हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने ब्रिटनने कमी केली
युरोपीय संघाच्या एकल बाजारातून बाहेर पडून ब्रिटन त्यांच्या गरजेनुसार आयात करण्याचे धोरण अवलंबणार असल्याचे ब्रिटनच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.
२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल बाजारातून माघार घेतली. सोबतच लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवर निर्बंध हटवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेतील लिंबूवर्गीय फळांसाठी ब्रिटन ही मुख्य बाजारपेठ असून, २०१९ मध्ये सुमारे ९.५ टक्के लिंबूवर्गीय फळांची निर्यात केली गेली.
युरोपीय संघाच्या एकल बाजारातून बाहेर पडून ब्रिटन त्यांच्या गरजेनुसार आयात करण्याचे धोरण अवलंबणार असल्याचे ब्रिटनच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. सध्या उत्तर आयर्लंडमध्ये सुरू असलेली लिंबूवर्गीय फळे आणि पाने यांची आयात युरोपियन महासंघाच्या वनस्पती आयात नियमानुसार सुरू राहील.
थोडक्यात, दक्षिण आफ्रिका आणि अन्य उत्पादक देशांना लिंबूवर्गीय फळे आणि पाने ब्रिटनला निर्यात करण्यासाठी कोणत्याही फायटोसॅनेटरी प्रमाणपत्राची किंवा आगावू सूचना देण्याची आवश्यकता नसेल. या प्रक्रियेतील नोकरशाहीवरील अवलंबित्व कमी होणार असून, उत्पादकांना ब्रिटिश बाजारपेठेतील मागणीनुसार त्वरित व जलद प्रतिसाद देता येईल.
अर्थात, सर्व आयातीवर ब्रिटन त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य बंधने टाकू शकते. आयातीतून उद्भवणारे धोके आणि देशांची गरज यावर लक्ष ठेऊन योग्य ते निर्णय घेण्यास शासन बाध्य असल्याचेही प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.