agriculture stories in marathi citrus crop advice for hail | Agrowon

गारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजना

डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे
शनिवार, 4 जानेवारी 2020

मराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व गारपीटसुद्धा झाली आहे. या अवकाळी पावसासोबत गारपिटीमुळे लिंबूवर्गीय बागांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे झाडांच्या फांद्या आणि खोडावरील सालींना जखमा होतात. या जखमांतून फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडीया, अल्टरनेरिया अशा विविध बुरशींचा प्रादुर्भाव होतो. रोगांचा प्रसार वाढतो. झाडावरील मृग बहाराच्या फळांची गळ झाल्याचे दिसत आहे. आंबिया बहराची फुले निघाली असल्यास ती गारपिटीने गळली असतील. आंबिया बहार फुटण्यास उशीर होतो, पाहिजे तसा ताण बसत नाही. 

मराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व गारपीटसुद्धा झाली आहे. या अवकाळी पावसासोबत गारपिटीमुळे लिंबूवर्गीय बागांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे झाडांच्या फांद्या आणि खोडावरील सालींना जखमा होतात. या जखमांतून फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडीया, अल्टरनेरिया अशा विविध बुरशींचा प्रादुर्भाव होतो. रोगांचा प्रसार वाढतो. झाडावरील मृग बहाराच्या फळांची गळ झाल्याचे दिसत आहे. आंबिया बहराची फुले निघाली असल्यास ती गारपिटीने गळली असतील. आंबिया बहार फुटण्यास उशीर होतो, पाहिजे तसा ताण बसत नाही. 

  • गारपिटीमुळे मोडलेल्या फांद्या आरीने कापून, कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी. झाडांस १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. 
  • झाडाची साल फाटली असल्यास पोटॅशियम परमॅंग्नेट (१ टक्के ) १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाने पुसून, बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी.
  • झाडे उन्मळून पडली असल्यास त्यांना मातीची भर देऊन लाकडांच्या साह्याने उभे करावे. 
  • झाडांची मुळे उघडी पडली असल्यास वाफ्यामध्ये सायमोक्झॅनिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ८ ते १० लिटर प्रति झाड या प्रमाणे आळवणी करावी. 
  •  गारपीटग्रस्त झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. किंवा बोर्डो मिश्रण (चुना ६०० ग्रॅम अधिक मोरचूद ६०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी) याची फवारणी करावी. 
  • झाडास अमोनियम सल्फेट १ किलो प्रति झाड याप्रमाणे द्यावे. शक्य असल्यास चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याची (झिंक + कॅल्शिअम + फेरस सल्फेट मिश्र घटक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी. 
  • मार लागलेल्या झाडांवर कॅल्शिअम नायट्रेट १ किलो अधिक जिबरेलीक आम्ल २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. मृग बहारची फळे गळाली असल्यास त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. 

 : डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२
(अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)


इतर फळबाग
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
सीताफळात योग्य परागसिंचन होणे आवश्यकसीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून...
नारळाला द्या शिफारशीत खतमात्रानारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे...
असे करा लिंबूवर्गीय फळपिकांचे व्यवस्थापनसध्या काही संत्रा बागांना पूर्ण ताण बसून आंबिया...
दीड वर्षात पपईसह पाच पिकांचा 'तनपुरे...पपईच्या दीर्घ कालावधीच्या पिकात कांदा, पपई...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
द्राक्ष रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापनसध्याच्या वातावरणाचा विचार करता किमान...
केळी सल्लासूत्रकृमीग्रस्त जमिनीस खोल नांगरट देऊन उन्हात २...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...