agriculture stories in marathi CROP ADVICE ( kokan region) | Agrowon

कृषी सल्ला (कोकण विभाग)

कृषी विद्या विभाग, दापोली
गुरुवार, 19 मार्च 2020

आंबा

आंबा

 • फळधारणा 
 • फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये (वाटाणा अवस्था), फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
 • उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१ टक्के ) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणे फवारणी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना करावी. 
 • फळे गोटी ते अंडाकृती आकाराची असताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ x २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी लावावी. यामुळे फळगळ कमी करणे, फळाचा आकार व वजन वाढणे, डागविरहीत फळे आणि फळामधील साक्याचे प्रमाण कमी करणे तसेच फळमाशीपासून संरक्षण असे अनेक फायदे होतात. 

काजू 

 • फुलोरा ते फळधारणा अवस्था 
 • काजू पिकामध्ये उशिराने येत असलेल्या नवीन पालवीवर ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पालवीच्या संरक्षणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • हवामान पूर्वानुमानानुसार मोहोर अवस्थेत असलेल्या काजू पिकावर ढेकण्या व फुलकिडींच्या वाढीसाठी हवामान अनुकूल दिसत आहे. या किडींच्या बंदोबस्तासाठी 
 • मोहोर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • तसेच फळधारणा झालेल्या काजू पिकावर वरील किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.)
 • काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.

नारळ

 • तापमानात वाढ संभवत असल्याने नारळ बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात. झावळ्यांचे आच्छादन करावे. 
 • नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.

सुपारी 
तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, सुपारी बागेस ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.  

चिकू

 • फुलोरा ते फळधारणा
 • तापमानात वाढ संभवत असल्याने चिकू बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
 • चिकू बागेमध्ये बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता करावी.  
 • नियंत्रणासाठी फवारणी प्रति लीटर पाणी
 • प्रोफेनोफोस (५० टक्के प्रवाही) १.५ मि. ली. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.५ मि.ली किंवा नोव्हॅल्युरॉन (१० टक्के प्रवाही) ०.५ मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि. ली.
 • टीप ः फवारणी पूर्वी तयार फळांची काढणी करावी.

भाजीपाला 
वाल 

 • काढणी अवस्था
 • वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी करून ४ ते ५ दिवस शेंगा उन्हात वाळवाव्यात. मळणी करावी. किंवा शेंगा झाडावर वाळल्यानंतर पिकाची कापणी करून झाडे खळ्यावर ३ ते ४ दिवस उन्हात वाळवून मळणी करावी. साठवणुकीमध्ये भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे मातीच्या खळीचा थर देऊन चांगले वाळवावे.

वांगी 

 • फळधारणा
 • वांगी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.  
 • कीडग्रस्त शेंडे व फळे जमा करून नष्ट करावीत.
 • या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी
 • डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि.ली.

भेंडी 

 • फळधारणा
 • उन्हाळी भेंडी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. 
 • नियंत्रणासाठी फवारणी प्रति लीटर पाणी
 • सायपरमेथ्रीन (२५ टक्के प्रवाही) ०.३ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली.

 ः ०२३५८ -२८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.) 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...