agriculture stories in marathi Chinese garlic market | Agrowon

साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये लसणांच्या दरात घसरण
वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे चीनमध्ये ताजा लसूण आणि साठवणीतील लसूण या दोहोंना मागणी असते. या वर्षी स्थानिक लसूण उत्पादक पट्ट्यांमध्ये अधिक उत्पादनांच्या शक्यतेमुळे साठवण करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अद्याप खरेदी सुरू केलेली नाही. त्याचा फटका लसणांच्या दराला बसला आहे.

चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे चीनमध्ये ताजा लसूण आणि साठवणीतील लसूण या दोहोंना मागणी असते. या वर्षी स्थानिक लसूण उत्पादक पट्ट्यांमध्ये अधिक उत्पादनांच्या शक्यतेमुळे साठवण करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अद्याप खरेदी सुरू केलेली नाही. त्याचा फटका लसणांच्या दराला बसला आहे.

चीनमध्ये लसणाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नव्याने बाजारात आलेल्या लसणांची खरेदी करून साठवणही केली जाते. साठवण करणारे अनेक व्यापारी असून, त्यांच्याकडे मोठ्या गोदामांची सोय आहे. हे व्यापारी ज्या काळामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होते, त्या वेळी खरेदी करून साठवण करतात. मात्र, या वर्षी फारच कमी साठवणकर्त्या व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली आहे. चीनमधील घाऊक व्यापारी त्यांची मागणी कशीबशी पूर्ण करत आहेत. सध्या आवक आणि मागणी यामध्ये स्थिरता आहे. या लसणाचा दर्जा आणि किंमत याबाबतही व्यापारी अधिक दक्ष असून, साठवणीसाठी योग्य लसणांचे उत्पादन बाजारात येण्याची वाट पाहत असल्याचे सांगण्यात येते.

काही लसूण उत्पादक पट्ट्यामध्ये अधिक लसूण उत्पादनाची शक्यता असून, त्यातुलनेत मागणी कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. साठवणीशिवायच्या लसणाचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये कमी राहील. लसणाला मागणीही सावकाश येत आहेत. त्यामुळे साठवणीतील लसणाला फारसा फायदा राहणार नाही. केवळ निर्यातीसाठी योग्य लसणाच्या प्रतवारीनंतर अधिक मागणी सुरू होतील. परिणामी, सध्या आवक कमी असताना दर वाढण्याची शक्यता कमी झाली आहे. या काळात खरेदीदार कमी असल्याचा हा फटका असल्याचे सांगण्यात येते. ज्या वेळी निर्यातीसाठी खरेदी सुरू होईल, त्या वेळी नैसर्गिकरीत्या बाजारामध्ये दर्जानुसार ताण वाढून, किंमतही वाढणार आहे. साठवणीबाहेरील लसणांसाठी सध्या बाजार अडचणीचा असल्याचे चित्र आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...