सिट्रस सायला, पाने पोखरणारी अळीचे व्यवस्थापन

मोसंबी व संत्रा पिकावर सिट्रस सायला व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या किडींची ओळख करून योग्य वेळी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
सिट्रस सायला, पाने पोखरणारी अळीचे व्यवस्थापन
सिट्रस सायला, पाने पोखरणारी अळीचे व्यवस्थापन

सद्यःस्थितीत संत्रा व मोसंबीच्या फळबागांना नवीन नवती फुटत असून मोठ्या बागांना मृग बहाराची फुलधारणा होत आहे. मोसंबी व संत्रा पिकावर सिट्रस सायला व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या किडींची ओळख करून योग्य वेळी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सिट्रस सायला या किडीचा प्रौढ पिवळसर करड्या रंगाचा असतो. पंखाच्या विशिष्ट रचनेमुळे त्याचा मागील भाग उंचावल्यासारखा दिसतो. पिल्ले मळकट रंगाची असतात. या किडींची पिल्ले कोवळी पाने व फांद्यातून रस शोषण करतात. परिणामी कोवळी पाने व कळ्यांची गळ होते. त्याचा उत्पादन घटते. व्यवस्थापन :

  • पर्यायी खाद्य वनस्पती (उदा. कढीपत्ता) मोसंबीच्या बागेमध्ये असू नये.
  • प्रति दोन झाडाच्या अंतरावर पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा.
  • ढालकिडा, क्रायसोपा, सिरफीड माशी या मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
  • नवती फुटण्याच्या वेळी म्हणजे जून-जुलै मध्ये सायलाचा प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रती लीटर पाणी
  • थायामेथोक्झाम (२५ डब्ल्युजी) ०.१ ग्रॅम किंवा
  • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.१ मि.ली.
  • गरज भासल्यास १५ दिवसाच्या अंतराने कीटकनाशक बदलून दुसरी फवारणी करावी.
  • पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) : लहान रोपट्यावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. या किडीची अळी फिकट पिवळसर असून, प्रथम अळी अवस्थेत पानात शिरते. पानातील हरित द्रव्य खात पुढे पुढे गेल्याने पानावर नागमोडी रेषा दिसतात. तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये अशी पाने वेडीवाकडी होऊन वाळतात. व्यवस्थापन :

  • लहान झाडावरील कीडग्रस्त पाने तोडून टाकावीत. ही क्रिया फक्त पावसाळ्यातच करावी. नवीन पालवी फुटतेवेळी करू नये.
  • नत्रयुक्त खताचा जास्त प्रमाणात वापर करू नये.
  • सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के ) किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मिली प्रती लीटर प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • अधिक प्रादुर्भाव असल्यास, इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.२५ मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • वरील कीडीचे योग्य वेळी व्यवस्थापन करून होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.
  • डॉ. अनंत बडगुजर (सहाय्यक प्राध्यापक ), ७५८८०८२०२४ डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२००० (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com