agriculture stories in Marathi chick pea, Nachani variety released | Agrowon

हरभरा, नाचणी, भुईमूग वाढीसाठी विशेष प्रयत्न

वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

मालवी देशातील शेतकऱ्यांसाठी देखील प्रति हेक्टरी तीन टन याप्रमाणे अधिक उत्पादनक्षम देणाऱ्या या पिकांच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांप्रमाणे आफ्रिकी देशातील शेतकऱ्यांसाठीही हरभरा, नाचणी ही पिके उपयुक्त मानली जातात. मालवी देशातील शेतकऱ्यांसाठी देखील प्रति हेक्टरी तीन टन याप्रमाणे अधिक उत्पादनक्षम देणाऱ्या या पिकांच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. तेथील सरकारने आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांसाठी अन्न व आर्थिक सुरक्षितता या बाबी लक्षात घेऊन वाण विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. केनिया देशात इक्रिसॅट संस्थेने राबवलेल्या वाण पैदास कार्यक्रमांतर्गत हे वाण विकसित करण्यात आले आहेत. हवामानाला सुसंगत, उत्पादन, पिकातील पोषणद्रव्ये आदींच्या अनुषंगाने मालवी देशात वाणांच्या प्रायोगिक चाचण्या घेण्यात आल्या. या देशातील नागरिकांच्या आहारात हरभरा व नाचणी यावर आधारित पदार्थांचे महत्त्व अधिक आहे. 

शेतकऱ्यांसाठी भुईमूग तेल निर्मिती उद्योगाला चालना

या व्यतिरिक्त मालवी देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी व बाजारपेठ हस्तगत करण्यासाठी भुईमूग तेल उत्पादन उद्योगालाही चालना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा सहभाग असलेल्या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे ११८ सभासद आहेत.यामध्ये ५८ महिला तर ६० पुरुषांचा समवेश आहे. या उद्योगातून महिन्याला सुमारे सहा हजार लिटर तेलाचे उत्पादन करण्याची क्षमता तयार झाली आहे. तेलाच्या विक्रीपासून सुमारे ९६०० अमेरिकी डॉलर एवढ्या रकमेपर्यंत उत्पन्न हाती येते. त्याचा लाभांश देखील सभासदांना वितरित करण्यात येतो. या प्रकल्पाद्वारे सुमारे दोनहजार शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यात आले आहे. मालवी देशातील संस्थांनी या प्रकल्पाला तांत्रिक साह्य व प्रशिक्षण देण्याचे काम देखील केले आहे.  एक गाव एक प्रकल्प हे उद्दिष्ट ठेऊन सरकारने या उपक्रमाची वाटचाल सुरू ठेवली आहे. सहकारी संस्थेस तेल निर्मितीसाठी आवश्‍यक यंत्रसामग्री देखील पुरवली आहे. या उद्योगामुळे देशातील भुईमूग उत्पादकांनाही स्थिर बाजारपेठ मिळण्यास मदत झाली आहे. 


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...