agriculture stories in marathi control of dahiya disease in cotton crop | Agrowon

कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. शैलेश गावंडे, डॉ. निळकंठ हिरेमनी, डॉ. दीपक नगराळे, डॉ. नंदिनी गोकटे-नरखेडकर, डॉ. विजय वाघमारे
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शेतात उभे असते. या दरम्यान झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थेत वातावरणानुसार अनेक जैविक आणि अजैविक घटकांचा कपाशीच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो. त्यामध्ये विविध रोगांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून दहिया किंवा पानांवरील पांढरे तांबडे डाग या रोगाचा कपाशीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसून येतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत दहिया या रोगाचा प्रादुर्भाव केवळ देशी कपाशीवर (शास्त्रीय नाव - गॉसिपिअम अरबोरीयम) दिसायचा. मात्र, अलीकडे काही वर्षांपासून दहिया किंवा पानांवरील तांबडे डाग हा रोग अमेरिकन कपाशीवरही (शा.

कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शेतात उभे असते. या दरम्यान झाडाच्या वेगवेगळ्या अवस्थेत वातावरणानुसार अनेक जैविक आणि अजैविक घटकांचा कपाशीच्या उत्पादनावर परिणाम दिसून येतो. त्यामध्ये विविध रोगांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून दहिया किंवा पानांवरील पांढरे तांबडे डाग या रोगाचा कपाशीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसून येतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत दहिया या रोगाचा प्रादुर्भाव केवळ देशी कपाशीवर (शास्त्रीय नाव - गॉसिपिअम अरबोरीयम) दिसायचा. मात्र, अलीकडे काही वर्षांपासून दहिया किंवा पानांवरील तांबडे डाग हा रोग अमेरिकन कपाशीवरही (शा. नाव - गॉसिपिअम हिरसुटम) दिसून येत आहे. 

प्रादुर्भावाची मुख्य कारणे 

 •     बी. टी. कपाशीचे संकरित व रोग संवेदनशील वाणांची वाढलेली लागवड. 
 •     हवामानातील बदलाचे परिणाम. 

प्रमुख लक्षणे 

 • हवामानातील अधिक सापेक्ष आर्द्रता व कमी होत जाणारे तापमान रोगासाठी कारणीभूत ठरते. प्रामुख्याने जुन्या पानांवर वातावरणातील तापमान कमी झाले, की पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते. 
 • रोगग्रस्त पाने दही शिंपडल्यासारखी दिसतात. 
 •  या रोगाच्या लक्षणामध्ये सुरवातीला पानांवर अनियमित, टोकदार पांढरट असे १-१० मि.मी. आकाराचे चट्टे पानांच्या शिरांभोवती आढळून येतात. 
 •  पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूस अधिक प्रादुर्भाव होतो. 
 •  रोगाचे प्रमाण अधिक असेल तर पाने पिवळी तसेच तपकिरी रंगाची पडून सुकून गळून पडतात. 

नुकसान 
    कपाशी पिकामध्ये दहिया रोगाच्या प्रादुर्भावाचा फटका उत्पादकतेस बसत आहे. या रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण ३८ ते ७५ टक्क्यांपर्यंत नोंदवले गेले आहे. 

रोगाची कारणे व रोगवाढीस अनुकूल घटक

 • कपाशीवर दहिया रोग रॅमुलारिया अरेओला (Ramularia  areola) या बुरशीमुळे होतो. 
 • ही बुरशी उन्हाळ्यात प्रादुर्भावग्रस्त पीक अवशेषामध्ये राहते. 
 • बारमाही किंवा स्वयंअंकुरित झालेल्या कपाशीच्या झाडांवरही जिवंत राहते. 
 • प्रादुर्भावग्रस्त काडीकचरा हा दहिया रोगाच्या प्रसाराचा मुख्य स्रोत आहे. वारा, पाऊस आणि सिंचनाचे पाणी हे प्रमुख घटक या रोगाच्या दुय्यम प्रसारास कारणीभूत ठरतात. 

एकात्मिक व्यवस्थापन   

 • स्वयंअंकुरित कपाशीची झाडे शेतातून उपटून टाकावीत. प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.
 • नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.
 • कपाशीचे वाण व माती परिस्थिती योग्य बघून लागवडीचे अंतर ठेवावे. शिफारशीत वाणाची सघन पद्धतीने लागवड करावी. 
 • सुरवातीला रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कार्बेन्डाझीम (५० डब्लूपी) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
 • प्रादुर्भाव जास्त असल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी
  पायरॅक्लोस्ट्रॉबिन (२० टक्के डब्लू.जी.)     १ ग्रॅम किंवा 
  मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रबिन (५ टक्के डब्लू.जी.)     २ ग्रॅम. 

 : डॉ. शैलेश गावंडे, ९४०१९९३६८५
(केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)


इतर नगदी पिके
नियोजन आडसाली ऊस लागवडीचे...राज्यामध्ये उसाची लागवड आडसाली, पूर्वहंगामी आणि...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...