agriculture stories in Marathi citrus syla, leaf miner on citrus crop | Agrowon

सिट्रस सायला, पाने पोखरणारी अळीचे व्यवस्थापन

डॉ. अनंत बडगुजर, डॉ. संजोग बोकन
रविवार, 26 जुलै 2020

मोसंबी व संत्रा पिकावर सिट्रस सायला व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या किडींची ओळख करून योग्य वेळी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

सद्यःस्थितीत संत्रा व मोसंबीच्या फळबागांना नवीन नवती फुटत असून मोठ्या बागांना मृग बहाराची फुलधारणा होत आहे. मोसंबी व संत्रा पिकावर सिट्रस सायला व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या किडींची ओळख करून योग्य वेळी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

सिट्रस सायला
या किडीचा प्रौढ पिवळसर करड्या रंगाचा असतो. पंखाच्या विशिष्ट रचनेमुळे त्याचा मागील भाग उंचावल्यासारखा दिसतो. पिल्ले मळकट रंगाची असतात. या किडींची पिल्ले कोवळी पाने व फांद्यातून रस शोषण करतात. परिणामी कोवळी पाने व कळ्यांची गळ होते. त्याचा उत्पादन घटते.

व्यवस्थापन :

 • पर्यायी खाद्य वनस्पती (उदा. कढीपत्ता) मोसंबीच्या बागेमध्ये असू नये.
 • प्रति दोन झाडाच्या अंतरावर पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा.
 • ढालकिडा, क्रायसोपा, सिरफीड माशी या मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
 • नवती फुटण्याच्या वेळी म्हणजे जून-जुलै मध्ये सायलाचा प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रती लीटर पाणी
 • थायामेथोक्झाम (२५ डब्ल्युजी) ०.१ ग्रॅम किंवा
 • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.१ मि.ली.
 • गरज भासल्यास १५ दिवसाच्या अंतराने कीटकनाशक बदलून दुसरी फवारणी करावी.

पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) :
लहान रोपट्यावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो.
या किडीची अळी फिकट पिवळसर असून, प्रथम अळी अवस्थेत पानात शिरते. पानातील हरित द्रव्य खात पुढे पुढे गेल्याने पानावर नागमोडी रेषा दिसतात. तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये अशी पाने वेडीवाकडी होऊन वाळतात.

व्यवस्थापन :

 • लहान झाडावरील कीडग्रस्त पाने तोडून टाकावीत. ही क्रिया फक्त पावसाळ्यातच करावी. नवीन पालवी फुटतेवेळी करू नये.
 • नत्रयुक्त खताचा जास्त प्रमाणात वापर करू नये.
 • सुरुवातीपासून निंबोळी अर्क (५ टक्के ) किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मिली प्रती लीटर प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
 • अधिक प्रादुर्भाव असल्यास, इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.२५ मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • वरील कीडीचे योग्य वेळी व्यवस्थापन करून होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.

डॉ. अनंत बडगुजर (सहाय्यक प्राध्यापक ), ७५८८०८२०२४
डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२०००

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर फळबाग
पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...
सिट्रस सायला, पाने पोखरणारी अळीचे...सद्यःस्थितीत संत्रा व मोसंबीच्या फळबागांना नवीन...
शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढतोय,...शंखी गोगलगाय किंवा शेंबी हे मृदकाय वर्गातील सजीव...
लिंबूवर्गीय फळपिकावरील पाने खाणाऱ्या...सद्यस्थितीत लिंबूवर्गीय फळबागेमध्ये नवीन नवती...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
व्यवस्थापन मोसंबी बहराचेसध्याच्या वातावरणात मोसंबीच्या आंबे बहराच्या...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
प्रयोगशील शेतीतून पीक बदलनोकरीच्या निमित्ताने संजय साळवे यांना गाव सोडावे...
केळी पिकातील खत नियोजनप्रति झाड २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २००...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेतील...गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला, तर काही...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे....
डाळिंबातील बुरशीजन्य मररोगाचे व्यवस्थापनडाळिंब बागेमध्ये सूत्रकृमी, वाळवी, शॉर्ट होल बोरर...
डाळिंब पिकातील बहारनिहाय नियोजनमृगबहार अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची...
तंत्र करवंद लागवडीचेकरवंदाच्या भरपूर जाती आढळतात. डॉ. बाळासाहेब सावंत...
उशिरा खरड छाटणीच्या बागेतील सूक्ष्मघड...सध्याचे वातावरण ः सध्या द्राक्ष विभागामध्ये...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
आधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवडविशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती...