स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वे

दूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी स्वच्छ दुधाच्या बाबतीत आपल्याला प्रचंड काम करावे लागणार आहे. दूध काढण्यापासून संकलन, वाटपापर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वे
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वे

दूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी स्वच्छ दुधाच्या बाबतीत आपल्याला प्रचंड काम करावे लागणार आहे. दूध काढण्यापासून संकलन, वाटपापर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे लागणार आहे. केवळ दूध उत्पादन वाढवण्याकडे आपले सर्व लक्ष एकवटले आहे. मात्र, स्वच्छ दूध उत्पादनाची सर्व तंत्रज्ञान अंगीकारणे आणि अवलंबणे अत्यावश्यक ठरणार आहे. त्यावरच व्यवसायाचे आर्थिक गणित अवलंबून असते. स्वच्छ दूध उत्पादनात रोगजंतूविरहित दुधाची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. गायीच्या दूध हे कितीही पोषक असले तरी त्यात अस्वच्छतेमुळे हानिकारक सूक्ष्मजीव असल्यास त्याचा फायदा होणार नाही. भविष्यात जंतूविरहित दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. गॅट करारामुळे एप्रिल २००४ नंतर पाश्चराईज्ड ग्रेडचे दूध म्हणजे प्रति मिलिलीटर दुधात जास्तीत जास्त ३०,००० जंतू असा निकष आहे. यापेक्षा अधिक जंतू आढळल्यास असे दूध एकतर नाकारले जाईल किंवा त्याचे दर कमी मिळतील. जागतिक स्पर्धेत दूध व्यवसाय टिकणे कठीण होईल. मोठ्या गोठ्यामध्ये व्यावसायिक दूध उत्पादनात हाताने दूध काढण्याऐवजी दूध संकलन यंत्राचा वापर गरजेचा बनत आहे. यामुळे मनुष्यबळामध्ये बचत होण्यासोबतच स्वच्छताही शक्य होते. दूध संकलनातील महत्त्वाच्या बाबी :

  1. जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असावी.
  2. दूध काढताना आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.
  3. दुभती जनावर वेगळी करून त्यांच्या कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी यावरून खरारा करावा.
  4. कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशिअम परमॅंगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने दुभत्या जनावरांची कास व सड धुवावेत.
  5. कास आणि सड स्वच्छ फडक्याने किंवा टॉवेलने पुसून स्वच्छ करावेत. यामुळे रक्ताभिसरण वाढून दुधाळ जनावर तरतरीत होते.
  6. दूध संकलकाने स्वतःचे हात पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने स्वच्छ धुणे.
  7. प्रत्येक सडातील पहिल्या दोन-तीन धारा स्वतंत्र कपात काढाव्यात. नंतरच दुधाच्या भांड्यात दूध काढावे. कपात काढलेले दूध (२० ते २५ मिली) फेकून द्यावे. कारण त्यात जंतूचे प्रमाण जास्त असते.
  8. दूध काढण्याची प्रक्रिया पूर्ण मूठ पद्धतीने सुमारे सात ते आठ मिनिटांत पूर्ण करावी.
  9. दूध काढण्यासाठी विशिष्ट आकाराची भांडी वापरावीत.
  10. दूध काढताना जनावरांस शक्यतो वाळलेली वैरण, घास खायला घालू नये. फक्त अंबोण द्यावे.
  11. स्वच्छ दूध कोरड्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावे.
  12. दूध संकलनानंतर गाय-म्हशीचे चारही सड औषधी द्रावणात बुडवून घ्यावेत.

योग्य ती स्वच्छता राखून दूध संकलन करत राहिल्यास गाय-म्हशीच्या कासेचे आरोग्य अबाधित राहते. त्यांना सुप्त स्तनदाह होण्याची शक्यता अजिबात नसते. तसेच दूध उत्पादनातही काही प्रमाणात वाढ दिसून येते. डॉ. विवेक गोंगल, ७५०७४६६७२५ (पशुउत्पादन व व्यवस्थापन विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, राजेंद्रनगर, हैदराबाद.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com