काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढण्याचे प्रक्रिया उद्योग काही प्रमाणात असले तरी एकूण उत्पादनाच्या ९० ते ९५ टक्के काजूची बोंडें वाया जातात. वाया जाणाऱ्या बोंडाचे मूल्यवर्धन शक्य असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढण्याचे प्रक्रिया उद्योग काही प्रमाणात असले तरी एकूण उत्पादनाच्या ९० ते ९५ टक्के काजूची बोंडें वाया जातात. वाया जाणाऱ्या बोंडाचे मूल्यवर्धन शक्य असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. फळझाडांमध्ये हापूस आंब्याला 'फळांचा राजा' , तर काजूला 'फळांची राणी' म्हटले जाते. भारतात काजूची ओळख पोर्तुगीज लोकांनी अंदाजे ४०० वर्षांपूर्वी करून दिली. काजूला 'फिंगरी मँगो' असे ही म्हणतात. जागतिक पातळीवर ब्राझील, भारत, इंडोनेशिया, मोझांबिक, नायजेरिया, टांझानिया या प्रमुख देशांमध्ये काजूची लागवड केली जाते. काजू लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

  • पूर्वी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने जमिनीची धूप होऊ नये म्हणून काजूची लागवड करण्यात आली होती.
  • महाराष्ट्रात काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या घाटमाथ्यावर काजू लागवडीला मोठा वाव आहे. महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेमुळे काजू पिकाखालील क्षेत्र वाढत आहे.
  • काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात. काजू प्रक्रिया उद्योग वर्षभर चालू राहण्याच्या दृष्टीने काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते. बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफाळणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे, काजूगरावरील साल (टेस्टा) काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून वाळविणे, विशिष्ट धारदार संयंत्र वापरून टेस्टा बाजूला करणे, प्रतवारी, योग्य आर्द्रता राखण्यासाठी कंडिशनिंग करणे, निर्वात पोकळी व नायट्रोजन फ्लशिंग पद्धतीने पॅकिंग करणे इत्यादी टप्प्यांचा समावेश होतो.
  • महाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढण्याचे प्रक्रिया उद्योग प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. काजूची बोंडे फेकून दिली जातात. जवळजवळ उत्पादनाच्या ९० ते ९५ टक्के काजूची बोंडे वाया जातात.
  • काजू बोंडातील पोषक घटक ( प्रति १०० ग्रॅम फळ) ः पाणी ८७.९ टक्के, प्रथिने ०.२ टक्के, स्निग्ध पदार्थ ०.१ टक्के, पिष्टमय पदार्थ ११.६ टक्के, क जीवनसत्च २६८ मिलिग्रॅम. कॅल्शियम फॉस्फरस व लोह इ. खनिजद्रव्ये असतात. प्रक्रियायुक्त पदार्थ ः काजू बोंडापासून सिरप, नेक्टर, जॅम, चटणी, कॅन्डी, सरबत, स्कॅश, टॉफी, काजू फेणी, लोणचे, बार, बर्फी, पावडर इ. प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे १) फळ स्वच्छतेसाठी टाकी – काजू बोंड तोडणी किंवा साठवणीनंतर प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. त्यासाठी मागील आंबा प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रूट वॉशर वापरता येते. हे पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचे बनवले जाते. प्रती तास १०० किलो क्षमतेच्या यंत्रासाठी विजेची गरज नाही. मजुराच्या साह्याने धुतले जातात. यंत्राचा आकार ५ फूट बाय २ फूट, वजन ४० किलो असून, त्यात २०० लीटर पाणी साठवता येते. त्याला चाकांची सोय केलेली आहे. क्षमतेनुसार किंमती ३५ हजारापासून पुढे आहेत. २) रस काढण्यासाठी बास्केट प्रेस यंत्र - अ) मानवचलित यंत्र - काजूबोंडापासून निघणाऱ्या रसापासून सिरप, स्क्वॅश, नेक्टर, जॅम, जेली इ. प्रक्रिया पदार्थ बनवता येतात. त्यासाठी मानवचलित बास्केट प्रेस उपयुक्त ठरते. खालील बाजूला बादलीसारखे फुडग्रेड स्टीलचे भांडे जोडलेले असून, त्यास काजूबोंड टाकतात. या फळांवर दाब देण्यासाठी भांड्याच्या आकाराचीच जाड फुडग्रेड स्टील प्लेट जोडलेली असते. त्याला मजबूत लोखंडी दांडा जोडलेला असतो. तो फिरवून फळांवर दाब दिला जातो. निघालेला रस भांड्यांला जोडलेल्या नळाद्वारे बाहेर येतो. तो पुढील प्रकीयांसाठी वापरता येतो. ब) स्वयंचलित प्रेस यंत्र - यंत्रांसाठी आवश्यक जागा २ फूट बाय २ फूट आणि उंची २ फूट. वजन ३० किलो. ७० किलो प्रति तास क्षमता असलेल्या यंत्रांची किंमत १५ हजार रुपये असून, त्यापेक्षा मोठ्या क्षमतेची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. या यंत्राचा वापर अननस, संत्री, मोंसबी, द्राक्षे, सफरचंद, स्ट्रॉबेरी या फळांचा रस काढण्यासाठीही होतो. ३) वाळवणी यंत्र (ड्रायर मशीन) - वाळलेल्या काजूबोंड कॅण्डीला बाजारामध्ये खूप मागणी आहे. काजूबोंडामधून रस काढल्यानंतर उरलेले काजूबोंड स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. कटरच्या साह्याने कापून तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे ट्रे मध्ये ठेऊन ट्रे ड्रायर मध्ये ८० अंश तापमानाला ७ ते ८ तासासाठी ठेवावा. वाळवल्यानंतर तयार झालेली कॅण्डी एलडीपीई पिशव्यांमध्ये भरून ठेवल्यास वर्षभर चांगली राहते. यासाठी वापरले जाणारे ट्रे ड्रायर हे लोखंड व पत्र्यापासून बनवलेले असतात. त्याची आतील भाग अॅल्युमिनीअमचा बनवलेला असतो. त्यामध्ये ट्रेच्या संख्येनुसार उदा. ६, ८,१२,३६,४८,७२,९६ ट्रे असे प्रकार उपलब्ध आहेत. थ्री फेजवर चालणाऱ्या या यंत्राला २२० व्होल्ट ऊर्जा लागते. यंत्राचे वजन ट्रेच्या संख्येनुसार ६० ते ६५ किलो असते. संपूर्णपणे स्वयंचलित ड्रायरमध्ये ५० अंश ते २०० अंश तापमानापर्यंत उष्णता देता येते. प्रती बॅच १० किलो क्षमतेच्या यंत्राची किंमत ५० हजार रुपये आहे. अन्य फळे व भाज्या वाळवण्यासाठीही हे यंत्र उपयोगी आहो. ४) पावडर बनवण्यासाठी ग्राइंडर - काजूबोंडाच्या भुकटीचा वापर बेकरीजन्य पदार्थ, भाज्या, कुरकुरे, पास्ता, खाद्य उदोयग व औषधी उद्योगामध्ये केला जातो. काजूबोंडाच्या चकत्या करून त्या ड्रायरद्वारे वाळवल्यानंतर ग्राईंडरद्वारे भुकटी केली जाते. मिश्र धातूपासून बनवलेले ग्राइंडर १० ते २५० किलो प्रति तास क्षमतेपर्यंत उपलब्ध आहेत. या अर्धस्वयंचलित यंत्राला सिंगल फेज अर्धा एचपी क्षमतेची मोटार जोडलेली असून, २४० व्होल्ट ऊर्जा लागते. यंत्राला २, ४, ६, ८, १० एम.एम. च्या चाळण्या जोडलेल्या असतात, त्यानुसार कमी अधिक जाडीची भुकटी मिळवणे शक्य होते. हे यंत्र बहुउपयोगी असून यात वाळवलेल्या विविध फळे व पालेभाज्या, मसाले, धान्य इ. बारीक करणे शक्य आहे. किंमत २५ हजार रुपयापासून पुढे आहेत. ५) पॅकेजिंगसाठी लागणारे यंत्र (सिलिंग मशीन) - काजूबोंडाचे प्रक्रिया पदार्थयुक्त पदार्थ प्रामुख्याने प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅक केले जातात. त्यासाठी सिंगल फेज, हीटिंग कॉईल आधारीत सिलिंग मशीन उपलब्ध आहे. यावर १० ग्रॅमपासून ५ किलो पदार्थाचे पॅकेजिंग करू शकतो. प्रती तास ८० ते १०० किलो पॅकींग शक्य असून, त्याच्या किंमती १५०० रुपयापासून सुरु होतात. यात स्वयंचलित यंत्रही उपलब्ध असून, त्याची किंमत ६० हजार रुपयापासून पुढे आहे. ग्रामीण भागामध्ये कमीत कमी भांडवलामध्ये काजूबोंडापासून प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे शक्य आहे. सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश. )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com