agriculture stories in Marathi Banana advice for winter season | Agrowon

केळी सल्ला

डॉ. एस. व्ही. धुतराज, बी. आर. गजभिये
रविवार, 10 जानेवारी 2021

वातावरणातील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली असेल, तर त्याचा केळी वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 

मृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड बाल्य अवस्थेत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. केळीच्या वाढीसाठी १६ ते ४० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. वातावरणातील तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली असेल, तर त्याचा केळी वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 

थंडीचा परिणाम लागवडीवर परिणाम
उतिसंवर्धित रोपे रुजण्यासाठी होण्यासाठी १६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान लागते. सध्या कांदेबाग लागवड झालेली असेल. परंतु लागवडीस जसजसा उशीर होईल, तसतशी थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 

मुळांवर परिणाम 
उतिसवंर्धित रोपाची कांदेबाग लागवड झालेली आहे. पण कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते. तसेच कमी तापमानामुळे मुळांच्या अन्न व पाणी घोषणाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. 

पानांवर होणारा परिणाम 

  •  केळीला सरासरी ३ ते ४ पाने प्रति महिन्याला येतात. थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे प्रति महिना २ ते ३ पाने येतात. कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात. पानांचा गुच्छ तयार होतो.
  • अशा परिस्थितीत पानांचा फारच कमी भाग सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो, त्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. लहान रोपांच्या कोवळ्या पानांच्या कडा करपतात. केळीचा पोंगा पिवळा होऊन करपतो. थंडीत मोठ्या रोपांच्या पानांवर पिवळसर रंगाचे लांबट चट्टे पडतात, व कालांतराने ते काळपट तपकिरी होऊन पान वाळण्यास सुरुवात होते. 
  • मोठ्या रोपांच्या पानांच्या कडासुद्धा थंडीमुळे करपतात. सूर्यप्रकाशाच्या बाजूने पानांचा रंग पिवळा पडतो विरुद्ध बाजूच्या पानांचा रंग हिरवा राहतो. 

झाडाच्या वाढीवर होणारा परिणाम
कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते, वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. परिणामी, केळी निसवण्याचा कालावधी लांबतो. त्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढतो. 

बुंधा आणि घडावर होणारा परिणाम
कमी तापमानामुळे केळीचा बुंधा व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात. हे चट्टे वाढत जातात आणि घड सटकतो. ज्यादा थंडीमुळे घडांची वाढ मंदावलेली दिसून येते. 

फळवाढीवर होणारा परिणाम 
थंडीच्या काळात घडातील केळीची वाढ फार हळूवार होते. परिमाणी, घड पक्व होण्याचा कालावधी ३० ते ४० दिवसांनी वाढतो. त्यामुळे घड कापणीस वेळ लागतो. 

थंडीचा परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना 

  •     केळी बागेला पाण्याचा ताण देऊ नये. ठिबक सिंचन संच रात्री चालवून १० ते १२ लिटर पाणी प्रति झाड द्यावे. 
  •     बागेमध्ये गव्हाचा भुस्सा, भाताचा भुस्सा, लाकडाचा भुस्सा किंवा मक्‍याचा भुस्सा यांचा ढीग करून रात्री जाळून धूर करावा. जेणेकरून बागेचे तापमान वाढण्यात मदत होईल. 
  •     मुळाच्या कक्षेत चिखल राहील एवढे पाणी देऊ नये. मुळांची कक्षा कायम वाफसा स्थितीत राहील याची काळाजी घ्यावी. 
  •     बागेस २० किलो युरिया प्रति एक हजार झाड याप्रमाणे अतिरिक्त मात्रा द्यावी.
  •     कांदेबाग तसेच मृग बागमध्ये रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. यातील २०० ते २५० मिलि द्रावण प्रति झाड या प्रमाणात आळवणी करावी. 

करपा रोगनियंत्रण 
हा रोग सरकोस्पोरा मुसी बुरशीमुळे होतो. रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे केळीच्या खालील ४ ते ५ पानांवर सुरुवातीला लहान-लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके पडतात. हे ठिपके मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो.

नियंत्रण ः फवारणी प्रति लिटर पाणी
प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मिलि किंवा
कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम 
द्रावणात १ मिलि स्टिकर मिसळावा. 
१५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. 

- डॉ. एस. व्ही. धुतराज,
 ७५८८६१२६३२
(केळी संशोधन केंद्र, नांदेड)


इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
शेतकरी नियोजन (पीक : कलिंगड)माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
शेतकरी नियोजन ः पीक केळी----------------------- शेतकरी ः प्रेमानंद हरी...
तंत्र कारले लागवडीचे...साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या...
वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणामगेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये वातावरणात बदल...
सुपिकतेसाठी माती परीक्षण गरजेचेमाती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे...
अशी करा काजू लागवड...पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनीत, जांभा...
..अशी करा करवंदाची लागवडकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...
पंढरपुरी म्हैस : हलक्‍या चाऱ्यावर तग...पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या चाऱ्यावर तग धरून...
फणस उत्पादनवाढीसाठी झाडाचे व्यवस्थापन...१) फणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
रताळे लागवडरताळे लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम...
शेवगा लागवड तंत्रज्ञानशेवगा लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे...
एरंडी लागवड तंत्रएरंडी लागवड हलक्‍या व मध्यम जमिनीवर जून ते...
फणस उत्पादनासाठी झाडाचे व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
मोगरा लागवडमोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा...
ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड...कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर...
पानवेल, लवंग, जायफळ, काजू लागवड कशी...पानवेल लागवड कशी करावी? - व्ही. के. देवकर,...