agriculture stories in marathi control of uzy fly on cocoons | Page 2 ||| Agrowon

रेशीम कीटकावरील उझी माशीचे एकात्मिक नियंत्रण
एस. सी. बोकन, डॉ. पी. आर. झंवर, डॉ. डी. आर. कदम
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

रेशीम कीटक व अळीवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड म्हणजे उझी माशी (शा. नाव - एक्झोरिस्टा बॉम्बीस) होय. या उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे कोषांचे ५ ते १५ टक्क्यापर्यंत नुकसान होते. कर्नाटकमध्ये प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक असून, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे.

रेशीम कीटक व अळीवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड म्हणजे उझी माशी (शा. नाव - एक्झोरिस्टा बॉम्बीस) होय. या उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे कोषांचे ५ ते १५ टक्क्यापर्यंत नुकसान होते. कर्नाटकमध्ये प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक असून, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्यात तुतीची लागवड व रेशीम शेतीचे प्रमाण वाढत आहे. या रेशीम कीटक व अळीवर प्रादुर्भाव करणाऱ्या उझी माशीमुळे ऑगस्ट २०१८ मध्ये परभणी जिल्ह्यातील पूर्णा व गंगाखेड तालुक्यांत काही तुरळक ठिकाणी नुकसान झाले होते. मात्र, राज्यातील हवामान उष्ण आणि कोरडे असल्यामुळे उझी माशीचा प्रादुर्भाव कर्नाटक राज्याच्या तुलनेत कमी आहे.

उझी माशीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. बदलत्या पर्जन्यमान, तापमान आणि आर्द्रतेनुसार उझी माशीची अंडी देण्याची आणि अंडी फुटण्याची क्षमता बदलते. खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत प्रादुर्भाव जास्त राहतो.
नुकसान कालावधी : उझी माशीचा प्रादुर्भाव वर्षभर होतो. मुख्यत्वे करून खरीप हंगामात होतो. उझी माशी जीवनक्रमातील चार अवस्था १) अंडी २) अळी (मॅगट) ३) कोष (प्युपा) ४) प्रौढ माशी.

नुकसानीचा प्रकार : उझी माशी एक किंवा दोन पांढऱ्या दुधाळ रंगाची, टाचणीच्या डोक्याच्या आकाराची अंडी ४ थ्या किंवा ५ व्या वाढीच्या अवस्थेतील अळीच्या त्वचेवर अंडी घालते. उझी माशीचा अंडी उबवण काळ ४८ ते ६२ तासांचा असतो. अंडी फुटून अळ्या (मॅगट) बाहेर पडल्यानंतर तिच्या छाती जवळील हुकच्या साहाय्याने छिद्र करून रेशीम कीटकाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या ठिकाणी काळा डाग पडतो. या रेशीम कीटकांच्या शरीरावरील काळ्या डागावरून उझी माशीचा प्रादुर्भाव झालेला ओळखता येतो.

उझी माशी नियंत्रण
१. प्रादुर्भावापासून बचाव पद्धत :

  • महाराष्ट्रामध्ये शक्यतो ९९ टक्के कच्चे शेडनेट संगोपनगृह आहेत. हळूहळू पक्के सिमेंट काँक्रीटमध्ये बांधकाम करून घ्यावे. सर्व खिडक्या व दरवाज्यांना नायलॉन वायर मेष जाळी संरक्षण करावे. म्हणजे उझी माशी कीटक संगोपन गृहात सरळ प्रवेश करणार नाही. संगोपनगृहात प्रवेश व्यवस्थेऐवजी बाहेर ढाळज वजा (ॲन्टीरुम) मध्ये प्रवेश करून नंतर दुस-या दरवाज्यामधून आत प्रवेश व्यवस्था असावी. उझी माशीला प्रवेशापासून मज्जाव होईल. संगेापनगृहात उंदीर प्रवेश विरहित करण्यासाठी शेडनेट बंद करावेत. कोठेही छिद्र ठेवू नये.
  • उझी माशी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणावरून उदा. कोष विक्री केलेल्या बाजारातून पोते किंवा बारदाना पुन्हा आणू नये. बारदाण्यासोबत उझी माशीचे मॅगट, प्युपा किंवा कोष येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • उझी माशी प्रादुर्भावग्रस्त गावात एक दीड महिना कोषाचे पीक बंद ठेवावे.
  • रेशीम कीटक संगोपनगृहाचे सर्व दारे खिडक्या, नायलॉन जाळीच्या साह्याने सील बंद करून घ्यावेत.

उझी सापळा : प्रत्येक खिडकीत खालच्या बाजूस, आतून व बाहेरून छोटे पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिक ट्रे अंडीपूंज आणल्यापासून कोष काढणी म्हणजे २० दिवसापर्यंत ठेवावेत. ट्रेमध्ये १ लिटर पाण्यात एक गोळी (उझी साइड) या प्रमाणे द्रावण मिश्रण ठेवावे. दरवाजे खिडक्या नेहमी बंद ठेवाव्यात. म्हणजे उझी माशीचा शिरकाव संगोपनगृहात होणार नाही.

२. भौतिकरित्या प्रवेश अटकाव पद्धत :

  • सर्व खिडक्यांना उझी सापळे लावल्याने प्रवेश करण्याऐवजी प्रौढ उझी माशी सापळ्यात तेथेच मरते. प्रत्येक पॉकेटमध्ये १२ गोळ्या असतात.
  • संगोपनगृह, कोष खरेदी केंद्र, अंडीपूजनिर्मिती केंद्र अशा सर्व ठिकाणी मॅगट, प्युपा गोळा करून जाळून नष्ट कराव्यात. या सर्व ठिकाणी, जमिनीच्या भेगा बुजवून घ्याव्यात.
  • गोळा केलेल्या मॅगट किंवा प्युपा ०.५ टक्के डिटर्जंटच्या द्रावणात टाकून नष्ट कराव्यात. तिसऱ्या रेशीम कीटकाच्या वाढीच्या अवस्थेपासून पुढे उझी माशीचे सापळे कोष विणन काळापर्यंत ठेवावेत.
  • रेशीम कीटकांना उझी माशी नाशक गोळी किंवा सापळ्याचा त्रास होत नसून हे पर्यावरण सहयोगी तंत्रज्ञान होय.

उझी माशीची अंडी नष्ट करण्यासाठी म्हैसूर येथील केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेद्वारे शिफारशीत उपाययोजना ः
अ) जैविक पद्धत : निसोलायनेक्स थायमस ही उझी माशीच्या कोषावर उपजीविका करणारी परोपजीवी कीटक आहे. एका उझी माशीच्या कोषावर ४० ते ६० निसोलायनेक्स कीटक तयार होतात. या कीटकाची पुनरुत्पादन करण्यासाठी घरमाशी (हाउस फ्लाय) च्या कोषावर परोपजीवीकरण केले जाते. अशा ५० कोषाचे एक नायलॉन नेटचे पाऊच तयार केले जाते. त्यातून १० हजार निसोलयनेक्स कीटक ३ ते ५ दिवसांत बाहेर पडतात.

ब) संगोपनगृहात परोपजीवी कीटक सोडण्याची पद्धत : रेशीम कीटकाच्या वाढीच्या ५ व्या अवस्थेत म्हणजे चौथी कात अवस्था संपल्यानंतर तिसऱ्या ते पाचव्या दिवसापर्यंत २ पाऊच निसोलयनेक्स परोपजीवी कीटक प्रती १०० अंडीपूज या प्रमाणात ठेवावेत. कोष काढणीनंतर हेच पाऊच खताच्या खड्याजवळ ठेवावेत. संचालक, रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथून पैसे भरून निसोलायनेक्स परोपजीवी कीटक मागवता येतात.

३. सांस्कृतिक पद्धत : कोष काढणीनंतर कीटकांची विष्ठा, रॅकवर शिल्लक राहिलेल्या वाळलेल्या फांद्यापासून वेगळी करावी. रेशीम कीटकाची विष्ठा शेतात उघड्यावर किंवा खताच्या खड्ड्यावर फेकू नये. त्यात शेकडो उझी माशीच्या सुप्त अवस्था (कोष) असतात. रेशीम कीटकाची विष्ठा पॉलथीन बॅगमध्ये १५ ते २० दिवसापर्यंत बंद अवस्थेत ठेवावी. म्हणजे उझी माशी विष्ठेतून बाहेर पडणार नाही किंवा कीटकांची विष्ठा खड्ड्यात लगेच गाडून टाकावी किंवा जाळून नष्ट करावी.

वरील रासायनिक उपाय आणि जैविक उपाय एका वेळी वापर केला तर उझी माशीवर जवळपास ७७ टक्के नियंत्रण मिळवता येईल. उझीसाइड, जैविक उपाय व उझी ट्रॅप या तिन्ही उपायांचा एकाच वेळी वापर केल्यास ८४ टक्के नियंत्रण करता येईल.

बोकन. एस. सी. (पीएच. डी. स्कॉलर), ९९२१७५२०००
डॉ. डी. आर. कदम (सहयोगी प्राध्यापक), ९४२१६२१९१०

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...
आंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...
संसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...
पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...
दुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...
जनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...
शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...
गाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...
जनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....
जनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...
‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...