agriculture stories in Marathi Bajara nutritious food | Agrowon

हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरी

शुभांगी वाटाणे, डॉ. आर. एल. काळे
गुरुवार, 14 जानेवारी 2021

ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्याचा वापर कमी झाला आहे. ही पिके पचनसंस्थेच्या दृष्टीने व एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाची आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहे.

अलीकडे अगदी ग्रामीण भागातही गहू खाण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्याचा वापर कमी झाला आहे. ही पिके पचनसंस्थेच्या दृष्टीने व एकूण आरोग्यासाठीही महत्त्वाची आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहे. सर्व तृणधान्यात जास्तीत जास्त ऊर्जा देणारी बाजरी थंडीच्या दिवसांत आहारात असावी. बाजरीमध्ये सल्फरयुक्त अमिनो आम्ल असल्याने लहान मुले व गर्भवती मातांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे.

गहू आणि मैद्याचा वापर असलेले बेकरी पदार्थांचा लहान मुलांच्या आहारात अधिक समावेश होत आहे. यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे यांसारखे आजार वाढले आहेत. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, ग्लुटेनची ॲलर्जी उद्‍भवणे अशा समस्याही दिसत आहेत. त्या टाळण्यासाठी आहारात बाजरीचा समावेश करणे हिताचे ठरते.

बाजरीच्या १०० ग्रॅम दाण्यातील पोषक घटक
प्रथिने -१०.६ %, पिष्ठमय पदार्थ -७१.६ %, स्निग्ध पदार्थ -५%, तंतुमय पदार्थ -१.३%, कॅल्शिअम- ३०%, लोह ८ मि.ग्रॅ., जस्त -५ मि.ग्रॅ.
कॅलरी -३६०

फायदे ः

 • बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते.
 • अधिक ऊर्जा देत असल्याने शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी बाजरी ही अधिक फायदेशीर ठरते.
 • कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते. परिणामी, हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय बाजरी मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचा चांगला स्रोत असून, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 • बाजरीची भाकरी खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरल्याची भावना राहते. परिणामी, वजन कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरू शकते.
 • पिवळसर बाजरीमध्ये कॅरोटीन व ‘अ’ जीवनसत्त्व अधिक असते.

बाजरीचे विविध पदार्थ ः

 • बाजरीच्या भाकरीसोबत गुळाचा खडा व तूप हे ग्रामीण भागातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. बाजरी भाकरीसोबत उडदाच्या डाळीची आमटी हा हिवाळ्यातील अतिशय पौष्टिक आहार आहे.
 • भारतीय खाद्यपदार्थात बाजरीच्या पिठाची भाकरी किंवा धपाटे हा मुख्य पदार्थ आहे.
 • गव्हाच्या पिठासोबत वापरल्यास प्रथिनांची उपलब्धता वाढते. रंग व स्वाद सुधारल्याने बेकरीमध्ये त्याचा वापर करता येऊ शकतो.
 • पारंपरिक पदार्थ- भाकरी, खिचडी, चुरमा, धपाटे, शेव लाडू, बर्फी
 • बेकरी पदार्थ – बिस्कीट, नानकटाई, खारी.
 • बाजरीचा वापर गृहिणी विविध खाद्य पदार्थांमध्ये सोबत केल्यास वैशिष्ट्यपूर्ण व उत्तम चव मिळू शकते. घरगुती स्तरावर लघुउद्योग करता येईल. बाजरीच्या पोषण मूल्यांचा फायदा आपल्या कुटुंबीयांना आरोग्य सुधारण्यास होईल.

(कार्यक्रम सहायक, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम),
 


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...