agriculture stories in marathi bajara is more healthy | Agrowon

आहारात असावी आरोग्यदायी बाजरी

सचिन शेळके, कृष्णा काळे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

गहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या पिकांचा आहारातील वापर कमी होत चालला आहे. ही पिके आरोग्यासाठी महत्त्वाची असून, त्यातील बाजरी या धान्याचे फायदे पाहू.

मराठी नाव : बाजरी
शास्त्रीय नाव : पेन्निसेटम ग्लॅकम
इंग्रजी नाव : पर्ल मिलेट
कुळ : पोएसी

गहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या पिकांचा आहारातील वापर कमी होत चालला आहे. ही पिके आरोग्यासाठी महत्त्वाची असून, त्यातील बाजरी या धान्याचे फायदे पाहू.

मराठी नाव : बाजरी
शास्त्रीय नाव : पेन्निसेटम ग्लॅकम
इंग्रजी नाव : पर्ल मिलेट
कुळ : पोएसी

एकेकाळी कोरडवाहू पिकांमध्ये बाजरी हे महत्त्वाचे पीक होते. आता बाजरी ही महाराष्ट्राच्या जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये पेरली जाते. सुमारे १०-१५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. बाजरीचा व्यवस्थापन खर्च हा गहू पिकापेक्षा कमी आहे. आपल्याकडे बाजरीचा वापर प्रामुख्याने भाकरीच्या स्वरूपामध्ये केला जात असला तरी त्यापासून लाडू, उपमा, पकोडे, थालीपीठ, खिचडी, डोसा असे अनेक रुचकर पदार्थ बनवणे शक्य आहे.

बाजरीतील घटक :

बाजरीच्या दाण्यात ओलावा (आर्द्रता) पंधरा ते अठरा टक्के, प्रथिने २२ टक्के, कर्बोदके २५ टक्के, फायबर १७ टक्के, उष्मांक ७५६ किलो कॅलरीज, जीवनसत्त्व बी ६ - ७६८ मायक्रो मि.ली., जीवनसत्त्व ई १०० मायक्रो मि.लि., कॅल्शियम १६ मि.लि., लोह ६ मि.लि., मॅग्नेशियम २२८ मि.लि. ग्रॅम.

बाजरीची उपयुक्तता :

  • बाजरी ही उत्तम ऊर्जा स्रोत (३६१ किलो कॅलरी) असून, त्यात गहू व तांदूळ यापेक्षा अधिक ऊर्जा असते. प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी ६ अधिक प्रमाणात आहेत.
  • बाजरीमध्ये काही घटकांमुळे शरीरातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  • बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.
  • बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात.
  • बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.
  • मधुमेही व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी लाभदायी ठरते.
  • ज्या व्यक्तींना आम्लपित्तांचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही बाजरी उपयुक्त ठरते.

सचिन शेळके, ८८८८९९२५२२
कृष्णा काळे, ८९९९१२८०९९

(लोकनेतेे गोपीनाथरावजी मुंडे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, लोदगा, लातूर.)


इतर तृणधान्ये
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
रहू, चटई पद्धतीने भात लागवडीचे नियोजनचटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या...
ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रेज्वारी हे कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास...
शेतकरी नियोजन : भात शेतीत सेंद्रिय कर्ब...शेतकरी नियोजन शेतकरी ः नितीन चंद्रकांत गायकवाड...
खरीप ज्वारी लागवडीची सूत्रेअन्न आणि चारा उत्पादनासाठी महत्त्वाचे अन्नधान्य...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
भात पिकासाठी सुधारित लागवड व्यवस्थापनभारतातील प्रमुख अन्नधान्याखालील पिकक्षेत्रापैकी...
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धतीमहाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मका...
तंत्र खरीप ज्वारी लागवडीचे..पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी...
साठवणूकीतील कीडी रोखण्यासाठी उपाययोजनाशेतीमालाच्या साठवणुकीच्या किफायतशीर आणि...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...