कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, भाजीपाला पिके 

कृषी सल्ला
कृषी सल्ला

भात

  •  फुटवे अवस्था 
  •  पुढील पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भात खाचरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकावे. भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी.पर्यंत ठेवावी.
  •  पुढील काही दिवसांतील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता भात पिकास फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यावयाचा नत्र खताचा दुसरा हप्ता (हेक्टरी ८७ किलो युरिया) तेवढे दिवस पुढे ढकलावा.
  • नागली

  • रोप अवस्था 
  • नागली पिकाच्या पुनर्लागवडीची कामे पूर्ण करून घ्यावीत.
  • आंबा 

  • वाढीची अवस्था
  • पुढील पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आंबा बागेत करण्यात येणारी पॅक्लोब्युट्राझोलची आळवणी पुढे ढकलावी. 
  • नारळ व सुपारी      नारळ आणि सुपारी बागेतील अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकावे.

    भाजीपाला पिके 

  •  वाढीची अवस्था
  •  भाजीपाला क्षेत्रातील अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकावे.
  • वांगी, मिरची, कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका, भाजीपाला पिकावर पाने खाणारी अळी, पांढरी माशी, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. असा प्रादुर्भाव आढळताच मॅलाथिऑन २ मिली किंवा डायमिथोएट १.५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भावाची तीव्रता पाहून पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. 
  • टीप : स्टीकर मिसळून फवारणी करावी.

    ः ०२३५८- २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com