भातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण

खरीप भात पिकांमध्ये सातत्याचे ढगाळ व दमट वातावरण यामुळे करपा, कडा करपा, आभासमय काजळी, पेरावरील करपा (शीथ ब्लाईट) रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो.
भातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण
भातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण

खरीप भात पिकांमध्ये सातत्याचे ढगाळ व दमट वातावरण यामुळे करपा, कडा करपा, आभासमय काजळी, पेरावरील करपा (शीथ ब्लाईट) रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. 

करपा    पानावर व पेऱ्यांवर तांबूस, निळसर, राखाडी ठिपके पडतात. ठिपके दोन्ही बाजूस निमुळते व मध्ये फुगीर असतात.    लोंबीच्या दांड्यावरही हा रोग झाल्यास दांडा कुजतो व पळिंज होते. यास मानमोडी असेही म्हणतात.     महाराष्ट्रातील सर्व भात उत्पादक पट्ट्यात आढळतो. भरपूर दमट, थंड हवा, २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमानामध्ये या बुरशीजन्य रोगाची वाढ भरपूर होते. अशा हवामानातही खाचरात भरपूर पाणी असल्यास या रोगाची वाढ नीट होत नाही. पाणी कमी झाल्यावर रोगाची तीव्रता वाढते. रोगाच्या तीव्रतेप्रमाणे २५ ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.  रोगवाढीस अनुकूल बाबी :   रोगग्रस्त बियाणे वापरल्यास.          नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर.    कमी सूर्यप्रकाश.   पावसाळी दिवस व दमट वातावरण. प्रतिबंधक उपाय :    रोगग्रस्त बियाण्यांचा वापर टाळावा.      रोगप्रतिकारक बियाण्यांचा वापर करावा.    नत्रयुक्त खतांचा वापर एकाच वेळी न करता दोन  ते तीन वेळी विभागून करावा.    शेणखताचा वापर करावा.                 रोगग्रस्त धसकटे व कचरा जाळावा.     पेरणी केल्यानंतर पिकाची २१ ते २५ दिवसांनी रोवणी आणि दोन चुडातील अंतर शिफारशीनुसार  ठेवावे.    आंतरमशागतीची कामे पीक निसवण्यापूर्वी एक महिन्याअगोदर संपवावी. रोगाचा प्रसार :    रोगग्रस्त बियाण्यांद्वारे प्राथमिक प्रादुर्भाव क्षेत्रात होऊ शकतो.     शेतीतील पिकांचे अवशेष, पेंढा इ.     बांधावरील रानटी भात, विविध गवतांवर बुरशी जीवंत राहते. व्यवस्थापन :     बीज प्रक्रिया ः कॅप्टन २ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे.      रोपवाटिकेत किंवा लागवडीनंतर १५ दिवसांनी पानावर करपा रोगाची लक्षणे दिसताच फवारणी प्रती लिटर पाणी    कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.२ मिली किंवा ट्रायसायक्लॅझोल ०.७ ग्रॅम.

कडा करपा     अणुजीवापासून होणाऱ्या कडा करपा रोगाच्या प्रादुर्भावास दमट व साधारण उष्ण हवामान (८८ ते ९२ टक्के आर्द्रता व २८ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमान) कारणीभूत ठरते. नत्राची मात्रा जास्त असलेल्या पिकावर प्रादुर्भाव जास्त होतो.     लक्षणे ः पानावर हिरवट पिवळसर व पानाच्या शेंड्यांकडून खाली, तसेच शिरेकडे आत वाढणाऱ्या नागमोडी रेषा तयार होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास या रेषा एकमेकात मिसळून पांढऱ्या पट्ट्या बनतात. त्या पानाच्या देठापर्यंत वाढत जातात. पूर्ण फुटवे कुजतात, या अवस्थेला क्रेसेक अवस्था म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव पानावर झाल्यास नुकसान सर्वाधिक होते.     रोगाचा प्रसार :    बियाणे, रोगग्रस्त पेंढा, चोथे व खाचरातून वाहणारे पाणी यातून.     रोगग्रस्त शेतातील धसकटे, रानटी भात, गवत, नागरमोथा या तणांवर जिवाणू वाढतात.  नुकसान ः   सर्वसाधारणपणे ८ ते १० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.   रोगाचे प्रमाण वाढू नये यासाठी प्रादुर्भाव सुरू झालेल्या खाचरात पाणी कमीत कमी ठेवावे.  नत्रयुक्त खतेही माफक द्यावीत.  व्यवस्थापन :  कॉपर ऑॅक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.५ ग्रॅम प्रती १० लिटर या प्रमाणे लागवडीनंतर १० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या नॅपसॅक पंपाने कराव्यात.

आभासमय काजळी भाताचे पीक फुलोऱ्यात असताना ढगाळ व पावसाळी हवामान टिकून राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पीक फुलोऱ्यावर येऊन लोंब्या भरून येईपर्यंत प्रादुर्भाव समजत नाही. लोंब्या भरत असताना दाणे न भरता पिवळसर हिरवट मखमलीसारख्या चपट्या गोल गाठी तयार होतात. जुन्या गाठी हिरवट पिंगट, काळपट, फुललेल्या दिसतात.  अनुकूल वातावरण ः     या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.    पाऊस जास्त असल्यास या रोगाचे प्रमाण जास्त असते.  भारी जमीन व भरपूर पाणीपुरवठा  रोगास अनुकूल ठरतो. टाळण्यासाठी भारी जमिनीत मध्यम गरव्या जाती लावू नयेत. पीक फुलोऱ्यात असताना खाचरात पाणी माफक ठेवावे.   व्यवस्थापन :     या रोगाच्या नियंत्रणासाठी तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर थायरम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे चोळून पेरणी करावी.    हलके रोगट बी जाळावे.  रोगट लोंब्या नष्ट कराव्यात.     या रोगाच्या नियंत्रणासाठी, फुलोऱ्यावेळी फवारणी प्रती लिटर पाणी कॉपर हायड्रॉक्साईड (७७ टक्के) २.६ ग्रॅम.

शिथ ब्लाईट  हा  बुरशीजन्य रोग हंगामाच्या शेवटी आढळून येतो. रोगाची लक्षण फुटवे तयार होण्याच्या वेळी खालील पानांवर पाण्याच्या पातळीजवळ आढळून येतात. लांबोडे किंवा दीर्घवर्तुळाकार हिरवट राखाडी, सुमारे १ सें.मी. लांबीचे चट्टे असतात. हे चट्टे नियमित गर्द तांबडे किनारे आणि मध्यभागी राखाडी असतात.    रोगग्रस्त झाडांना चांगले दाणे भरत नाहीत.     ढगाळ, दमट हवा आणि उष्ण तापमान रोगवाढीस अनुकूल.  रोगाचा प्रसार : जमिनीतून व बियाणांद्वारे होतो. व्यवस्थापन :   नत्रयुक्त खते शिफारशीइतकीच २-३ वेळा विभागून द्यावीत.    तण व इतर झाडे मुळापासून उपटून नष्ट करावेत.   सुडोमोनास फ्ल्युरोसन्स २.५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणे फवारणी केल्यास रोगाचे प्रमाण कमी होते.  फवारणी : प्रति लिटर पाणी प्रॉपिकोनॅझोल (२५ ईसी) १ मिली किंवा हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) २ मिली किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम.

   प्रवीण देशपांडे , ९४२१८३०४३९    डॉ. व्ही. जी. नागदेवते , ९४२१८००५९०      डॉ. व्ही. एन. सिडाम , ९७६६५२९४३६                                      (कृषी विज्ञान  केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com