agriculture stories in Marathi crop Advice (Konkan region) | Agrowon

कृषी सल्ला (कोकण विभाग)

कृषी विद्या विभाग, दापोली
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भात

भात

 • अवस्था - फुलोरा ते दाणे भरणे
 • काही विभागांत पर्जन्यमान कमी असल्याने आणि निमगरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत व गरवे भात फुलोरा अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी.पर्यंत ठेवावी.
 • हळवे भात पक्व होऊ लागल्यास कापणीपूर्वी ८-१० दिवस भात खाचरातील पाणी बाहेर काढून टाकावे.
 • गरव्या भात पिकास नत्र खताची तिसरी मात्रा ७१ किलो युरिया प्रति हेक्टरी पीक फुलोऱ्यात असताना द्यावी.
 • पावसाची उघडीप व ढगाळ वातावरणामुळे पाणथळ भागात लावलेल्या भात पिकावर पाणी साठून राहिल्यास निळे भुंगेरे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे खाचरात पाणी जास्त काळ साठू देऊ नये. २-३ दिवसांच्या अंतराने फोडून, नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.
 • निळे भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
 • क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ४ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि.
 • -ढील पाच दिवस पावसाची उघडीप असून, ढगाळ वातावरण राहू शकेल. पाणी साचून राहणाऱ्या, घन लागवड आणि नत्र खताची अवाजवी मात्रा दिलेल्या भात खाचरात तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तपकिरी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावावर सातत्याने लक्ष ठेवावे. जर रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास फिप्रोनिल (५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मि.लि प्रति लिटर पाणी याप्रमाणे चुडाच्या बुंध्यावर पडेल अशा प्रकारे फवारणी करावी. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता नवीन पाणी घेत राहावे.
 • पावसाची उघडीप, वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस आणि उतार असलेल्या जमिनीतील हळव्या जातीच्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पिकाचे निरीक्षण करून प्रादुर्भाव असलेल्या भातखाचरात एकरी तीन ते चार पक्षी थांबे उभे करावेत. पक्ष्यांकडून अळ्या खाल्ल्या जातील. सकाळी किंवा सायंकाळी भातखाचरात जाऊन चूड उघडून पाहावेत. त्यामध्ये अळी/कोष प्रतिचुड १ याप्रमाणे आढळल्यास शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.

आंबा
अवस्था - पालवी

 • पुढील पाच दिवस पावसाची उघडीप दिसते. आंबा बागेतील गवत काढून स्वच्छता करावी. बांडगुळे, मृत फांद्या तसेच निर्जीव फांद्या कापून फांद्यांची विरळणी करावी.
 • हवेतील आर्द्रतेमुळे फांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी १ टक्के बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे संपूर्ण झाडावर फवारणी करावी.
 • वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर तुडतुडे, शेंडे पोखरणारी आणि मिजमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि. पावसाची उघडीप असताना फवारणी करावी.

काजू
अवस्था - पालवी

 • पुढील पाच दिवस पावसाच्या उघडीपीमध्ये काजू बागांची गवत काढून साफसफाई करावी. वाळलेल्या, मृत आणि अशक्त फांद्या कापून विरळणी करावी. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. तसेच १ टक्के बोर्डोमिश्रणाची संपूर्ण झाडावर फवारणी करावी.
 • वाढत्या तापमानामुळे काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी नवीन पालवी फुटण्याच्या वेळी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

भाजीपाला पिके
अवस्था ः फळधारणा
भेंडी पिकामध्ये वाढत्या तापमानामुळे हळद्या रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता असते. असा प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगग्रस्त रोपे उपटून टाकावीत.
रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १ मि. लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पिकामध्ये पिवळ्या रंगाची चिकट कार्ड लावावीत.

०२३५८ -२८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)


इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीसाठी बँकर्स समितीची बैठक...मुंबई : ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ...
मुंबईतून आजपासून ५० विमानांची ये-जामुंबई : देशांतर्गत विमान उड्डाणे उद्यापासून सुरू...
टोमॅटो प्रश्नी समाधानकारक निदान,...पुणे : विषाणूग्रस्त टोमॅटो प्रश्नी शेतकऱ्यांना...
सातारा जिल्हा बॅंकेस १३३.९५ कोटींचा...सातारा  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
सिंदखेड ग्रामस्थांना होमिओपॅथी औषधाचे...अकोला  ः ‘कोरोना’चा वाढता प्रादूर्भाव सध्या...
राज्यसभेवर व्हावी प्रयोगशील शेतकऱ्यांची...अमरावती ः भारताच्या राष्ट्रपतींव्दारा राज्यसभेवर...
थेट निविष्ठा पुरवठ्यातून वेळ-पैशांची...यवतमाळ ः कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत...
कापसाप्रमाणेच नाफेडच्या तूर खरेदीची गती...कलगाव, जि. यवतमाळ ः कापसाप्रमाणेच नाफेडव्दारे होत...
यवतमाळ जिल्ह्यातील २४ गावे माॅन्सून...यवतमाळ ः जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर निर्माण होणाऱ्या...
सौंदड येथे थेट निविष्ठा वितरण उपक्रमाचा...गोंदिया ः कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना निविष्ठा...
नागपूरमधून २५ हजार शेतकऱ्यांकडून होणार...नागपूर ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक...
अमरावतीत पाणीटंचाईची ६६९ गावांमध्ये...अमरावती ः माॅन्सूनचे आगमन की दिवसांवर असतानाच...
मते मांडण्यास संधी नसल्याने नगर 'जिप'ची...नगर  ः जिल्हा परिषदेची बुधवारी (ता.२७) सभा...
परभणी जिल्ह्यात बीटी कपाशीची सहा लाख...परभणी ः परभणी जिल्ह्यात सोमवार (ता. २५) पासून...
बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला...नगर   ः एका क्षणी सर्वाधिक कोरोनाबाधित...
नगर : शेतकरी घरीच तपासत आहेत सोयाबीन...नगर  ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा...
पुणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे सुरू...पुणे  : राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू...
लग्नासाठी पन्नास व्यक्तींच्या...नगर  ः कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे...
परभणी, हिंगोलीत २८ हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
कृषी पदव्युत्तरच्या ऑनलाइन परीक्षेचा...पुणे  ः ‘कोरोना’चा शिक्षण क्षेत्रावर गंभीर...