agriculture stories in marathi, crop advice (Kokan region) | Agrowon

कृषी सल्ला (कोकण विभाग)

कृषी विद्या विभाग, दापोली
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

भात
- पक्व अवस्था

भात
- पक्व अवस्था

 •  पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. पावसाचा अंदाज घेऊन तयार झालेल्या हळव्या भात पिकाची सकाळी वैभव विळ्याच्या साहाय्याने जमिनीलगत कापणी करावी. त्वरीत मळणी करून साठवणीअगोदर २ ते ३ उन्हे देऊन धान्य वाळवावे. 
 •  लष्करी अळीचा प्रादुर्भाव हळव्या भात जातींवर दिसून येत असल्यास पावसाचा अंदाज घेऊन तयार झालेल्या हळव्या भात पि‍काची त्वरित कापणी करावी. लगेच मळणी उरकून घ्यावी. 
 •  भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पिकाचे चांगले निरीक्षण करावे. भातखाचरात एकरी तीन ते चार पक्षी थांबे उभे करावेत. गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत. 
 •  भाताच्या लोंब्या कुरतडून दाणे जमिनीवर गळलेले दिसून आल्यास किंवा सकाळी, सायंकाळी भात खाचरात प्रतिचुड १-२ याप्रमाणे अळी/कोष आढळल्यास फवारणी प्रति लिटर पाणी 

     सायपरमेथ्रीन (२५ टक्के प्रवाही) ०.६ मि. लि. 
टीप - सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा शांत असताना चुडाच्या बुंध्यावर पडेल अशा प्रकारे फवारणी करावी. 

नागली 
 पक्व अवस्था

 पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तयार झालेल्या नागली पिकाची कणसे सकाळच्या वळी विळ्याने कापून काढावीत. ती उन्हात व्यवस्थित वाळवून मळणी केल्यानंतर साठवणूक करावी.

वाल/कडवा वाल
 पेरणी 

 •  खरीप भात कापणीनंतर जमिनीच्या अंगओल्यावर विनामशागत वाल/कडवा वाल पिकाची पेरणी केली जाते. त्यासाठी भात कापणीनंतर त्वरीत शेतातील तणांच्या नियंत्रणासाठी ग्लायफोसेट ५ मि. ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे अनिवडक तणनाशकाचा जमिनीवर फवारणी करावी. (ही अॅग्रेस्को शिफारस असून, लेबल क्लेम नाही.)     त्यानंतर कोणतीही मशागत न करता टोकण पद्धतीने दोन ओळीत ३० X १५ से.मी. अंतर ठेवून वालाची पेरणी करावी. पेरणी करतेवेळी बियाण्याशेजारीच एक छिद्र करून त्यामध्ये दाणेदार मिश्रखत गुंठ्यास एक किलो या प्रमाणे द्यावे.
 • पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रति किलो या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. बुरशीनाशकांच्या प्रक्रियेनंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणे रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया पेरणीपूर्वी १ तास आधी करावी. बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.  

आंबा
 पालवी अवस्था 

 •  घन लागवड (५ x ५ मी. किंवा ६ x ४ मी.) असलेल्या आंबा बागांमध्ये सुरुवातीच्या काळापासून नियमित छाटणी करावी. यामध्ये उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणे आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या गोष्टींचा अंतर्भाव करावा. घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८० टक्के इतकी ठेवावी. 
 •  पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांची मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी करावी. यामुळे झाडाला जास्त आणि खोलवर सूर्यप्रकाश उपलब्ध होऊन फळधारणेत वाढ होईल. 
 •  ढगाळ व दमट वातावरणामुळे आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर तुडतुडे, शेंडे पोखरणारी आणि मिजमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि. 

काजू 

 •  पालवी अवस्था 
 •  काजू बागांची गवत काढून लवकरात लवकर साफसफाई करावी. वाळलेल्या, मृत आणि अशक्त फांद्या कापून विरळणी करावी. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. 
 •  ढगाळ व दमट वातावरणामुळे काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी नवीन पालवी फुटण्याच्या वेळी फवारणी प्रति लिटर पाणी 

    लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. 

नारळ 
फळधारणा

नारळावरील इरीओफाईड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात व नंतर चट्टे वाढत जाऊन त्रिकोणी आकाराचे होतात. प्रादुर्भित भागावरील फळांचे आवरण तडकते, परिणामी नारळ लहान राहतात, तसेच लहान फळांची गळ होते. किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के कडूनिंबयुक्त (अॅझाडीराक्टीन) कीटकनाशक ७.५ मि.लि. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावे. औषध दिल्यानंतर ४५ दिवसापर्यंत नारळ काढू नयेत. याशिवाय नारळावर १ टक्का कडुनिंबयुक्त कीटकनाशक ४ मि. लि. प्रति लिटर पाण्यातून नारळाच्या घडावर पडेल, अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व कीडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेले फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावेत.   

भाजीपाला रोपवाटिका
 पेरणी अवस्था 

 •  रब्बी हंगामासाठी रोपे तयार करण्याकरिता वाफसा स्थितीत जमिनीची मशागत करून घ्यावी. 
 •  ३ मीटर लांब बाय १ मीटर रुंद बाय १५ सें.मी. उंचीच्या गादीवाफे तयार करावेत. या गादीवाफ्यावर प्रती चौरस मीटर ५ किलो शेणखत, ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळून भाजीपाला बियाण्यांची पेरणी करावी. 
 •  रोपांचे मर रोगापासून संरक्षण 
 • करण्याकरीता पेरणीपूर्वी ३ ते ४ दिवस वाफ्यावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची भिजवण करावी. 
 •  बीजप्रक्रिया - थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. 
 •  भाजीपाला तसेच फळबाग रोपवाटिकेस नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी. 

 ः ०२३५८ - २८२३८७ 
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...