पाणीवापर कार्यक्षमतेसाठी शहरांचे आरेखन महत्त्वाचे

पाणीवापर कार्यक्षमतेसाठी शहरांचे आरेखन महत्त्वाचे
पाणीवापर कार्यक्षमतेसाठी शहरांचे आरेखन महत्त्वाचे

शेती, सिंचन आणि ग्रामीण भागातील पाणी वापराच्या काटेकोरपणाबद्दल सातत्याने चर्चा होत असली तरी शहरी लोकांच्या पाणी वापराच्या काटेकोरपणाबद्दल तितकी चर्चा होत नाही. अरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये समुदायाचे बांधकाम पर्यावरण हे प्रत्येक कुटुंबाच्या पाणी वापराशी जोडलेले असल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार झाडे, झुडपांखालील जमीन, घरांची घनता, एकूण आकार यांच्या पाणी वापरावर लक्षणीय परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. या संशोधनाचा फायदा शहरांचे नियोजनकर्ते आणि जल व्यवस्थापकांना होणार असून, समुदायांचे शाश्‍वत जलनियोजन करणे शक्य होईल. हे संशोधन जर्नल ऑफ दि अमेरिकन प्लॅनिंग असोसिएशनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अरिझोन विद्यापीठातील आरेखनशास्त्र, नियोजन आणि परिसर आरेखन विषयाचे सहाय्यक प्रा. फिलिप स्टॉकर व त्यांचे पदवीचे विद्यार्थी गॅब्रियले जेहले, इलिझाबेथ वेन्ट्झआणि ब्रिंट क्रो- मिलर यांनी बांधकाम आणि एकूण पर्यावरणाचा कुटुंबाच्या पाणी वापरावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला आहे. शहरे आकारास येताना त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्य, बांधकामाची रचना यांचाही पाणी वापरावर परिणाम होतो. या अनुषंगाने संशोधकांनी सॉल्ट सिटी लेक, पोर्टलॅंड, ओरेगॉन आणि ऑस्टिन, टेक्सास येथील रहिवाशांच्या कुटुंबाच्या पाणी वापराचा २०११ पासूनची माहिती गोळा केली. त्यामध्ये वार्षिक पाणी वापर आणि जून ते ऑगस्ट या उन्हाळी महिन्याती पाणी वापराचा समावेश होता. शहरांची निवड करताना हवामान बदल आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या असे दोन निकष लावण्यात आले. त्याविषयी माहिती देताना स्टॉकर यांनी सांगितले, की पश्‍चिम अमेरिकेतील शहरांमध्ये वेगाने वाढ होत असून, नियोजनकर्त्यांनी या लोकांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. भविष्यांमध्ये शहरांच्या वाढीसोबतच पाण्याचा वापर वेगाने वाढणार आहे. शहरांचे आरेखन करताना किंवा पाण्यासंबंधी नवे धोरण आखताना प्रत्येक कुटुंबाच्या पाणी वापरावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती मिळवणे अत्यावश्यक आहे. शहराचे आरेखन महत्त्वाचे

  • संशोधकांनी पाच प्रकारच्या बांधकाम पर्यावरणामध्ये राहणाऱ्या एकल कुटुंबाचा अभ्यास केला. त्यात घरांची घनता, करआधारित मूल्य, एकूण आकार, आजूबाजूला असणारी झाडे, हिरवळ आणि घरांचे वय यांचा समावेश होता. हे घटक लोकांच्या पाणी वापराच्या सवयी तयार करण्यामध्ये महत्त्वाच्या असल्याचे दिसून आले. स्टॉकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
  • एकट्या ऑस्टिनमध्ये बांधकामाच्या पर्यावरणानुसार पाणी वापरामध्ये ८५ टक्क्यांपर्यंत फरक दिसून आले. काही घटकांचा उदा. हिरवळीचे प्रमाण वाढणे, एकत्रित मोकळी जागा मोठी असणे, नवी घरे, नव्या शहरी मूल्य जाणिवा या गोष्टींमुळे प्रत्येक शहरामध्ये पाण्याचा वापर वाढत असल्याचे दिसून आले.
  • कोरड्या शहरामध्ये हिरवळीचे वाढलेल्या प्रमाणामुळेही पाण्याची मागणी वाढत असल्याचे दिसून आले. उदा. सॉल्ट लेक सिटी येथील हिरवळीमध्ये सरासरी १ टक्का वाढ झाली तर वार्षिक पाणी वापरांमध्ये ०.४८ टक्का वाढ झाली. उन्हाळ्यांमध्ये हे प्रमाण ०.७ टक्का इतके होते.
  • वाढलेल्या घराच्या घनतेमुळे पाणी वापरामध्ये घट झाल्याचे दिसून आले तरी त्याला सॉल्ट लेक सिटीचा अपवाद होता.
  • आश्‍चर्यकारक माहिती

  • इमारतीमधील मोकळ्या जागा हा पाणी वापराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या पाहिजेत, असा संशोधकांचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्ष सर्वेक्षणामध्ये मिळालेले चारही शहरांचे निष्कर्ष वेगवेगळे होते.
  • ऑस्टिन आणि पोर्टलॅंड येथे मोठ्या मोकळ्या जागांचा संबंध अधिक पाणी वापराशी होता. ऑस्टिनमध्ये मोकळ्या जागेतील १ टक्का वाढ ही उन्हाळ्यातील पाणी वापरामध्ये अंदाजे ०.३२ टक्का वाढ घडवत असल्याचे समोर आले.
  • जुन्या घरांमध्ये नव्या घरांच्या तुलनेमध्ये कमी पाणी वापरले जात असल्याचे दिसून आले. कदाचित नव्या घरातील अधिक कार्यक्षमतेच्या यंत्राचाही हा परिणाम असावा.
  • याच्या उलट बाब ऑस्टिन, पोर्टलॅंड आणि सॉल्ट लेक सिटीमध्ये आढळली. तिथे घरांचे वय एक टक्क्याने वाढलेल असता वार्षित पाणी वापराचे प्रमाण सुमारे ०.३१ टक्क्याने कमी झाले. उन्हाळ्याती पाणी वापरही ०.३३ टक्क्याने कमी झाला.
  • जलवापर कार्यक्षमतेसाठी नियोजन ः शहरांचे व त्यासाठी आवश्यक पाणी वापराचे नियोजन करताना शहरातील प्रत्येक गोष्टीचा अत्यंत काटेकोरपणे विचार केला पाहिजे. नियम, निकष तयार करताना घरे, त्याच्या आजूबाजूची स्थिती, मोकळ्या जागा, हिरवे सजीव आच्छादन यांचा मानसिकतेवर आणि पर्यायाने पाणी वापरावर परिणाम होत असतो. केवळ पाणी वापराचा विचार केल्यास त्याचा फटका शहरातील हिरव्या झाडे, झुडपांच्या म्हणजेच एकूण हिरवेपणावर होणार आहे. शहरातील तापमान कमी राखण्यासाठी ही झाडे महत्त्वाची आहेत.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com