अळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण 

अळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण 
अळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी नियंत्रण 

फॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. मका पिकात मुख्य प्रादुर्भाव दिसत असला तरी उसावरही या किडीने हल्ला चढवला आहे. ज्वारी, नाचणी आदी पिकांनाही या किडीचा मोठा धोका आहेच. ही अळी मका पिकाच्या पोंग्यात राहात असल्याने तिचा आढळ व नियंत्रण या बाबी अडचणीच्या असतात. त्यामुळे अळीची नेमकी ओळख पटविण्यासाठी तिची खास वैशिष्ट्ये व नुकसानीचा प्रकार जाणून घेतल्यास वेळीच निदान होऊन नियंत्रण करणे व पीक नुकसानीपासून वाचविणे शेतकऱ्यांना सोपे होणार आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.  अमेरिकन लष्करी अळी कशी ओळखाल? 

  • अळी अवस्था जवळपास सहा अवस्थांमधून पूर्ण. 
  • प्रथम अवस्थेतील लहान अळ्या रंगाने हिरव्या. डोके काळ्या रंगाचे असते. 
  • दुसऱ्या अवस्थेतीस अळीचे डोके तपकिरी रंगाचे. 
  • तिसऱ्या अवस्थेमध्ये अळीचा रंग तपकिरी. 
  • अंगावर वरच्या बाजूने तीन पांढऱ्या रेषा. 
  • चौथ्या ते सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर उंचवट्याचे सारखे ठिपके. 
  • कोष व पतंग कसा ओळखाल? 

  • पूर्ण वाढ झालेली अळी २ ते ८ सेंटिमीटर जमिनीत जाऊन मातीचे वेस्टन करते. त्यात ती कोषावस्थेत जाते. 
  • कोष लालसर तपकिरी रंगाचा. 
  • नर पतंग राखाडी ते तपकिरी रंगाचा. 
  • पुढील पंखाच्या वरच्या कडेला त्रिकोणी आकारात पांढरा ठिपका. 
  • पंखाच्या मध्यभागी गोल ठिपका. 
  • मादी पतंगाचे पुढील पंख राखाडी व एकाच रंगाचे. 
  • नर आणि मादीत मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचे. 
  • अळीचा जीवनक्रम- ३२ ते ४६ दिवसांचा. 
  • लष्करी अळी ओळखण्याची विशेष खूण 

  • अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट इंग्रजी ‘Y’ आकाराची खूण. 
  • अळीच्या आठव्या बॉडी सेगमेंटवर चौकोनी आकारात चार ठिपके. 
  • त्या चार ठिपक्‍यांमध्ये केस आढळतात. 
  • अळीच्या शरीरावर अन्यत्र कुठेही अशी ठेवण नाही. 
  • नुकसानीच्या प्रकारावरून अळीचे निदान 

  • रोपावस्थेतील मका पिकाच्या पानांवर सुरुवातीची लक्षणे दिसतात. 
  • पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळ्या पाने खरवडून खातात. त्याचे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसतात. 
  • लहान रोपांवर ही लक्षणे दिसल्यास हा अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याचे लक्षात येते. 
  • तिसऱ्या अवस्थेतील अळी पोंग्यात प्रवेश करून पाने खाण्यास सुरुवात करते. या अवस्थेत पानावर छिद्रे दिसून येतात. 
  • पाचव्या अवस्थेतील अळी पोंग्यात राहून पाने खाते. त्यामुळे पानावर मोठी छिद्रे दिसतात. 
  • सहाव्या अवस्थेत अळी आधाशीपणे पाने खाऊन पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्टा टाकते. या अवस्थेत मक्‍याची पाने झडल्यासारखी दिसतात. 
  • कणीस अवस्था जपणे महत्त्वाचे  तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास आर्थिक नुकसान मोठे होते. ही अळी मक्याच्या कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते. मधुमका (स्वीटकॉर्न) या अळीला अधिक प्रमाणात बळी पडत असल्याचे आढळले आहे.  निरीक्षणाची शास्त्रीय पद्धत सांगेल अळीचा आढळ  अमेरिकन फॉल आर्मी वर्म या अळीचा आढळ वेळीच लक्षात आल्यास पुढील प्रादुर्भाव टळून वेळेवरच तिला रोखणे सोपे होणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यासाठी तज्ज्ञांनी शेताचे निरीक्षण करणारी शास्त्रीय पद्धत विकसित केली आहे. यात शेताचे निरीक्षण रोपावस्थेपासून सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला असून आठवड्यातून एकदा शेताचे निरीक्षण करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  अमेरिकन फॉल आर्मी वर्म या किडीचा आपल्या शेतातील आढळ पाहण्यासाठी शेताला दररोज भेट देऊन पिकाचे निरीक्षण करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यात निरीक्षण करतेवेळी शेताच्या बाहेरील बाजूच्या तीन ते चार ओळी सोडून शेतातून इंग्रजी डब्ल्यू “W” आकारात चालावे. चालताना डब्ल्यू आकारातील पहिल्या ओळीतील पाच झाडे निवडायची. अशा प्रकारे डब्ल्यू आकारातील प्रत्येक ओळीतील पाच अशी एकूण वीस झाडे निवडायची आहेत. या निरीक्षण केलेल्या वीस झाडांपैकी किती झाडांवर प्रादुर्भाव आहे याची नोंद घ्यायची आहे.  नुकसान असे ठरवावे  निरीक्षणाअंती २० झाडांपैकी दोन झाडे अळीमुळे प्रादुर्भावित असतील तर नुकसान पातळी १० टक्के आहे असे समजावे. जर पीक रोपावस्थेत अथवा मध्य वाढीच्या अवस्थेत असेल तर नियंत्रणाचे उपाय करणे गरजेचे असल्याचे कळते. शेताचे निरीक्षण रोपावस्थेपासून सुरू करणे गरजेचे आहे, तसेच ते आठवड्यातून एकदा करायला हवे असे तज्ज्ञ सांगतात.  अशी आहे आर्थिक नुकसानीची पातळी  १-रोपावस्था ते सुरुवातीची पोंगा अवस्था म्हणजेच उगवणीनंतर दोन आठवड्यापर्यंत तीन पतंग प्रति सापळा किंवा ५ टक्के प्रादुर्भावित झाडे  २- सुरुवातीची पोंगा अवस्था ते मध्य पोंगा अवस्था- (उगवणीनंतर दोन ते चार आठवडे) ५ ते १० टक्के प्रादुर्भावित झाडे  ३- मध्य पोंगा अवस्था ते उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर ४ ते ७ आठवडे):- १० ते २० टक्के प्रादुर्भावित झाडे  ४- उशिराची पोंगा अवस्था (उगवणीनंतर सात आठवड्यापुढे)- २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रादुर्भावित झाडे  ५. तुरा लागण्याची अवस्था ते पीक काढणी- १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कणसाचे नुकसान  एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापनातील मुख्य मुद्दे 

  • पीक फेरपालट. 
  • मका घेतलेल्या शेतात पुढील पीक भुईमूग अथवा सूर्यफूल पिकाचे घ्यावे. 
  • मक्याची उशिरा पेरणी टाळावी. 
  • त्यात आंतरपीक घेऊन पिकांची विविधता महत्त्वाची. त्यात कडधान्य पिकांचा वापर महत्त्वाचा. 
  • उदा. मका+ तूर, उडीद, मूग 
  • मक्याच्या बाजूने नेपिअर गवताची लागवड सापळा पीक म्हणून करावा. 
  • मक्याची पेरणी झाल्यानंतर एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत. 
  • मक्याच्या पानावर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. 
  • किडीच्या सर्वेक्षणासाठी पेरणीनंतर पीक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे 
  • नर पतंग पकडण्यासाठी हेक्‍टरी १५ कामगंध सापळे 
  • पोंगा व्यवस्थित तयार होईल त्या वेळी माती आणि राख किंवा चुना यांचे ९:१ या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात टाकावे. 
  • मधुमका किंवा बेबी कॉर्नमध्ये १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी 
  • प्रादुर्भाव मका पिकावर दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटाऱ्हाझियम अनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी 
  • रासायनिक कीडनाशकांचा वापर  प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर गेल्यास खालीलपैकी कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी. मक्याच्या पोंग्यात ती जाईल याची काळजी घ्यावी.  कीटकनाशक प्रमाण प्रति १० लिटर पाणी थायामिथोक्झाम १२.६ % अधिक ५ मिलि  लॅम्बडा सायहॉलोथ्रीन ९.५ झेड सी  स्पिनेटोरम ११. ७ एससी ४ मिलि  क्लोरॲंट्रानिलीप्रोल १८.५ एससी ४ मिलि  (किडीची ओळख, सर्वेक्षण व नियंत्रण ही तांत्रिक माहिती डॉ. अंकुश चोरमुले यांनी दिली आहे. ते सिस्क्थ ग्रेन या कंपनीत ॲग्रॉनॉमिस्ट आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com