agriculture stories in marathi control of podfly in pigeon pea | Agrowon

तुरीवरील शेंगमाशीचे नियंत्रण

डॉ. भैयासाहेब गायकवाड, डॉ. हनुमान गरुड
मंगळवार, 14 जानेवारी 2020

तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. सध्या अनेक ठिकाणी तूर पीक फुले व शेंगांनी लगडलेले आहे. मात्र, गेल्या ७ ते ८ वर्षात तुरीवर शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी अडकण तयार होते. घाटेअळीनंतर या किडीचा नुकसान करण्यात दुसरा क्रमांक लागतो.

तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. सध्या अनेक ठिकाणी तूर पीक फुले व शेंगांनी लगडलेले आहे. मात्र, गेल्या ७ ते ८ वर्षात तुरीवर शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी अडकण तयार होते. घाटेअळीनंतर या किडीचा नुकसान करण्यात दुसरा क्रमांक लागतो.

जीवनक्रम :
शेंगमाशी आकाराने १.५ मि.मी.लांब असते. माशीचा रंग हिरवट असतो. मादी नरापेक्षा किंचित मोठी असते. पुढील पंखाची लांबी ४ मि.मी. असते. मादी शेंगाच्या आत सालीमधून पांढऱ्या रंगाची लंबगोलाकार अंडी घालते. अंड्यातून ३-८ दिवसात पाय नसणारी अळी बाहेर पडते. अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असते. सुरुवातीस दाण्याचा पृष्ठभाग कुरतडून खाल्याने दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. संपूर्ण अळी अवस्था सुमारे १२-१८ दिवसात एका शेंगेत, एका दाण्यावरच पूर्ण करते. त्यानंतर ती शेंगेमध्येच कोशावस्थेत जाते. कोश हा दाण्याच्या बाहेर, परंतू शेंगेत असतो. कोश तपकिरी रंगाचे असून लंबगोलाकृती असतात. सुरुवातीला हा कोश पिवळसर लांब असून नंतर तपकिरी रंगाचा होतो. कोशावस्था ४-९ दिवसात पूर्ण होऊन शेंगेचे पातळ आवरण फोडून माशी शेंगेबाहेर पडते. अशा रितीने शेंगमाशी जीवनक्रम २०-२८ दिवसात पूर्ण करते.

नुकसानीचा प्रकार :
सुरुवातीस शेंगेवर किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, वाढ झालेली अळी कोशावस्थेत जाण्यापूर्वी छिद्र पाडते व छिद्रातून माशी बाहेर पडते, तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळून येतो. अळी सुरुवातीस दाण्याचा पृष्ठभाग कुरतडते व दाण्यावर खाचा तयार करते. व दाण्याला नुकसान करते. हा दाणा डाळ करण्यास योग्य अथवा पेरणी करण्यास योग्य राहत नाही, याला स्थानिक भाषेत ‘अडकण’ असे म्हणतात. प्रत व वजनामध्ये घसरण होते.

व्यवस्थापन :
पिकांचे वारंवार सर्वेक्षण करावे.
प्रादुर्भाव आढळल्यास डायमिथोएट (३० ई.सी.) १ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

डॉ. भैयासाहेब गायकवाड, ९४२०४५९८०८
(कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, ता. गेवराई, जि. बीडअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर कृषी सल्ला
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
..हे आहेत सुपीकता, उत्पादकतेवर परिणाम...पिके मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून नत्र आणि पालाश...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
कृषी सल्लावाल  फुलोरा अवस्था वाल पिकावरील शेंगा...
तुरीवरील शेंगमाशीचे नियंत्रणतूर हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे....
भविष्यासाठी नद्या जपण्याची गरजप्रत्यक्ष जीवनामध्ये हवामानाचे विविध बदल जाणवून...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...
अशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारीद्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे....
राज्यात थंडीचे प्रमाण सामान्य राहील सह्याद्री पर्वतरांगांवर हवेचा दाब १०१४...
एल निनो म्हणजे नेमके काय ?हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या...
गारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजनामराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व...
असे करा आंब्यावरील तुडतुड्यांचे नियंत्रणलांबलेल्या पावसामुळे आंबा पिकातील पालवीचा कालावधी...