agriculture stories in marathi Clean & microbes free milk mission | Page 2 ||| Agrowon

स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वे

डॉ. विवेक गोंगल
मंगळवार, 30 जून 2020

दूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी स्वच्छ दुधाच्या बाबतीत आपल्याला प्रचंड काम करावे लागणार आहे. दूध काढण्यापासून संकलन, वाटपापर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

दूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी स्वच्छ दुधाच्या बाबतीत आपल्याला प्रचंड काम करावे लागणार आहे. दूध काढण्यापासून संकलन, वाटपापर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

केवळ दूध उत्पादन वाढवण्याकडे आपले सर्व लक्ष एकवटले आहे. मात्र, स्वच्छ दूध उत्पादनाची सर्व तंत्रज्ञान अंगीकारणे आणि अवलंबणे अत्यावश्यक ठरणार आहे. त्यावरच व्यवसायाचे आर्थिक गणित अवलंबून असते. स्वच्छ दूध उत्पादनात रोगजंतूविरहित दुधाची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. गायीच्या दूध हे कितीही पोषक असले तरी त्यात अस्वच्छतेमुळे हानिकारक सूक्ष्मजीव असल्यास त्याचा फायदा होणार नाही. भविष्यात जंतूविरहित दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. गॅट करारामुळे एप्रिल २००४ नंतर पाश्चराईज्ड ग्रेडचे दूध म्हणजे प्रति मिलिलीटर दुधात जास्तीत जास्त ३०,००० जंतू असा निकष आहे. यापेक्षा अधिक जंतू आढळल्यास असे दूध एकतर नाकारले जाईल किंवा त्याचे दर कमी मिळतील. जागतिक स्पर्धेत दूध व्यवसाय टिकणे कठीण होईल.

मोठ्या गोठ्यामध्ये व्यावसायिक दूध उत्पादनात हाताने दूध काढण्याऐवजी दूध संकलन यंत्राचा वापर गरजेचा बनत आहे. यामुळे मनुष्यबळामध्ये बचत होण्यासोबतच स्वच्छताही शक्य होते.

दूध संकलनातील महत्त्वाच्या बाबी :

 1. जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असावी.
 2. दूध काढताना आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.
 3. दुभती जनावर वेगळी करून त्यांच्या कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी यावरून खरारा करावा.
 4. कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशिअम परमॅंगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने दुभत्या जनावरांची कास व सड धुवावेत.
 5. कास आणि सड स्वच्छ फडक्याने किंवा टॉवेलने पुसून स्वच्छ करावेत. यामुळे रक्ताभिसरण वाढून दुधाळ जनावर तरतरीत होते.
 6. दूध संकलकाने स्वतःचे हात पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाने स्वच्छ धुणे.
 7. प्रत्येक सडातील पहिल्या दोन-तीन धारा स्वतंत्र कपात काढाव्यात. नंतरच दुधाच्या भांड्यात दूध काढावे. कपात काढलेले दूध (२० ते २५ मिली) फेकून द्यावे. कारण त्यात जंतूचे प्रमाण जास्त असते.
 8. दूध काढण्याची प्रक्रिया पूर्ण मूठ पद्धतीने सुमारे सात ते आठ मिनिटांत पूर्ण करावी.
 9. दूध काढण्यासाठी विशिष्ट आकाराची भांडी वापरावीत.
 10. दूध काढताना जनावरांस शक्यतो वाळलेली वैरण, घास खायला घालू नये. फक्त अंबोण द्यावे.
 11. स्वच्छ दूध कोरड्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावे.
 12. दूध संकलनानंतर गाय-म्हशीचे चारही सड औषधी द्रावणात बुडवून घ्यावेत.

योग्य ती स्वच्छता राखून दूध संकलन करत राहिल्यास गाय-म्हशीच्या कासेचे आरोग्य अबाधित राहते. त्यांना सुप्त स्तनदाह होण्याची शक्यता अजिबात नसते. तसेच दूध उत्पादनातही काही प्रमाणात वाढ दिसून येते.

डॉ. विवेक गोंगल, ७५०७४६६७२५
(पशुउत्पादन व व्यवस्थापन विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, राजेंद्रनगर, हैदराबाद.)


इतर कृषिपूरक
गाई, म्हशींसाठी संतुलित आहारगाई, म्हशींच्या अवस्थेनुसार पाणी, खुराक मिश्रण,...
दूध व्यवसायाची नव्याने करा मांडणीदेशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक,...
गाई, म्हशीतील माज ओळखागाई, म्हशींचा माज ओळखणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण...
जनावरांतील निदानासाठी क्ष-किरण तपासणीक्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह,...
दुधाळ जनावरांना द्या सकस आहारगाई, म्हशींच्या आहारात सुका वैरण, हिरवा चारा व...
जनावरांचे आरोग्य सांभाळा...तापमानात होणारा बदल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता...
संवर्धन चितल माशांचेचितलमाशांचे बीज पाण्यात सोडण्यापूर्वी तलावाला...
वेळेवर करा कोंबड्यातील जंतनिर्मूलनकोंबड्यामध्ये गोलकृमी, चपटेकृमी व गेपवर्म...
शेळ्यांच्या आहारात द्या खाद्य मिश्रणशेळ्यांच्या गरजेनुसार पशुखाद्याचा वापर केल्यामुळे...
नवजात वासराचे योग्य संगोपन महत्त्वाचेजन्मल्यानंतर पहिल्या २ ते ३ तासांत वासराला चीक...
वेळेत करा जनावरांचे लसीकरणलसीकरणापूर्वी एक आठवडा पशुपालकांनी आपल्या...
दुधाळ जनावरांतील बाह्यपरजीवींचे निर्मूलनबाह्यपरजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरे...
पर्यावरण संतुलनामध्ये मधमाशी महत्त्वाची...निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये मधमाशीची महत्त्वाची...
गाई,म्हशीतील कासदाह ओळखा, उपचार कराकासदाह हा दुधाळ जनावरांचा घातक आजार आहे....
जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी...जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू,...
चारा टंचाईच्या काळातील पशुआहार...उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला...
शेळ्यांसाठी दशरथ घासदशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते...
दूध एक ‘पोषक आहार’१ जून हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो....
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...