लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला

डिसेंबर अखेरपर्यंत पावसाचे वातावरण होते. बऱ्याच ठिकाणी पाऊसही झाला. किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली गेले. वास्तविक आंबे बहराची फुले एकसारखी येण्यासाठी किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आणि कमाल तापमान २८ पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. डिसेंबरअखेर किमान तापमान १३ अंशांपेक्षा खाली जाणे अपेक्षित असते. पण, पावसामुळे बऱ्याच ठिकाणी (उदा. यवतमाळ-अकोला जिल्ह्यांमध्ये) किमान तापमान १३ अंशाच्या आसपास असले तरी कमाल तापमान मात्र २५-२९ दरम्यान नोंदवले गेले. येथे  लिंबूवर्गीय फळबागांना आंबे बहरासाठी आता पाणी देणे चालू ठेवण्यास हरकत नाही. अशा बागेमध्ये जिबरेलिक आम्ल (जीए-३) १ ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रती १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणे.  नागपूर-अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच बागेमध्ये आंबे बहराची फुले येण्यासाठी अजूनही पोषक हवामान नाही. आंबे बहर घेणाऱ्या व  मागील दोन आठवड्यांत क्लोरमेक्वाट क्लोराईड (सीसीसी) च्या फवारणीनंतर पाऊस आला असल्यास अशा बागायतदारांनी क्लोरमेक्वाट क्लोराईड (९९ टक्के ) दोन मिली (हलक्या जमिनीत १.५ मिली) प्रतिलिटर पाणी या प्रमाणे पुन्हा फवारणी करावी. क्लोरमेक्वाट ऐवजी पॅक्लो‍क्लोब्युट्रॅझॉल २०-२५% तीव्रतेचे असल्यास ३०-२५ मिली प्रतिझाड या प्रमाणात पाच लिटर पाण्यात मिसळून आळ्यातील मातीमध्ये मिसळून द्यावे. फवारणी करायची असल्यास ५ मिली प्रतीलिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी. या फवारणी सोबत कुठल्याही अन्नद्रव्यांचा किंवा संजीवकाचा समावेश करू नये. आवश्यक असल्यास बुरशीनाशक मिसळून वापरण्यास हरकत नाही. २० जानेवारीनंतर बागेला पाणी देण्याचे नियोजन करावे.  सध्याच्या पावसामुळे मृगबहर असलेल्या बागेमध्ये बुरशीजन्य फळगळ/तपकिरी कूज येऊ शकते. तेव्हा फोसेटिल एएल २.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.  फळांचा आकार व गोडी वाढवण्यासाठी जिबरेलिक आम्ल (जीए-३) १.५ ग्रॅम अधिक युरीया १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणे. १५ दिवसांनी २-४-डी १.५ ग्रॅम अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०-५२-३४) १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.   : डॉ. अंबादास हुच्चे, ७५८८००६११८  (प्रमुख शास्त्रज्ञ (उद्यान विद्या), आयसीएआर - केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर) (सदर लेखामध्ये वापरलेल्या रसायनांना ॲग्रेस्को शिफारशी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com