agriculture stories in marathi cotton advice | Page 2 ||| Agrowon

कापूस सल्ला

डॉ. संजय काकडे, डॉ. दिनकर देशमुख, डॉ. प्रशांत नेमाडे
शुक्रवार, 5 जून 2020

कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. बागायती कपाशी लागवडीकरिता अगोदरचे पीक निघाल्यानंतर त्वरित २०-२५ से.मी. खोलवर नांगरणी करावी.

 • कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. बागायती कपाशी लागवडीकरिता अगोदरचे पीक निघाल्यानंतर त्वरित २०-२५ से.मी. खोलवर नांगरणी करावी.
 • जमिनीच्या नांगरणी नंतर उभी आडवी वखरणी करावी. ही सर्व मशागतीची कामे उताराला आडवी करावीत.
 • शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, तर बागायती लागवडीसाठी २०-२५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत /कंपोस्ट खत शेतात सम प्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास गांडूळखत प्रती हेक्टरी २.५ टन शेणखत/ कंपोस्ट खतासोबत शेतात टाकून वखरवाही करून जमिनीत एकसारखे मिसळून घ्यावे. जांभूळवाहीची वाट पाहावी.
 • बागायती कपाशी ठिबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिबक संचाची मांडणी व फर्टीगेशन युनिट यांचे योग्य नियोजन करावे.
 • बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी.
 • बियाणे खरेदी करताना पक्क्या बिलासह नामांकित कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे किंवा विद्यापीठ निर्मित सुधारित व सरळ वाण खरेदी करावे.
 • कोरडवाहू कापसाची पेरणी १५-३० जून किंवा मॉन्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस (पेरणीयोग्य) झाल्यावर लवकरात लवकर पेरणी करावी. जांभूळवाही करूनच पेरणी करावी. जांभूळवाही केल्यास तणांचा प्रादुर्भाव २० टक्क्यांनी कमी होतो.
 • विदर्भामध्ये कपाशीचे पीक बहुतांशी मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे या पिकासाठी उत्तम जलधारणा शक्ती असणारी जमीन निवडावी. अति खोल व खोल जमिनीमध्ये (९० सें.मी.च्या वर) कपाशीचे सलग पीक घ्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार कापूस वाणाची निवड करावी. पिकाच्या लागवडीतील अंतर ठेवावे. उथळ व हलक्या जमिनीत बीटी कपाशीची लागवड करू नये.
 • मागील वर्षी ज्या शेतात सोयाबीन, मुग, उडीद, तूर, किंवा ज्वारी यासारखी पिके घेतली, त्या शेतात पीक फेरपालट म्हणून कपाशीची लागवड करावी.
 • भारी काळ्या कापसाच्या जमिनीकरिता रस शोषक किडीस सहनशील (लवयुक्त) बीटी हायब्रीड (१८० दिवसापेक्षा कमी कालावधीचे) निवड करावी.
 • -मध्यम ते भारी जमिनीमध्ये अधिक आर्थिक मिळकतीकरिता शिफारशीनुसार प्रभावी आंतरपीक पद्धतीमध्ये कापूस+मुग,(१:१) किंवा कापूस+उडीद किंवा लवकर येणाऱ्या सोयाबीन जाती (१:१) चा अवलंब करावा. तसेच कपाशी+ज्वारी+तूर+ज्वारी (६:१:२:१ ओळी) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. तसेच कपाशीच्या ८ ते १० ओळीनंतर तूर पिकाचे आंतरपीक घ्यावे.
 • पेरणीकरिता दर्जेदार, बीज प्रक्रिया केलेल्या व शिफारस केलेल्या वाणांचे शक्यतोवर तंतू विरहीत बियाण्याचा वापर करावा. बीज प्रक्रिया केलेली नसल्यास पेरणी पूर्वी बियाण्यास कार्बोक्झीन १ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.
 • संकरित बागायती कपाशी पेरणीकरिता लागवडीची पद्धत, सरी वरंबा, कुशा पद्धत किंवा ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. भारी जमिनीकरिता लागवडीचे अंतर १२० x ६० किंवा १२० x ९० सेंमी. ठेवावे. बियाण्याचे हेक्टरी प्रमाण २-२.५ किलो घेऊन रासायनिक खते १००:५०:५० नत्र, स्फुरद व पालाश या मात्रेत द्यावे.
 • कोरडवाहू देशी कपाशी लागवडीकरिता देशी सुधारित जाती एकेए-५, एकेए-७, एकेए-८, एकेए-८४०१ या वाणांची निवड करावी. पेरणी सरत्याने किंवा टोकून करावी. देशी कपाशीसाठी अंतर ६० x १५ सेमी. किंवा ६० x ३० सेंमी. ठेवावे. हेक्टरी बियाण्याचे प्रमाण १२-१५ किलो वापरावे. देशी कपाशीकरिता ४०:२०:२० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावा.
 • कोरडवाहू अमेरिकन सुधारित कापूस लागवडीकरिता एकेएच ०९-५ ( सुवर्ण शुभ्रा), पिकेव्ही रजत, एकेएच-८८२८, हे वाण ६० x ३० सेंमी. अंतरावर पेरावे. एकेएच-० ८१ या वाणाची ६० x १५ सेमी.अंतरावर पेरणी करावी. रासायनिक खताची मात्रा ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावी. (६५ किलो युरिया, १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ किलो युरिया प्रती हेक्टरी द्यावा.
 • अति घनता लागवडीकरिता एकेएच -० ८१ या वाणाची ६० x १० सेंमी. अंतरावर हेक्टरी १५ किलो बियाणे घेऊन लागवड करावी.
 • देशी संकरित कापूस लागवडीकरिता पिकेव्ही डीएच-१ व पिकेव्ही सुवर्णा या वाणांची लागवड करावी. योग्य खत व्यवस्थापनाकरिता ६०:३०:३० किलो नत्र,स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे. (६५ किलो युरिया, १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश).
 • कोरडवाहू बीटी वाण ९० x ४५ सेंमी. अंतरावर पेरावे आणि ओलितासाठी हे अंतर १२० x ३० सेंमी.ठेवावे. कोरडवाहू बीटी कपाशी करिता ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे. (६५ किलो युरिया, १८७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश).
 • माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचे नियोजन केल्यास अधिक फायदेशीर ठरते.
 • बागायती बीटी कपाशीसाठी १२०:६०:६० किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रती हेक्टरी द्यावे. (८७ किलो युरिया, ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणी सोबत व पेरणी नंतर ३० दिवसांनी ८७ किलो युरिया आणि ६० दिवसांनी ८७ किलो युरिया प्रती हेक्टरी द्यावा.)

डॉ. संजय काकडे, ९८२२२३८७८०
(कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.


इतर नगदी पिके
उसावरील रोगांचा ओळखा प्रादुर्भाव सध्याच्या पावसाळी वातावरणात ऊस जोमदार वाढीच्या...
उसावरील खोड कीड, लोकरी मावा, हुमणीचे...ऊस पिकामध्ये प्रामुख्याने खोड कीड, कांडी कीड,...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचे...राज्यामध्ये उसाची लागवड आडसाली, पूर्वहंगामी आणि...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...