agriculture stories in marathi arthkatha, vegetable plantation gives prosperity | Agrowon

भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्ग

विनोद इंगोले
सोमवार, 1 जून 2020

सोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त असलेल्या पांडुरंग गोपाळा कोकोडे तीन वर्षांपूर्वी शेततळे उभारणीनंतर भाजीपाला पिकाकडे वळले. दुर्गम अशा चंद्रपूर जिल्ह्यात स्वयंप्रेरणेने ब्रोकोली, रेड कॅबेज अशा परदेशी भाजी लागवड करत नावीन्यपूर्ण शेतीत पुढाकार घेतला आहे. त्यातून त्यांच्यासाठी आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे.

सोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त असलेल्या पांडुरंग गोपाळा कोकोडे तीन वर्षांपूर्वी शेततळे उभारणीनंतर भाजीपाला पिकाकडे वळले. दुर्गम अशा चंद्रपूर जिल्ह्यात स्वयंप्रेरणेने ब्रोकोली, रेड कॅबेज अशा परदेशी भाजी लागवड करत नावीन्यपूर्ण शेतीत पुढाकार घेतला आहे. त्यातून त्यांच्यासाठी आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट चोरगाव (ता. जि. चंद्रपूर) या गावाची लोकसंख्या १२०० आहे. प्रामुख्याने भातशेती होणाऱ्या या गावातील पांडुरंग गोपाळा कोकोडे यांची ३.५ एकर शेती आहे. गेल्या तीन वर्षापर्यंत त्यांची भिस्त प्रामुख्याने भात, सोयाबीन यासारख्या कोरडवाहू पिकांवर होती. परिणामी उत्पादकता व उत्पन्न कमी राहत असे.

शेततळे झाले परिवर्तनाचे निमित्त ः

२०१५-१६ मध्ये जलयुक्‍त शिवार अभियानात चोरगावची निवड झाली. त्या अंतर्गत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पांडुरंग कोकोडे यांच्याकडे १०० टक्के अनुदानामध्ये शेततळे घेण्याविषयी आग्रह केला. पांडुरंग कोकोडे यांनीही पुढाकार घेत ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे घेतले. त्यातून झालेली पाण्याची शाश्वत सोय पुढील परिवर्तनाचे निमित्त ठरल्याचे ते सांगतात.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे शाश्वतता, प्रयोगशीलता ः

 • चंद्रपूर हा हमखास पावसाचा जिल्हा असून येथे सरासरी ९०० ते ११०० मि. मि. पाऊस पडतो. कोकोडे यांचे शेततळे पहिल्याच पावसात भरले. या पाण्याचा उपयोग सर्व कामे वेळच्या वेळी होण्यासोबत भाताला संरक्षित पाणी देण्यासाठी होऊ लागला. परिणामी पूर्वी केवळ १२ ते १६ क्विंटल असलेले भात उत्पादन वाढून १६ ते २० क्विंटलवर पोचले. त्यात शाश्वतता आली. भाताला प्रति क्विंटल १८०० ते २००० रु. दर मिळतो.
 • २०१७-१८ च्या खरिपात त्यांनी अर्धा एकर क्षेत्रावर हळद लागवड केली. त्यातून ओल्या हळदीचे २३ क्‍विंटल उत्पादन झाले. यापासून हळद पावडर तयार केली. त्यातील ३ क्विंटल हळद पावडरची विक्री २०० रुपये प्रति किलो या प्रमाणे विविध कृषी प्रदर्शनातून केली. मात्र, आणखी एकवेळा हळद लागवडीनंतर हळद घेणे कमी केले. कारण मजुराची कमतरता व हळद शिजवणे व पॉलिश यंत्राची अनुपलब्धता.
 • अर्धा एकर क्षेत्रावर वांगी, उर्वरित एक एकर क्षेत्रामध्ये कारली, मिरची भाजीपाला लागवड सुरू केली. गावापासून २० कि.मी. अंतरावरील चंद्रपूर येथील बाजारात भाजीपाल्याची विक्री करतात. दोन वर्षानंतर भाजीपाल्याखालील क्षेत्र वाढवल्याने पाण्याची गरजही वाढली. त्यांनी बोअरवेल खोदले. त्याला ७० फुटावर चांगले पाणी लागले आहे.

नावीन्याचा शोध ः

पांडुरंग कोकोडे यांना शेतीविषयक माहिती वाचनाची सवय आहे. त्यातून नवीन पिकाकडे त्यांचा ओढा आहे. त्यांच्या एक एकरामध्ये वांगी, कारली (अर्धा एकर) तर उर्वरित क्षेत्र वाल, मिरची, टोमॅटो, चवळी व कोबीवर्गीय पिकांचे विविध वाण ते घेतात. विदेशी भाजीपाल्यामध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, लिफी अशा भाज्यांचे सुरुवातीला ऑनलाइन बियाणे मागवून प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली. पुढे त्याखालील क्षेत्र वाढवले.

वांग्याचे दुहेरी उत्पादन ः

मे मध्ये रोपे टाकल्यानंतर जून मध्ये वांगी लागवड करतात. ऑगस्ट महिन्यापासून उत्पादनाला सुरुवात होते. उत्पादन कमी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात वांगी फांद्यांची छाटणी करतात. त्यावर चांगली फूट निघून वांग्याचे उत्पादन हाती येते. लागवड व खोडवा असे मिळून त्यांना १४० क्विंटल उत्पादन मिळाले. गतवर्षी अर्ध्या एकरवर केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याने यावर्षी पांडुरंग यांच्या भावांसह गावातील काही शेतकऱ्यांनीही त्यांचे अनुकरण केले आहे.

असे मिळतात दर ः

 • वांग्याला सरासरी २० ते २५ रुपये प्रति किलो असा दर मिळतो.
 • ब्रोकोलीला किरकोळ बाजारात ८० रुपये प्रति किलो असा दर असला तरी घाऊक दर ३५ ते ४० रुपये मिळतात. रेड कॅबेज १५ ते २० रुपये प्रति किलो दर मिळतो.
 • टोमॅटोला ३० रुपये किलो घाऊक दर मिळतो. दररोज सरासरी २० किलो टोमॅटो मार्केटला जातो.
 • हिरवी मिरचीचे घाऊक दर १५ ते २० रुपये प्रति किलो आहेत.

खर्च वाचवण्यासाठी नवे तंत्रज्ञान ः

पांडुरंग हे शेतीमध्ये सातत्याने नवे तंत्रज्ञान, नवे वाण, नवनवे प्रयोग करतात. गेल्या वर्षी भाजीपाल्याखालील दोन एकर क्षेत्र ठिबकखाली आणले. भाजीपाल्यात सापळा पीक म्हणून त्यांनी झेंडू लावतात. त्याच्या जोडीलाच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे विकसीत सौर प्रकाश सापळाही वापरतात. यामुळे फवारणीचे कष्ट व खर्चात बचत होतात. तसेच नव्या योजना, तंत्रज्ञान यांची माहिती मनिषा दुमाने (कृषी साहाय्यक), दत्ता काळे (उपविभागीय कृषी अधिकारी),
प्रदीप वाहाने (तालुका कृषी अधिकारी) यांच्याकडून मिळत असल्याचे पांडुरंग यांनी सांगितले.

वार्षिक आर्थिक ताळेबंद ः

 • संपूर्ण शेतीतून एकूण उत्पन्न - ६ ते ६.५ लाख रु. (भाजीपाला ५.५ लाख रु., भात व अन्य पिके १ लाख रु.)
 • उत्पादन खर्च - २.५ ते ३ लाख रु.
 • निव्वळ उत्पन्न ः ३ ते ४ लाख रु.
 • घर खर्चासह अन्य कौटुंबिक कारणांसाठी - सुमारे १.५ ते २ लाख रुपये.
 • मुलगा सत्यम हा १० वीला तर मुलगी नम्रता ही ८ वीला शिकत आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी खर्च - सुमारे २० हजार रुपये.
 • स्वतः पांडुरंग, पत्नी सौ. मेघा व मुले यांचा विमा उतरवलेला असून, त्याचे हप्ते सुमारे १५ हजार रुपये.
 • पीक विमा गेल्या वर्षी घेतला होता. मात्र, हंगामी व कमी कालावधीची पिके असल्याने यावर्षी घेतला नाही.

पांडुरंग कोकोडे, ९०४९७५९८६७


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...