agriculture stories in marathi Care of silkworms | Agrowon

संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजी

डॉ. चंद्रकांत लटपटे, योगेश मात्रे
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील रेशीम कीटकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वाढीच्या विविध अवस्थेत योग्य प्रकारे काळजी घेतल्यास चांगले रेशीम उत्पादन घेणे शक्य होते.

रेशीम कीटकाची कात अवस्थेत घ्यावयाची काळजी

सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील रेशीम कीटकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वाढीच्या विविध अवस्थेत योग्य प्रकारे काळजी घेतल्यास चांगले रेशीम उत्पादन घेणे शक्य होते.

रेशीम कीटकाची कात अवस्थेत घ्यावयाची काळजी

 • कात अवस्थेत ९० टक्के रेशीम कीटक कातीवर बसल्यानंतर पाने/ फांद्या खाद्य देणे पूर्णतः बंद करावे. संगोपन रॅक कोरडे ठेवावे. हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
 • दुसऱ्या दिवशी २४ तासांपर्यंत ९५ टक्के रेशीम कीटक कात अवस्थेतून बाहेर आल्यानंतर पाने/ फांद्या खाद्य द्यावे. कात अवस्थेतून उठल्यानंतर खाद्य देण्याआदी अर्धा तास शिफारशीत निर्जंतुक पावडर किंवा चुना सच्छिद्र कापडाची पुरचुंडीच्या साह्याने सम प्रमाणात रेशीम कीटकवर धुरळणी करावी. नंतर खाद्य द्यावे.
 • पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या कात अवस्थेतून बाहेर आलेल्या रेशीम कीटकांना कोवळा तुती पाला बतईच्या साह्याने पाट्यावर कापून ०.५, २.५ ते ३ चौरस सें.मी. आकाराचे तुकडे करून खाद्य द्यावे. संगोपन ट्रे स्वच्छतेच्या वेळी नायलॉन/ सुती जाळीचा वापर करावा.
 • संगोपन ट्रे स्वच्छतेनंतर रेशीम कीटकांची विष्ठा, शिल्लक राहिलेली पाने इत्यादी कंपोस्ट खड्ड्यात संगोपनगृहापासून दूर अंतरावर गाडून टाकण्याची व्यवस्था करावी.
 • उझी माशी प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिल्लक फांद्या खाद्य व कीटकाची विष्ट वेगळी करावी. विष्ठेमध्ये उझीमाशीची कोष राहतात.

रेशीम कीटकाच्या कोष बांधणीच्या वेळी घ्यावयाची काळजी

 • प्लॅस्टिकच्या दुमडणाऱ्या नेत्रिकांचा वापर रेशीम कीटकांना कोष बांधणीसाठी करावा.
 • नेत्रिकाआधी दुमडून ७५ टक्के रेशीम कोष बांधणीला सुरुवात केल्यानंतर रॅकवर पसराव्यात.
 • कोष बांधणीच्या काळात संगोपनगृहात २४ ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ६० ते ६५ टक्के आर्द्रता राहील याची काळजी घ्यावी.
 • एका नेत्रिकेवर ४५ ते ५० रेशीम कीटक प्रतिचौरस फूटप्रमाणे कोष बांधणीसाठी रेशीम कीटक सोडावेत. ९०० रेशीम कीटक ६ बाय ४ फूट बांबू चंद्रिकेवर सोडावेत.
 • कोष बांधणीसाठी वेगळ्या संगोपनगृहात चंद्रिका किंवा नेत्रिका रॅकवर ठेवाव्यात. किंवा व्हरांड्यात सावलीत ठेवण्याची व्यवस्था करावी.
 • रेशीम कीटक कोष बांधणीवर गेल्यापासून ५ व्या दिवशी कोषाची काढणी करावी.
 • सहाव्या दिवशी रेशीम कोष बाजारपेठेत न्यावयाच्या अगोदर डागाळलेले, पोचट कोष, वाकड्या आकाराचे किंवा डबल कोष निवडून वेगळे करावेत.
रेशीम कीटक कात अवस्थेतून बाहेर आल्यानंतर प्रत्येक कात अवस्था पूर्ण झाल्यास निर्जंतुक धुरळीचे प्रमाण
कात अवस्था निर्जंतुक पावडर (ग्रॅम)
पहिल्या अवस्थेतून ५०
दुसऱ्या अवस्थेतून १००
तिसऱ्या अवस्थेतून ६००
चौथ्या अवस्थेतून १२५०
पाचव्या अवस्थेतून २०००

केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूर आणि रेशीम संचालनालयाच्या शिफारशीप्रमाणे कीटक संगोपनगृह पक्‍क्‍या सिमेंट काँक्रीटमध्ये बांधलेले व सिमेंट पत्र्याचे असावे. यात तापमान व आर्द्रता नियंत्रण करणे सोपे जाते.

दुबार रेशीम कीटक संकरवाण संगोपनगृहाची आवश्यकता

 • दुबार रेशीम कीटक संकरवाण संगोपनासाठी स्वतंत्र संगोपनगृह असावे. निर्जंतुकीकरण, स्वच्छता किंवा संगोपनाचे वातावरण उपलब्ध होईल.
 • संगोपनगृहास दोन्ही बाजूस व्हरांडा असावा. खिडक्‍यांना पक्की तावदाने, खाली आणि वर झरोका असावा. हवा खेळती राहते.
 • खिडक्यांना वायरमेश किंवा जीआय वायरच्या जाळ्या बसवून घेतल्यास ऊझी माशीचा प्रादुर्भाव टाळता येतो.
 • तुती पाने/फांद्या खाद्य साठवणीसाठी स्वतंत्र अंधार खोलीची व्यवस्था असावी. ऊझी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासोबतच तुती पानाची प्रत व त्यातील पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवता येते.
 • छतावर गवत, काडीकचरा किंवा नारळाच्या झावळ्यांचा वापर आच्छादन म्हणून करावा. त्याने संगोपनगृहाचे तापमान मर्यादित ठेवण्यास मदत होते.
 • छतावर कुलगार्ड पेंट कोटिंग केले तर ३ ते ४ अंश सेल्सिअस तापमान कमी होते.
 • संगोपनगृहाच्या आजूबाजूस उंच झाडांची लागवड केल्यास उन्हाळ्यात तापमान व आर्द्रता मर्यादेत राखण्यास मदत होते.
 • १०० अंडीपुंजांच्या संगोपनासाठी संगोपन रॅकमध्ये ८०० ते १००० चौ. फूट चटई क्षेत्र असणे आवश्यक असते.

डॉ. चंद्रकांत लटपटे, ७५८८६१२६२२
योगेश मात्रे, ७३८७५२१९५७

(डॉ. लटपटे हे रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे प्रभारी अधिकारी असून, योगेश मात्रे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)
 


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...