बियाणे कंपन्यांची बार, क्यूआर कोडवर कार्यशाळा 

बियाणे कंपन्यांची बार, क्यूआर कोडवर कार्यशाळा 
बियाणे कंपन्यांची बार, क्यूआर कोडवर कार्यशाळा 

सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(सियाम)च्या वतीने औरंगाबाद येथे नुकतेच प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात ३३ बियाणे कंपन्यांच्या सुमारे ६३ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.  या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा, अकोल्याचे सहसंचालक व्ही. आर. रैनापूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना सियामचे सचिव रितेश मिश्रा यांनी काळाची पावले ओळखून बियाणे उद्योगातील कंपन्यांनी आपल्या बियाण्यांच्या पाकिटावर बार/क्‍यूआर कोड प्रस्थापित करण्यावर भर दिला.  सहसंचालक व्ही. आर. रैनापूरकर म्हणाले की, केंद्र शासनाकडून बियाण्याच्या प्रतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बार/क्‍यूआर कोड अनिवार्य होण्याची शक्‍यता आहे. ओईसीडी(OECD) अंतर्गत खासगी कंपन्यांनी सहभागी होण्याची गरज आहे.  सियामचे अध्यक्ष अजित मुळे म्हणाले, सियामच्या माध्यमातून बियाणे कंपन्यांच्या प्रश्नांची एकीच्या बळावर सोडवणूक केली जात आहे. शेतकरी हितासाठी बियाणे कंपन्या व शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्याचे धोरण ठेवण्याची गरज आहे.  प्रशिक्षणात जीएसआय इंडिया या केंद्र शासनाच्या संस्थेचे सहायक महाव्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी बार/क्‍यूआर कोडच्या संदर्भात विस्तृत माहिती दिली. बार कोड इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक इंद्रजित कक्‍कर तसेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचे सिद्धेश नार यांनी बार/क्‍यू/आर कोडचा वापर तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली.  नुजुविडू बियाणे कंपनीचे आशिष वानखेडे यांनी त्यांच्या कंपनीत वापरल्या जाणाऱ्या बार/क्‍यूआर कोडच्या पद्धतीबाबत आपले अनुभव कथन केले.  विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी व मास्टर ट्रेनर पी. व्ही. उन्हाळे यांनी योजनेचे सादरीकरण केले. डाप्पर डेक्‍क कोडींग टेक्‍नॉलॉजीचे संचालक राहुल सोनोने व सुनील जैन यांनी त्यांच्या कंपनीमार्फत देणाऱ्या बार कोड तंत्रज्ञानाबाबतच्या सुविधांची माहिती दिली.  कल्याण शेजूळ यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com