agriculture stories in marathi CROP ADVICE | Agrowon

कृषी सल्ला : कपाशी, मूग-उडीद, भुईमूग, तूर, मका, वेलवर्गीय पिके
कृषी विद्या विभाग, राहुरी
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

कपाशी    

कपाशी    

 •  उगवण ते पाते लागणे    
 •  पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ६०.८७ किलो युरिया द्यावे.
 •  तणांचे नियंत्रण करण्यासाठी व जमिनीत पडणाऱ्या भेगातून होणारे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी शेतात कोळपणी करून घ्यावी. यामुळे जमिनीत ओलावा व हवा खेळती राहण्यास मदत होते. 
 •  पाती धरतेवेळी, फुलोरा व बोंड धरतेवेळी पहिल्यांदा ५% निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंबआधारीत कीटकनाशक ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी. यामुळे बोंड अळीच्या मादीस अंडी घालण्यास अटकाव होईल.
 •  बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम राहण्यासाठी बीटी कपाशीच्या सभोवती ५ ओळी किंवा २० टक्के बिगरबीटी संकरित वाणाची लागवड करावी.    
 •  ज्या ठिकाणी कपाशी पिकास पाण्याचा ताण पडला असेल केवळ तिथेच युरिया २ टक्के म्हणजेच २० ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे किंवा पोटॅशियम नायट्रेट १ टक्का म्हणजेच १० ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी. 

   मूग-उडीद

 •  रोप अवस्था    
 •  आता शक्यतो मूग व उडीद यांची पेरणी करणे टाळावे. 
 •  पेरणी झालेल्या ठिकाणी आवश्यकतेनुसार कोळपणी करावी. 
 •  मूग व उडीद पीक २५ ते ३० दिवसांचे झाले असेल आणि पाण्याचा ताण जाणवत असेल तर युरिया (२ टक्के) म्हणजेच २० ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे युरिया चांगला विरघळल्यानंतरच फवारणी करावी.
 •  काही ठिकाणी गोलीरुसीड बिटलचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. अशा ठिकाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

भुईमूग    
 रोप अवस्था    
 पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एकरी २० पक्षी थांबे उभारावेत.    

   तूर    
 रोप अवस्था    
 तुरीचे पीक सुरवातीच्या काळात (३०–४० दिवस) अतिशय सावकाश वाढते. सुरवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त असतो. तुरीचे पीक पेरणीपासून ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तृणधान्याचे आंतरपीक घेतल्यास तणांचा व किडींचा प्रादुर्भाव कमी दिसतो.       

मका    
रोप अवस्था    
लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच कामगंध सापळे लावावे.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील प्रकारे फवारणीचे नियोजन करावे. 
फवारणी प्रती १० लिटर पाणी

 •  पहिली फवारणी : स्पिनेटोरम (११.७ इसी) ३-४ मिली
 •  दुसरी फवारणी : थायामिथॉक्झाम (१२.६%) अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५%) (संयुक्त कीटकनाशक) ५ मिली
 •  तिसरी फवारणी : क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५%) ४.५ मिली       

बटाटा        
तुडतुडे, मावा आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी अर्क ४ मिली प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी.     

वेलवर्गीय पिके
केवडा 
 हा रोग सुडोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस नावाच्या बुरशीमुळे होतो. 
लक्षणे - सुरवातीला पानाच्या वरील बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ हवामानात या ठिपक्यांच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हे जांभळट डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेले दिसतात. 
उपाय 

 •  रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. 
 •  प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्यांची उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून ८ ते १० दिवसांच्या अंतराने क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे साध्या हातपंपाने फवारणी करावी. 
 •  रोगाची तीव्रता वाढल्यास मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारावे. पुढील फवारणी दहा दिवसांने करावी. 

भुरी 
 जवळ जवळ सर्वच वेलवर्गीय पिकांमध्ये ईरीसीफी सिकोरेसीआरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. 
 लक्षणे - या रोगाची सुरवात जुन्या पानांपासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागावर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. 
उपाय : 

 • भुरी रोगाची लक्षणे दिसताच फवारणी प्रतिलिटर पाणी
 • पेनकोनॅझोल १ मिली किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम 
 • पुढील फवारणी आवश्यकतेनुसार बुरशीनाशक बदलून करावी. 

 ः ०२४२६-२४३२३९
(प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
औरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...