agriculture stories in marathi crop advice | Agrowon

कृषी सल्ला

कृषी विद्या विभाग, राहुरी
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

कापूस
अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे
फुलकिडे या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
फिप्रोनील (८० डब्ल्यू. जी.) १.३३ ग्रॅम 

तूर
अवस्था ः फुलोऱ्याची अवस्था
शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

कापूस
अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे
फुलकिडे या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
फिप्रोनील (८० डब्ल्यू. जी.) १.३३ ग्रॅम 

तूर
अवस्था ः फुलोऱ्याची अवस्था
शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

गहू
अवस्था ः पेरणीपूर्व तयारी
गव्हाची पेरणी १५ ऑकटोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी. 
गव्हाच्या खालीलपैकी एका वाणाची पेरणी करावी. 
वेळेवर पेरणीसाठी एन.आय.ए.डब्लू.-३०१ (त्र्यंबक), 
एन.आय.ए.डब्लू.-९१७ (तपोवन), 
एन.आय.डी.डब्लू.-२९५ (गोदावरी) 
बागायती उशिरा पेरणीकरिता, एन.आय.ए.डब्लू.-३४. 
रायत पेरणीकरिता एन.आय.डी.डब्लू.-१५ (पंचवटी). 
हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. 
पेरणीवेळी हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी खुरपणीनंतर ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद द्यावे.

कांदा
अवस्था ः वाढ
फुलकिडे : बारीक पिले पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने खरवडल्यासारखी दिसतात. 
या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
डायमेथोएट (३०टक्के ईसी) १.५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) ०.६ मि.लि. फवारणी करताना चिकट द्रव्याचा वापर जरूर करावा.
करपा रोग
पानावर पिवळसर भुरकट रंगाचे ठिपके दिसतात. 
यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी 
मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ ग्रॅम 
पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी. 

टोमॅटो
अवस्था ः फळे लागणे
टोमॅटोवरील रस शोषणाऱ्या किडी (फुलकिडे, पांढरी माशी व मावा) यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
इमिडाक्लोप्रिड (१८. एस.सी.) ०.५ मिली किंवा फिप्रोनील (५ इसी) १.५ मिली.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
कार्बेन्डाझीम १ ग्रॅम. 

सीताफळ
पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव दिसून येताच, व्हर्टिसिलियम लेकॅनी ४०० ग्रॅम अधिक १ लिटर दूध प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे संध्याकाळी फवारणी करावी.

 ः ०२४२६-२४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...