नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
कडधान्ये
हरभरा पिकाची सुधारित लागवड
हरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार आहेत. हरभरा लागवडीसाठी अधिक उत्पादनक्षम सुधारित वाणांची निवड करावी.
हरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार आहेत. हरभरा लागवडीसाठी अधिक उत्पादनक्षम सुधारित वाणांची निवड करावी.
पेरणीची वेळ ः
जिरायत क्षेत्र: १५ ऑक्टोबरपर्यंत
बागायत क्षेत्र : १५ ऑक्टोबर-१० नोव्हेंबर
जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर १० सेंमी पेरावे.
बागायत क्षेत्रामध्ये बियाणे कमी खोलीवर ५ सेंमी पेरावे.
पेरणी अंतर
जिरायत क्षेत्र : ३० सेंमी x १० सेंमी
( झाडांची संख्या ३.३३ लाख)
बागायत क्षेत्र : ४५ सेंमी x १० सेंमी
( झाडांची संख्या २.२२ लाख)
बियाणे प्रमाण (प्रती हेक्टरी)
बियाणे आकारमानानुसार वापरावे लागते
लहान आकाराच्या देशी वाणासाठी - ६० किलो
मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी - ७० किलो
टपोऱ्या (काबुली) आकाराच्या बियाण्यासाठी १०० किलो
हरभरा पिकाच्या सुधारित जाती (देशी वाण)
बीडीएनजी -७९७ (आकाश), बीडीएनजी ९-३, दिग्विजय, जाकी-९२१८, साकी-९५१६, विजय (फुले जी ८१-१-१), विशाल (फुले जी ८७२०७), फुले विक्रम, एकेजी ४६, भारती (आयसीसीव्ही १०)
काबुली वाण
बीडीएनके ७९८, पीकेव्ही काबुली- २ (काक-२), पीकेव्ही काबुली- ४, श्वेता (आयसीसीव्ही-२), विराट, कृपा (फुले-कृपा)
गुलाबी हरभरा : डी ८ , गुलक १, हिरवा हरभरा, हिरवा चाफा
खत व्यवस्थापन : चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत ५ टन प्रति हेक्टर
कोरडवाहूसाठी : २० किलो नत्र ४० किलो स्फुरद ( ४४ किलो युरिया आणि २५० किलो एसएसपी किंवा १०० किलो डीएपी )
बागायतीसाठी : २५ : ५० : ३० ( ५० किलो युरिया आणि ३०० किलो एसएसपी ५० किलो एमओपी किंवा १२५ किलो डीएपी अधिक ५० किलो एमओपी )
: डॉ. हनुमान गरुड, ७५८८६७७५८३
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव)
- 1 of 3
- ››