पीक व्यवस्थापन सल्ला

पीक व्यवस्थापन सल्ला
पीक व्यवस्थापन सल्ला

सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सातत्याने आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे हंगामी पिकांबरोबरच फळबागांमध्येही विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे.  तूर 

  •    सध्या लवकर पक्व होणाऱ्या जाती शेंगाच्या अवस्थेत असून होणारा सध्याचा पाऊस फायदेशीर आहे. तसेच मध्यम कालावधीतील जातींना पाऊस फायदेशीर आहे.
  •    ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली असेल त्या ठिकाणी मूळकुज रोग होऊ नये म्हणून शेतात साठलेले पाणी त्वरित बाहेर काढावे. 
  • शेंगा पोखरणारी अळी ( प्रतिलिटर पाणी) 
  •    ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा    ॲझाडीरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. किंवा    एच.ए.एन.पी.व्ही.( ५०० एल.ई.) १ मिलि किंवा    क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १.६ मि.लि. किंवा     एन्डोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.७ मि.लि. किंवा     फ्लूबेंडायमाईड (२० टक्के दाणेदार)०.५ ग्रॅम किंवा     क्लोरॲन्ट्रालीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही)०.३ मि.लि.    गरजेनुसार दुसरी फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने करावी. हरभरा 

  •    ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू/बागायती पेरणी केली आहे अशा ठिकाणी सततच्या पावसाने पाणी साठले आहे अशा ठिकाणी पिकाची उगवण झाली नाही किंवा पीक उबळून गेले आहे. अशा ठिकाणी दुबार पेरणी करावी. 
  •    ज्या ठिकाणी ‍उगवण झाली आहे अशा ठिकाणी जमीन वाफशावर आल्यावर कोळपणी करून २ टक्के युरियाची (२० ग्रॅम प्रति लिटर ) फवारणी करावी.
  • घाटे अळी नियंत्रण ः
  •    प्रति एकर दोन कामगंध सापळे लावावेत.    निंबोळी अर्क ५ मि.लि. फवारणी किंवा     निंबोळीवर आधारित कीटकनाशक ॲझाडीरॅक्टीन (१५०० पीपीएम)  ५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी किंवा    एच.ए.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) १.५ मिलि प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी.  (टीप ः कीडनाशकांच्या शिफारशी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेल्या आहेत.)   ः डॉ. नंदकुमार कुटे, ७५८८५१३३९८

    फळपिके 

  •    फळबागेत साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी उताराच्या दिशेने चर काढावेत. 
  •    नवीन लागवड केलेल्या रोपांच्या आळ्यातील पाणी काढून रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. 
  •    बागेतील रोगग्रस्त पाने, फळे, फाद्या गोळा करून नष्ट कराव्यात. बागेतील तसेच बांधावरील गवत काढून बाग स्वच्छ ठेवावी. 
  • आंबा   करपा, शेंडाकूज रोग     कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी. पेरू  फळमाशी     हेक्टरी दहा कामगंध सापळे लावावेत.  देवी रोग     कार्बेन्डाझीम अधिक मॅन्कोझेब संयुक्त बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.     प्रादुर्भाव लक्षात घेऊन १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.  (टीप ः वरील बुरशीनाशकाच्या चाचण्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर झालेल्या आहेत)  ः डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ लिंबूवर्गीय फळपिके  खोडकूज     खोडाला बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी.  मूळकूज       सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. वयानुसार प्रती झाड १५ ते २० लिटर या प्रमाणात आळवणी करावी.  खैऱ्या रोग     १ ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन* अधिक ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी, अशी विद्यापीठाची शिफारस आहे.  मोसंबी     आंबे बहराच्या फळातील देठ कूज नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मँकोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी विद्यापीठाची शिफारस आहे.   ः डॉ. विष्णू गरांडे, ९८५००२८९८६  ः डॉ. मधुकर शेटे, ९४२१९५१९७२  

    डाळिंब     बागेत साचलेले पाणी चर काढून बाहेर काढावे.    गळ झालेली फळे वेचून नष्ट करावीत. तण नियंत्रण करावे. मर रोग 

  •    क्लोरपायरीफॉस (२० ई.सी.) २.५ मि.लि अधिक कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू.पी.)  २ ग्रॅम प्रति लिटर किंवा
  •    प्रोपीकोनॅझोल (२५ ई.सी.) २ ग्रॅम  प्रति लिटर पाणी 
  •    वरील बुरशीनाशकाचे ५ लिटर द्रावण झाडाच्या खोडाभोवती बांगडी पद्धतीने आळवणी करावी.
  •    गरजेनुसार २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा आळवणी करावी.
  • तेलकट डाग रोग     कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड २.५ ग्रॅम  अधिक स्ट्रेप्टोमायसीन ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा    कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड २.५ ग्रॅम अधिक बॅक्टीनाशक (२ ब्रोमो-२ नायट्रोप्रोपेन,१,३ डायोल) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानावरील ठिपके ः (प्रति लिटर पाणी)     कार्बेन्डाझीम  २ ग्रॅम किंवा    थायोफेनेट मिथाईल १.५ ग्रॅम किंवा     मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा    कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा    डायफेनोकोनॅझोल १  ग्रॅम किंवा    बोर्डो मिश्रण (१ टक्का)     वरील बुरशीनाशकांची १० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. मावा, फुलकिडे      सायॲन्ट्रानिलिप्रोल १.२ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी. बोर   भुरी रोग     सल्फर २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी.  केसाळ अळी     ॲझाडीरॅक्टीन (१०,००० पीपीएम) ३ मि.लि. किंवा    इंडोक्झाकार्ब २ मि.लि. प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी. सीताफळ  पिठ्या ढेकूण     व्हर्टींसिलीयम लेकॅनी ५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी.  ः डॉ. श्रीकांत कुलकर्णी, ९४२२२२४५५३  ः डॉ. पी. इ. मोरे, ८८८८९६८२०४  ः डॉ. ए. आर. वाळुंज, ७५८८६९५४३२ (टीप ः वरील कीटकनाशक, बुरशीनाशकांना लेबल क्लेम नाही, परंतु यांच्या चाचण्या विद्यापीठ प्रक्षेत्रावर झालेल्या आहेत)

     ः ०२४२६-२४३८६१ (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com