agriculture stories in Marathi, crop advice, konkan region | Agrowon

कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, भाजीपाला पिके 
कृषी विद्या विभाग, दापोली
बुधवार, 31 जुलै 2019

भात

 •  फुटवे अवस्था 
 •  पुढील पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भात खाचरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकावे. भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी.पर्यंत ठेवावी.
 •  पुढील काही दिवसांतील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता भात पिकास फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यावयाचा नत्र खताचा दुसरा हप्ता (हेक्टरी ८७ किलो युरिया) तेवढे दिवस पुढे ढकलावा.

नागली

 • रोप अवस्था 
 • नागली पिकाच्या पुनर्लागवडीची कामे पूर्ण करून घ्यावीत.

आंबा 

भात

 •  फुटवे अवस्था 
 •  पुढील पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भात खाचरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकावे. भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी.पर्यंत ठेवावी.
 •  पुढील काही दिवसांतील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता भात पिकास फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यावयाचा नत्र खताचा दुसरा हप्ता (हेक्टरी ८७ किलो युरिया) तेवढे दिवस पुढे ढकलावा.

नागली

 • रोप अवस्था 
 • नागली पिकाच्या पुनर्लागवडीची कामे पूर्ण करून घ्यावीत.

आंबा 

 • वाढीची अवस्था
 • पुढील पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आंबा बागेत करण्यात येणारी पॅक्लोब्युट्राझोलची आळवणी पुढे ढकलावी. 

नारळ व सुपारी 
    नारळ आणि सुपारी बागेतील अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकावे.

भाजीपाला पिके 

 •  वाढीची अवस्था
 •  भाजीपाला क्षेत्रातील अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकावे.
 • वांगी, मिरची, कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका, भाजीपाला पिकावर पाने खाणारी अळी, पांढरी माशी, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. असा प्रादुर्भाव आढळताच मॅलाथिऑन २ मिली किंवा डायमिथोएट १.५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भावाची तीव्रता पाहून पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी. 

टीप : स्टीकर मिसळून फवारणी करावी.

ः ०२३५८- २८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

इतर कृषी सल्ला
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
अजैविक ताणाविरोधी लढाईत जैवसंप्रेरके...पुणे येथे द्राक्ष बागायतदार संघ महाअधिवेशन ३ ते ५...
पाणी साचलेल्या द्राक्षबागांसाठी...द्राक्ष लागवडीखाली असलेल्या क्षेत्रात गेल्या...
फळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य... एकूण फळागळीमध्ये ७० ते ८० टक्के फळे ही...
तणनियंत्रण पद्धतींचा विकास हाताने तण उपटून टाकण्यापासून सुरू झालेला हा...
तणांचे आच्छादन हा सर्वोत्तम पर्याय तणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतानाच तणांचे...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
तणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
कृषी सल्ला : ज्वारी, सोयाबीन ज्वारी      रोप अवस्था...
शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख, उद्दिष्टे मागील भागापर्यंत आपण गटशेती कशी करावी, याची...
ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड...कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर...
भातावरील खोडकिडीचे एकात्मिक नियंत्रण महाराष्ट्रात कोकणासह पूर्व विदर्भातील गोंदिया,...
अधिक पाऊस, ढगाळ वातावरणात करावयाच्या...द्राक्ष विभागातील बहुतांश भागांमध्ये सध्या सतत...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, भाजीपाला...भात  फुटवे अवस्था   पुढील...
तणविज्ञानाची तत्त्वे अनेक वाचकांना सूक्ष्मजीवशास्त्राच्या...
कीड-रोग नियंत्रण : योग्य वेळी वापरा...परजीवी कीटकांचे स्थलांतर खूप कमी अंतरापर्यंतच...