रणाचे एकजीवीकरण ः 

 • तयार झालेल्या मिश्रणाचे योग्य त्या फॉर्म्युलेशनप्रमाणे एकजीवीकरण करण्याचे काम मिक्सरद्वारे केले जाते. लहान आणि तरुण प्राण्यांसाठी चांगले एकत्रिकरण करणे आवश्यक ठरते. कारण वाढीच्या अवस्थेमध्ये पोषक घटक योग्य प्रमाणात न मिळाल्यास त्याचा त्वरीत वाढीवर परिणाम दिसून येतो. 
 • कमी पशुखाद्य एकत्र करण्यासाठी कच्चा माल एकावर एक थरामध्ये टाकून घेतात. त्यानंतर ते ढीग किमान तीन वेळा मिसळले जाते. यामुळे अल्प प्रमाणातील प्रत्येक जीवनसत्त्व आणि खनिजे सर्व भागामध्ये पोचतात. सर्व खाद्याला एकसारखा रंग येतो. 
 • -काही ठिकाणी लहान विद्युत ऊर्जेवर चालणारा किंवा पेट्रोलने चालणाऱ्या कॉंक्रिट मिक्सरचा वापर यासाठी करतात. यात वाळलेल्या किंवा किंचित ओल्या खाद्यांचे मिश्रण चांगल्या प्रकारे होते. उदा. वराह खाद्य. आधी दळलेले मिश्रण किमान पाच मिनिटे मिक्सरमधून फिरवले जाते. 
 • मात्र, मोठ्या प्रमाणात व्यावसायिक खाद्य मिश्रणे तयार करण्यासाठी विशिष्ट अशा कन्व्हेशनल मिक्सरचा वापर करावा. 

कन्व्हेशनल पशुखाद्य मिक्सर ः 
सामान्यतः पशुखाद्य मिश्रणासाठी आडव्या किंवा यू ट्रफ मिक्सरच वापर उद्योगामध्ये केला जातो. त्यात शाफ्टवर वेगवेगळ्या आकाराचे पॅडल किंवा एजिटेटर बसवलेले असतात. त्यात केवळे तीन ते सहा मिनिटांमध्ये कच्चे पदार्थ उचलेले, एकमेकामध्ये मिसळले जातात. हे मिक्सर पदार्थामध्ये ८ टक्क्यांपर्यंत द्रव मिसळून एकजीवीकरण करण्यासाठी योग्य ठरतात. त्यामुळे एकाच मिक्सरद्वारे विविध पशुखाद्य तयार करणे शक्य होते. पशुखाद्यामध्ये फॅट किंवा मोलॅसिस मिसळण्यापूर्वी गरम करून घेणे उपयुक्त ठरते. एकत्रीकरणानंतर त्यांच्या बॅग भरून साठवता येतात. 

पॅलेटिंग किंवा गोळ्या तयार करणे ः 

 • भुकटी स्वरूपातील खाद्यापेक्षा गोळ्या केल्यास हाताळणी सोपी होते. विशेषतः शाबुकंदावर आधारीत खाद्याची निर्मिती करताना हे अधिक फायदेशीर ठरते. 
 • एकजीव केलेले मिश्रण हे एका काठिण्यता असलेल्या स्टिल रिंग किंवा साच्यातून स्टिलच्या रोलरद्वारे दाबून पुढे सरकवले जाते. साच्यामुळे खाद्याचे रुपांतर लांबट आकारामध्ये होते. ते एका चाकूच्या साह्याने योग्य लांबीला कापले जातात. ही प्रक्रिया आडव्या किंवा उभ्या पद्धतीने करणारी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. घरगुती पातळीवर पेलेटिंगसाठी सामान्यतः आडव्या प्रकारचे पेलेटिंग यंत्र वापरले जाते. 
 • या प्रक्रियेसाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असून, एकूण खाद्य निर्मितीसाठी लागणाऱ्या ऊर्जेच्या सुमारे ५० टक्के ऊर्जा त्यासाठी लागते. पॅलेटचा व्यास हा साचा रिंगमध्ये असलेल्या छिद्रांप्रमाणे असतो. कमी व्यासातील पशुखाद्य दाबावे लागत असल्याने अधिक ऊर्जा लागते. जितका गोळ्यांचा आकार लहान तितकी ऊर्जा अधिक लागते. पर्यायाने पशुखाद्य निर्मितीच्या खर्चात वाढ होते. 
 • शीत पॅलेटिंगमध्ये खाद्य मिश्रण हे सामान्य तापमानाला सरळ साचा रिंगमध्ये टाकले जाते. जर मिश्रण एकदम कोरडे असल्यास मिक्सरमध्ये त्यात काही प्रमाणात (१५ ते १६ टक्के) पाणी टाकून मिसळून घेतात. त्यामुळे तुलनेने थंड असलेल्या खाद्याचे तापमान पॅलेटिंगदरम्यान होणाऱ्या घर्षणामुळे ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढते. 
 • गोळ्या तयार झाल्यानंतर साठवण करण्यापूर्वी त्या थंड करणे आवश्यक ठरते. त्यासाठी जमिनीवर एका थरामध्ये पसरून थंड करून घ्याव्यात. या प्रक्रियेमध्ये बाष्पीभवनाद्वारे अंदाजे १२ टक्क्यांपर्यंत पाणी उडून जाते. त्यामुळे त्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊन पुढे साठवणीमध्ये बुरशी वाढीचा धोका कमी होतो. 
 • या शीत पॅलेटिंगच्या शेतपातळीवर यंत्राची क्षमता प्रति तास ७५० किलो पोल्ट्री पॅलेट किंवा १ टन डेअरी पॅलेट तयार करण्याची असते. अर्थात, पशुखाद्यातील घटक द्रव्ये, कणांचा आकार, आर्द्रतेचे प्रमाण याबरोबरच पॅलेटचा व्यास यानुसार त्यात थोडाफार फरक पडू शकतो. 

पॅलेट निर्मितीचे अन्य फायदे ः 
१. पक्ष्यांना किंवा प्राण्यांना खाद्य देताना भांड्याने चिकटून बसणे टाळता येते. प्रत्येक पक्ष्यापर्यंत योग्य प्रमाणात खाद्य देता येते. 
२. पशुखाद्याची नासाडी टाळणे शक्य होते. 
३. पॅलेट निर्मितीमध्ये तयार होणाऱ्या उष्णतेमुळे हानिकारक जिवाणूंचा नाश होतो. 
४. पॅलेटिंगमध्ये अन्य कोणत्याही पदार्थांची भेसळ करणे अन्य कोणालाही शक्य होत नाही. केल्यास स्पष्टपणे लक्षात येते. 

पॅलेट बायंडर्स ः 
काही पदार्थ हे एकमेकाला धरून ठेवत नाहीत. अशा वेळी त्यात वेगळे पदार्थ बायडिंग एजंट म्हणून मिसळावे लागतात. अनेक वेळा मोलॅसिस त्यासाठी २ ते ५ टक्के प्रमाणात मिसळले जाते. अन्य एजंटमध्ये बेन्टोनाईट माती किंवा लिग्नोसल्फोनेट यांचा १ ते २ टक्क्यांपर्यंत समावेश केला जातो. 

पिशव्या भरणे ः 
पशुखाद्य हे भुकटीच्या स्वरूपामध्य असो की पॅलेटच्या, ते पिशव्यामध्ये भरून विक्रीसाठी पाठवले जाते. या साधारण २५ किलो वजनाच्या पिशव्या सरळ मिक्सरला जोडून भरल्या जातात. पिशव्या किंवा पोती ही ज्यूट, कॉटन किंवा कागदांपासून हाताने किंवा मशिनद्वारे शिवून बनवलेली असतात. आतील ओलावा आणि बुरशींची वाढ रोखण्यासाठी सामान्यतः पशुखाद्याच्या साठवणीसाठी पॉलिथीन पिशव्यांची शिफारस केली जात नाही. जर जुन्या पिशव्यांचा वापर पुन्हा करणार असाल, तर अशा पिशव्या खते, कीटकनाशके किंवा अन्य रसायनांच्या नसल्याची खात्री करावी. 

 

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
बेकरी प्रक्रिया उद्योगासाठी उपकरणेप्रामुख्याने तृणधान्यावरील प्रक्रिया उद्योगामध्ये...
ट्रॅक्‍टरची तांत्रिक तपासणी महत्त्वाची...ट्रॅक्‍टरची योग्य निगा राखावी. ट्रॅक्‍टर...
जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची...लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी...
यंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड...नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)...
जलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर...भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे,...
भट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...
झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...
ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...
अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...
भातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...
पशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...
देवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...
हळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...
दुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...
सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...
स्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...
ट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...
ऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...
पोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...
पिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...