मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत

कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट पाण्यातील शोभीवंत माशांच्या बीजोत्पादनाचे तंत्र शिकून घेतले. त्याला एकात्मिक पद्धतीने पोल्ट्री, परसबाग भाजीपाला उत्पादनाची जोड देत पर्यायी उत्पन्नांचे स्रोत तयार केले.
 मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत
मत्स्य बीजोत्पादनातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत

कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील गटाने खारवट पाण्यातील शोभीवंत माशांच्या बीजोत्पादनाचे तंत्र शिकून घेतले. त्याला एकात्मिक पद्धतीने पोल्ट्री, परसबाग भाजीपाला उत्पादनाची जोड देत पर्यायी उत्पन्नांचे स्रोत तयार केले. डिसेंबर २००४ मध्ये भारतीय उपसागरामध्ये आलेल्या सुनामीमुळे तामिळनाडू राज्यातील किनाऱ्यावरील भागातील अर्थकारण बिघडून गेले. कुंद्रकड हॅमले कोवालम गाव (जि. चेंगलपट्टू) येथील लोकांना पर्यायी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या चेन्नई येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉर अॅक्वाकल्चर ( CIBA) येथील संशोधकांनी मार्गदर्शन केले. संस्थेने काही खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून १० लोकांसाठी मत्स्यशेतीच्या प्रशिक्षणासह प्रकल्प उभारणीसाठी मदत केली. त्यातून पर्ल स्पॉट मासे (शा. नाव -Etroplus suretensis) यांच्या बीजोत्पादनाचा प्रकल्प उभारला. या सोबतच काही लोकांसाठी पोल्ट्री, अळिंबी उत्पादन आणि परसबाग यांचे एकत्रित प्रकल्प उभारले. यातून गटातील लोकांना रोजगारासोबतच उत्पन्नांची सोय झाली. टाक्यांमध्ये मत्स्य जातीचे बीजोत्पादन केले जाते. त्यासाठी आवश्यक ते खाद्य तयार करणे, टाक्यांचे स्वच्छता, देखभाल यासाठी लोकांना काम मिळाले. माशांच्या वाढीवर सातत्यपूर्ण लक्ष ठेवून वेळीच निर्णय घेतले जातात. त्यानंतर योग्य आकाराचे बीज तयार झाल्यानंतर त्यांची काढणी करून मत्स्योत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरवले जातात. संस्थेच्या मत्स्य अंडी उबवण केंद्रातून सरासरी १ सेंमी (०.८ ते १.२ सेंमी) आकाराची दोन हजार जिरे (फ्राय) वाढीसाठी दिले जातात. त्यांची वाढ चार सिमेंट टाक्यांमध्ये केली जाते. प्रति दिन माशांच्या आकाराच्या ३ ते ५ टक्के इतके खाद्य दिले जाते. साधारणतः ५२ दिवसांमध्ये माशांचे सरासरी वजन ०.८ ग्रॅम ( ०.६ ते १.१ ग्रॅम) आणि सरासरी आकार ३.२ सेंमी ( २.८ ते ३.६ सेंमी दरम्यान) होतो. सोडलेल्या दोन हजार जिऱ्यांपासून सुमारे १८६५ बोटूकली (फिंगरलेट्स) मिळतात. बिजोत्पादनामध्ये माशांच्या तग धरण्याचा दर हा ९३.३ टक्के असल्यास सर्व व्यवस्थापन उत्तम असल्याचे निदर्शक आहे. ताळेबंद ः

  • खर्च ः साधारणपणे मत्स्यजिऱ्यांसाठी २००० रुपये आणि खाद्यासाठी ५०० रुपये इतका खर्च येतो.
  •  बोटूकली ही सुमारे ६ प्रति नग या दराने शेतकऱ्यांना किंवा शोभिवंत मासे विक्रेत्यांना विकली जाते.
  •  या प्रकल्पातून गटाला प्रति बॅच ९००० रुपये इतके उत्पन्न मिळते.
  •  मत्स्यबिजोत्पादन झाल्यानंतर राहिलेल्या पाण्यावर परसबागेमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन केले जाते.
  • तंत्रज्ञान हस्तांतरणाचे फायदे या गटाकडे संस्थेकडून तंत्रज्ञान हस्तांतरण झाल्यानंतर या गटाने पुढील पाऊल उचलले. त्यांनी तिरुवल्लूर जिल्ह्यातील पुलिकेट या तलावातून पर्ल स्पॉट माशांच्या ५० ते ८० ग्रॅम वजनाच्या सुमारे चाळीस जोड्या मिळवल्या. या जोड्यांचे व्यवस्थित अलगिकरण करून सिबा संस्थेच्या उबवण केंद्रामध्ये २० दिवसांसाठी ठेवल्या. त्यानंतर गटांने उभारलेल्या टाक्यांमध्ये आणून त्यांची वाढ केली. या माशांपासून जून २०२० मध्ये १३० मत्स्यजिरे मिळाले. हे मत्स्यजिरे चांगल्या पद्धतीने वाढवून बोटूकली आकाराचे झाल्यानंतर विक्री केली. मत्स्य बीजोत्पादनाच्या जोडीला गटाने उभारलेल्या पोल्ट्रीतून १० ते १२ हजार रुपये, परसबागेतील भाजीपाल्यातून ५ ते ६ हजार रुपये उत्पन्न मिळाले.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com