agriculture stories in Marathi Banana advice, | Agrowon

केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे व्यवस्थापन

सतिश माने
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

कंदकूज किंवा पोंगासड हा केळीवरील महत्त्वाचा जिवाणूजन्य रोग आहे. हा रोग पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोवोरम् या जिवाणूमुळे होतो.

कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो. झाडाला झालेल्या जखमा, रोगट झाडाचे अवशेष, संसर्गीत हत्यारे, रोगग्रस्त बागेतील चिखल व त्यातून झिरपणारे पाणी यांच्यामार्फत ही रोगप्रसार होतो. उष्ण दमट वातावरण, सततचा पाऊस, चिबड, पाण्याचा निचरा न होणारी जमीन हे घटक रोगाच्या वाढीस पोषक असतात.

केळी पिकावर विविध कीड आणि रोगांचा सतत प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे उत्पादकता सातत्याने घटत आहे. कंदकूज किंवा पोंगासड हा केळीवरील महत्त्वाचा जिवाणूजन्य रोग आहे. हा रोग पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोवोरम् या जिवाणूमुळे होतो.

लक्षणे ः

 • रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. मात्र, सुरुवातीचे १ ते ३ महिन्याचे पीक रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडते.
 • कंदासोबत कोवळ्या मुनव्यावरही रोगाची लक्षणे आढळतात. कंदाचा वरील भाग कुजून झाडाचे पोषण व्यवस्थितरीत्या होत नाही.
 • पाने अचानक वाळून जमिनीकडे लोंबू लागतात. प्रादुर्भावग्रस्त कंदांना खूप कमी मुळे फुटतात. मुळांचा टोकाकडील भाग काळा पडून संपूर्ण मुळे कुजतात.
 • झाडाचा आधार नाहीसा झाल्यामुळे, हलक्या धक्क्याने झाडे कोसळतात.
 • झाड उपटण्याचा प्रयत्न केल्यास फक्त झाडच हातात येते. कंद जमिनीतच राहतात.
 • कंद कापून पाहिल्यास, तपकिरी रंगाचा झालेला असतो. त्यात पोकळ्या निर्माण होतात.
 • ग्रॅंड नैन जातीच्या झाडांच्या खोडांना तडा गेलेला आढळतो. खोडाचा आतील भाग कुजतो.
 • रोगाच्या अतितीव्र अवस्थेत झाडाचा पोंगा जळून जातो. अशा झाडांना घाण वास येतो.
 • उशिरा प्रादुर्भाव झाल्यास, झाडाची योग्य निसवण होत नाही. घड आणि केळी फळ लहान आकाराचे होतात.

प्रसार ः

 • प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो.
 • झाडाला झालेल्या जखमा, रोगट झाडाचे अवशेष, संसर्गीत हत्यारे, रोगग्रस्त बागेतील चिखल व त्यातून झिरपणारे पाणी यांच्यामार्फत ही रोगप्रसार होतो.
 • उष्ण दमट वातावरण, सततचा पाऊस, चिबड, पाण्याचा निचरा न होणारी जमीन हे घटक रोगाच्या वाढीस पोषक असतात.
 • अर्धवट कुजलेल्या शेणखताचा वापर केल्यास प्रादुर्भाव जास्त वाढतो.

नियंत्रण ः

 • लागवडीपूर्वी उन्हाळी खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
 • लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत.
 • कंद लागवडीपूर्वी,
 • कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.४ टक्के) ४ ग्रॅम अधिक स्ट्रॅप्टोमायसीन* (३०० पीपीएम) ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात ३० मिनिटे बुडवावीत.
 • चांगले कुजलेले शेणखत १० किलो प्रतिझाड वापरावे.
 • लागवडीच्या वेळी जमिनीत प्रतिझाड ब्लिचिंग भुकटी ६ ग्रॅम द्यावी. एक महिन्याच्या अंतराने पुन्हा हीच प्रक्रिया करावी.
 • रोगट झाडे कंदासह उपटून नष्ट करावीत. रोगग्रस्त झाडाचे अवशेष बागेबाहेर काढून बाग स्वच्छ ठेवावी.
 • योग्य प्रमाणात पाणी देऊन बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
 • रोगग्रस्त बागेत पुन्हा केळी लागवड करू नये. पिकाची फेरपालट करावी.

संपर्क ः सतिश माने, ९२८४३७५५४५, ०२५७/२२५०९८६
(अखिल भारतीय समन्वित फळ (केळी) सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)


इतर फळबाग
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्कनुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना...अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन...
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापनतेलकट डाग रोग तेलकट डागासाठी फळ पिकाच्या...
डाळिंब पिकातील बहारनिहाय अन्नद्रव्ये,...मृग बहार (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था ः फळ...
वाढत्या थंडीमध्ये फळबागांचे व्यवस्थापनसध्या वाढलेल्या थंडीचा परिणाम  कृषी...
भुरी, डाऊनी मिल्‍ड्यू रोगाच्या...बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर नवे...
फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले...केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश...
द्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची...सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या...
पेरू फळबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनपेरू हे बहुवार्षिक फळपीक असून, त्याला वर्षभर फुले...
केळी पिकातील करपा, कंद कुजव्या रोगाचे...उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावेसध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा...
कृषी सल्ला ( कोकण विभाग)नारळ   फळधारणा वाढत्या तापमानासोबतच...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...
थंडीमध्ये केळी बागेची घ्यावयाची काळजीसद्यःस्थितीत खानदेश व महाराष्ट्रातील अन्य भागात...
कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आतापासूनच...कोकण विभागातील उष्ण व दमट हवामान आंबा पिकावर...