agriculture stories in marathi commercial vermicompost project report | Agrowon

व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणी

अनिल महादार
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

भाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत गटांच्या प्रमुख महिलांनी सायंकाळी आठ वाजता समाजमंदिरात मीटिंग आयोजित केली. तसा निरोप सुनीताताईंनी सर्वांना पाठविला. पुण्यामध्ये नोकरी केल्यानंतर निवृत्त झालेल्या भाऊसाहेबांनी गावात घर बांधले होते. महिन्यातील काही दिवस ते हमखास गावी घालवत. निवृत्तीनंतर स्वतःच्या शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली होती. मात्र, चळवळ्या स्वभावामुळे गावातील समाजकारणातही धडपड सुरू असे. गावामध्ये बचत गटांच्या स्थापनेसाठी महिलांना प्रोत्साहन दिले. अचूक सल्ले आणि बोलक्या स्वभावामुळे गावकरी त्यांच्यावर खूश होते.

भाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत गटांच्या प्रमुख महिलांनी सायंकाळी आठ वाजता समाजमंदिरात मीटिंग आयोजित केली. तसा निरोप सुनीताताईंनी सर्वांना पाठविला. पुण्यामध्ये नोकरी केल्यानंतर निवृत्त झालेल्या भाऊसाहेबांनी गावात घर बांधले होते. महिन्यातील काही दिवस ते हमखास गावी घालवत. निवृत्तीनंतर स्वतःच्या शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली होती. मात्र, चळवळ्या स्वभावामुळे गावातील समाजकारणातही धडपड सुरू असे. गावामध्ये बचत गटांच्या स्थापनेसाठी महिलांना प्रोत्साहन दिले. अचूक सल्ले आणि बोलक्या स्वभावामुळे गावकरी त्यांच्यावर खूश होते.

गावातील महिला बचत गटांची डेअरी उत्तम चालू झाली होती. भाऊसाहेबांनी थोडेसे प्रयत्न करून बचत गटांतील महिलांना बँकेचे अर्थसाह्य मिळवून दिले होते. त्यातून काही महिलांनी संकरित गायी विकत घेतल्या होत्या. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या होत्या. भाऊसाहेबांचे मार्गदर्शन महिलांना, त्यांच्या कुटुंबांना फायदेशीर ठरले होते. त्यातून त्यांच्या शब्दाला एक वजन मिळाले होते. ते गावात येणार या निमित्ताने बैठका घेतल्या जात.

समाजमंदिरात सर्वजण जमा झाले. बघता बघता गावात १० बचत गट सुरू झाले होते. त्याच्या सर्व सदस्य महिला जमा झाल्या होत्या. भाऊसाहेबांसोबत दुधाचे संकलन, बचत गटांचे काम, हिशोब, नोंदी याप्रमाणेच अडीअडचणी याबाबत नेहमीप्रमाणे चर्चा झाली. शेवटी त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या पिशवीतून एका कागदावर काहीतरी ओतले. ओलसर मातीप्रमाणे दिसणाऱ्या त्याकडे सर्वांचे लक्ष वेधत त्यांनी सांगितले, “हे आहे खत. ओळखा कशाचे खत आहे?’’ मग त्या मातीसारख्या पण रवाळ अशा गांडूळखताची त्यांनी माहिती सांगितली. जमिनीचा पोत सुधारतो. जलधारणा शक्ती वाढते. जमिनीची धूप कमी होते. जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढते. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत वाढ होते, असे अनेक फायदे सर्वांना समजावले. नंतर सर्व हे खत तयार करणार आहोत, हेही सांगितले. आता प्रत्येकाकडे किमान दोन गाई होत्या. त्यांचे शेणही मुबलक होते. सध्या ते केवळ शेणखत खड्ड्यात पडे. हंगामाच्या सुरुवातीला स्वतःच्या शेतात वापरले जाई. या शेणखतापासून गांडूळखत तयार करता येते. ते एखाद्या बचत गटाने करावे, असे भाऊसाहेबांनी सुचवले. गावातील सर्व बचत गटांच्या समन्वयक म्हणून सुनीताताई काम करत. त्यांच्यावर सर्व माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी बचत गटांतील महिला व अन्य कुटुंबाकडे किती गाई, म्हशी आहेत याचा आढावा घेतला. जनावरांची संख्या, दररोज किती शेण व पालापाचोळा मिळू शकेल, घराघरांतून किती ओला कचरा मिळू शकेल, याचा अंदाज घेतला. ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्यांशी बोलून गावातील ओला कचरा मिळवण्यासोबतच गांडूळखत प्रकल्पास जागा उपलब्धतेचीही विचारणा केली. गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीनेही हा प्रकल्प आवश्यकच असल्याने त्यांच्याकडून तसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भाऊसाहेबांनी स्पष्ट केले, ‘‘या गांडूळखत प्रकल्पास लागणारा कच्चा माल, शेण, पालापाचोळा व ओला कचरा हा तसा मोफत किंवा केवळ वाहतुकीच्या खर्चात मिळू शकतो. मात्र, त्यापासून तयार होणारे खत पिकांसाठी मौल्यवान आहे. त्याला बागायतदारांकडून चांगला दर मिळू शकतो.’’

भाऊसाहेबांनी दिलेल्या वेगळ्या विचारामुळे महिलांच्या विचाराला चालना मिळाली. गांडूळखताविषयी अधिक तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी सुनीताताईंनी कृषी विभागाशी संपर्क साधला. त्यांच्याकडून उत्तम दर्जाची गांडुळे कोठे मिळतील, या माहिती बरोबरच वेगवेगळ्या योजनांची माहिती घेतली. महिलांचा उत्साह पाहून तालुका कृषी अधिकारीही खूश झाले. ते म्हणाले, ‘‘मी स्वत: व आमचे अधिकारी तुमच्या गावी येऊन सर्व प्रकल्प समजाऊन देतो. प्रकल्प उभा करण्यासाठी लागेल ती मदत आम्ही देऊ. वाटल्यास आमच्या संपर्कातून खत विक्रीलाही शक्य तितकी मदत करू.’’ त्यांच्या मदतीमुळे भारावलेल्या महिला गावी आल्यानंतर प्रकल्प उभारणीच्या कामाला लागल्या. दरम्यान, एकदा कृषी सहायक व अधिकारी भेटून गेले. त्यांनी एकूण शेण व ओला कचरा याचा अंदाज घेतला. ग्रामपंचायतीने सुचवलेली प्रकल्पाची जागा पाहिली. त्यानुसार बांधायच्या शेड, त्यातील बांधकाम याविषयी माहिती दिली. त्यांच्याकडे उपलब्ध असलेला प्रकल्पाचा एक नमुनाही दिला. महिलांचे काम सोपे झाले. त्यांनी जुन्या प्रकल्प अहवालाप्रमाणे मांडणी करून आपला प्रकल्प अहवाल तयार केला. तो भाऊसाहेबांसह जाऊन बँकेत सादर केला.

गांडूळखताच्या व्यावसायिक प्रकल्पासाठी...

केवळ स्वतःपुरते इतक्या विचाराने गांडूळखत प्रकल्प राबवणे आणि व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प राबवणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. ते लक्षात घेऊन उपलब्ध कच्चा माल, वाहतूक, आवश्यक मनुष्यबळ आणि विक्री यांचे एक गणित मांडावे लागते.
१. कच्चा माल : ग्रामीण भागामध्ये बहुतेकांकडे गाई, म्हशी किंवा जनावरे असतात. अशा अनेक शेतकऱ्यांनी मिळून जवळ एकत्रित गांडूळ खत प्रकल्प व्यावसायिक दृष्टिकोनातून राबवल्यास फायदेशीर ठरते. यासाठीचा कच्चा माल मोफत किंवा स्वस्तामध्ये उपलब्ध होऊ शकतो.
२. शेड, बांधकाम व खतासाठी वाफे : ६ ते ८ वाफ्यासाठी अर्धा एकर क्षेत्र आवश्यक असते. जमीन ही पाण्याचा निचरा होणारी, थोडी उंचावर असावी. वाफ्याचा आकार १५ मीटर लांब x १.५ मीटर रुंद x ०.५ मीटर ऊंच असा असावा. शक्यतो चारही बाजूने विटांचे किमान अर्ध्यापर्यंत बांधकाम करावे. शेडवरील आच्छादन हे स्थानिक घटकांपासून, कमी खर्चात तयार करावे. उदा. एकूण वाफ्याची संख्या: २४, वार्षिक उत्पादन सुमारे २०० टन) खत तयार होण्याचा कालावधी:- ६५ -७९ दिवस, वर्षातून ५-६ वेळा खत मिळू शकेल.
३. पाणी : वाफ्यामध्ये ५०% ओलावा ठेवावा लागतो. त्यामुळे शेडजवळ पाण्याची सोय असावी.
४. गांडूळे : गांडूळखतासाठी परदेशी दोन तीन जाती प्रसिद्ध आहेत. त्यातील योग्य ती जात निवडून, दर घनमीटरसाठी एक किलोग्रॅम या प्रमाणे गांडूळे खरेदी करावीत. गांडुळांचे पुनरुत्पादन जलद होते. सुरुवातीला एकदा गांडुळे सोडल्यानंतर ती पुन्हा सोडावी लागत नाही.
५. साहित्य : वाफे तयार करणे, माती आणणे, खत उचलणे, पाणीपुरवठा, पॅकिंग करणे यासाठी
आवश्यक साहित्य खरेदी.
६. वाहतूक : कच्चा माल आणणे व खत पुरवठा यासाठी वाहतुकीची व्यवस्था.
७. मजूर : कुशल व अकुशल या दोन्ही प्रकारच्या मजुरांची आवश्यकता असते.
 


इतर कृषिपूरक
अनुदानाचा योग्य विनियोगअनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच...
आजारांपासून कोंबड्यांचे संरक्षणकोंबड्यांना होणाऱ्या आजारांचे वेळीच व्यवस्थापन...
बदलत्या हवामानानुसार जनावरांचे...बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा,...
उत्पादन धिंगरी अळिंबीचेअळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने...
फायदेशीर पशुपालनाचे तंत्रगाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे...
गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापरआपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा...
स्वच्छतेतून वाढते दुधाची गुणवत्तादुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक...
अॅझोलाः एक आरोग्यदायी पशुखाद्य जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि...
दुधातील फॅट कमी राहण्याची कारणे,...दुधातील स्निग्धांश (फॅट) हा प्रतवारीच्या दृष्टीने...
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन...स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि...
उन्हाळ्यातील जनावरांच्या प्रजनन समस्याउन्हाळ्यात जनावरे चारा कमी व पाणी जास्त पितात....
जनावरातील गोचीड नियंत्रणउन्हाळ्यात जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात गोचीडांचा...
चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया...उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही...
ओळख पशू संस्थांची...पुण्यश्‍लोक...पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी...
पशुप्रजननातील संभाव्य अडथळे ओळखाप्रजनन व्यवस्थापनात ऋतुमानानुसार, तांत्रिक...
जाणून घ्या कमी अंडी उत्पादनाची कारणे,...देशी कोंबड्यांचे अंडी उत्पादन मुळातच कमी असते आणि...
दुधाळ जनावरांचे उन्हाळ्यातील आहार...नैसर्गिक आपत्ती नियोजन व व्यवस्थापनाबद्दलची...
जनावरांतील मायांग बाहेर येण्याची समस्याम्हशीमधील मायांग बाहेर येण्याचे प्रमाण इतर बाकी...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...